फोेटो सौजन्य- सोशल मीडिया
Jobs Safe from AI:आज जगभरात आर्टिफिशियल इंटिलिजन्स (AI) मुळे नोकऱ्यांवर गदा येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. ऑफिसपासून फॅक्टरीपर्यंत एआयचा वापर वाढला असला तरी प्रत्येक काम AI करू शकत नाही. ज्या कामांमध्ये मानवी विचार भावना, अनुभव, विश्वास आणि त्वरित निर्णय घेण्याची क्षमता लागते, अशा नोकऱ्या पुढील अनेक दशके सुरक्षित राहतील. रिसर्च एजन्सीच्या मते, एआय कामे सोपे करू शकते. परंतु, माणसांची जागा पूर्णपणे घेऊ शकत नाही. अशाच सुरक्षित क्षेत्रांबद्दल आज आपण जाणून घेऊया.
रुग्णालयात रुग्णाची प्रकृती कधीही बदलू शकते. आशा वेळी नर्स केवळ रुग्णाला औषध न देता, त्याच्या कुटंबाला मानसिक आधारही देते आणि ती रूग्णाची काळजी घेते. येथे एआय फक्त रिपोर्ट ठेवणे आणि औषधांची नोंद ठेवण्यापुरते मर्यादित असेल.
मानसिक आरोग्याशी संबंधित कामे ही तांत्रिक नसून मानवी भावना समजून घेण्याची असतात. तणाव किंवा नैराश्यातून जाणाऱ्या व्यक्तीला सहानभुती आणि विश्वासाची गरज असते. ही गरज फक्त मानव किंवा समुपदेशकच पूर्ण करू शकतो.
कोणत्याही शिक्षकाचे काम हे केवळ मुलांना शिकवणे, नसून मुलांना चांगला माणूस बनवणे हे असते. लहान मुले शिक्षकांच्या प्रेम, शिस्त आणि वर्तनातून शिकतात. AI स्मार्ट लर्निंग देऊ शकते. पण भावनिक पाठबळ आणि योग्य मार्गदर्शन केवळ माणूसच देऊ शकतो.
क्रिएटिव्हिटी ही मानवी विचार आणि अनुभवातून जन्माला येते. एआय हे त्याच्याकडे संग्रहित माहितीवर प्रक्रिया करून आशय देते. मात्र, लेखक समाज, संस्कृती आणि मानवी भावना समजून कल्पना मांडतात.
डॉक्टर केवळ रिपोर्ट पाहून नव्हे तर रुग्णाची पार्श्वभूमी आणि भावना समजून उपचार करतात.त्यामुळे त्यांची जागा एआय घेऊ शकत नाही.
नेतृत्व केवळ डेटावर चालत नसून कठीण काळातील निर्णयांवर अवलंबून असते. लीडर लोकांचे मन जिंकतो व जोखीम पत्कारतो.
तसेच कलाकार आणि हस्तकलातज्ञ हे अत्यंत संवेदनशीलपणे ऐतिहासिक वास्तूंची दुरुस्ती करतात. तसेच आपत्ती व्यवस्थापन आणि अग्निशामक क्षेत्रातील लोक, ज्यांना प्रसंगावधानाचे भान आहे. कम्युनिटी लीडर्स आणि मध्यस्थ, जे लोकांच्या भावभावना समजून घेऊन काम करतात. त्यांच्या नोकऱ्या एआय काढून घेऊ शकत नाही






