दहावी आणि बारावीचा निकाल 'या' तारखेला जाहीर होणार (फोटो सौजन्य-X)
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाशी (CBSE) संबंधित लाखो विद्यार्थ्यांची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. कारण बोर्ड मे 2025 मध्ये दहावीचा आणि बारावीचा निकाल जाहीर करण्याची शक्यता आहे. सीबीएसई बोर्डाच्या परीक्षा ४ एप्रिल रोजी संपत आहेत. दहावीच्या परीक्षा संपल्या असून बारावीच्या परीक्षा ४ एप्रिल रोजी संपतील. परीक्षा संपताच निकालाची वाट पाहणे साहजिकच आहे. दहावीची परीक्षा १५ फेब्रुवारी ते १८ मार्च या कालावधीत घेण्यात आली होती, तर बारावीची परीक्षा १५ फेब्रुवारी रोजी सुरू झाली होती पण ४ एप्रिल रोजी संपेल. यावर्षी बोर्डाच्या परीक्षेला बसलेले विद्यार्थी आता त्यांच्या निकालाची आतुरतेने वाट पाहत आहे.
मात्र सीबीएसईकडून अद्याप दहावीचा निकाल कधी जाहीर होईल याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती जारी केलेली नाही. या वर्षी, २४ लाखांहून अधिक विद्यार्थी त्यांच्या दहावीच्या निकालाची वाट पाहत आहेत. यावर्षी सुमारे ४२ लाख विद्यार्थ्यांनी सीबीएसई बोर्डाच्या परीक्षे दिल्या आहेत. यामध्ये २४.१२ लाख विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेसाठी नोंदणी केली होती आणि १७.८८ लाख विद्यार्थ्यांनी बारावीच्या परीक्षेसाठी नोंदणी केली होती. निकालांबाबत बोर्डाकडून अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही, परंतु गेल्या काही वर्षांचा ट्रेंड पाहता, दहावी आणि बारावीचे निकाल मे महिन्यात जाहीर केले जाऊ शकतात. गेल्या २ वर्षांचा ट्रेंड पाहिला तर, १०वी आणि १२वीचे निकाल मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात जाहीर होतात.
२०२४ मे १३
२०२३ मे १२
२०२२ जुलै २२
२०२१ ऑगस्ट ३
२०२० जुलै १५
गेल्या वर्षीच्या तारखांवर नजर टाकली असता, सीबीएसई दहावीचा निकाल मे महिन्यात जाहीर करते. याशिवाय, सीबीएसई आता बारावीचे निकाल आधी आणि दहावीचे निकाल नंतर जाहीर करते. सीबीएसई इयत्ता १०वी परीक्षा २०२५ घेण्यात आली आहे. तर सध्या बारावीच्या परीक्षा सुरू आहेत. यावर्षी बारावीच्या परीक्षा १५ फेब्रुवारी ते ४ एप्रिल २०२५ या कालावधीत घेतल्या जातील. यावर्षी एकूण ४४ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी या परीक्षा दिल्या होत्या, ज्यात दहावीचे २४.१२ लाख विद्यार्थी आणि बारावीचे १७.८८ लाख विद्यार्थी होते.
सर्वप्रथम, परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांना cbseresults.nic.in किंवा cbse.gov.in या वेबसाइटला भेट द्यावी लागेल.
यानंतर तुम्ही होम पेजवरील सीबीएसई इयत्ता १०वी/१२वी निकाल २०२५ च्या लिंकवर क्लिक करा.
या पृष्ठावर दिलेला तुमचा रोल नंबर, शाळा क्रमांक, जन्मतारीख आणि प्रवेशपत्र तपशील प्रविष्ट करा.
‘सबमिट’ बटणावर क्लिक करायचे?
तुमचा निकाल स्क्रीनवर दिसेल, जो तुम्ही डाउनलोड आणि प्रिंट करू शकता.