फोटो सौजन्य- सोशल मीडिया
CBSE Fake News Alert: गेल्या काही दिवसात सोशल मीडियावर एक कथित परिपत्रक वेगाने व्हायरल होत आहे. ज्यामध्ये असा दावा करण्यात आला आहे की, केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (CBSE) २०२६च्या इयत्ता १० वी आणि १२ वी च्या बोर्ड परीक्षांसाठी उत्तरपत्रिकांची फोटोकॉपी आणि पुनर्मूल्यांकन प्रक्रिया रद्द करण्यात आली आहे.
ही बातमी गेल्या काही दिवसात वेगाने वायरल होत असल्याने विद्यार्थी आणि पालकांमध्ये संभमाचे वातावरण निर्माण झाले होते. आता सीबीएससी बोर्डाने हा दावा पूर्णपणे खोटा आणि बनावट असल्याचे सांगितले आहे. बोर्डाने आपल्या अधिकृत सोशल मीडिया पेजच्या माध्यमातून स्पष्ट केले आहे की, व्हायरल झालेली नोटीस बनावट आहे. ती कोणत्याही परिस्थितीत खरी मानली जाऊ नये.
व्हायरल झालेल्या परिपत्रकात असा दावा करण्यात आला आहे की, ऑनलाइल सिस्टिममधील तांत्रिक अडचणींमुळे उत्तरपत्रिकांची फोटोकॉपी आणि पुनर्मुल्यांकन प्रक्रिया रद्द करण्यात आली आहे. तसेच विद्यार्थ्यांची जमा केलेली फी १५ दिवसात माघारी केली जाईल. तसेच आधी जाहीर केलेले गुणच अंतिम मानले जातील.
मात्र, सीबीएससीने हा दावा फेटाळून लावत स्पष्ट केले की, स्कॅन केलेली उत्तरपत्रिका मिळवणे, गुणांची पडताळणी (Verification) आणि पुनर्मूल्यांकन (Re-evaluation) करण्याची प्रक्रिया पुर्वीप्रमाणेच सुरु आहे.
सीबीएसईने विद्यार्थी आणि पालकांना आवाहन केले की, त्यांनी परीक्षेशी संबंधित कोणतीही माहिती सीबीएसईच्या अधिकृत स्त्रोतांकडून (Official Sources) मिळवावी. कोणत्याही वायरल मॅसेजवर स्क्रिनशॉटवर किंवा अनधिकृत नोटीसवर विश्वास ठेऊ नये.
HSC Marksheet Distribution: बोर्डाचा मोठा निर्णय! बारावीची ओरिजिनल मार्कशीट ‘या’ तारखेला मिळणार..
बोर्डाने पुढे माहिती दिली की, काही विद्यार्थ्यांना ऑनलाइन पोर्टलवर तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे इयत्ता १२ वीच्या स्कॅन कॉपीसाठी अर्ज करण्याची अंतीम मुदत २४ मे २०२६ करण्यात आली आहे. मूल्यांकन आणि पुनर्मुल्यांकन प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी सर्व तक्रारीचे निवारण विषय तज्ञांद्वारे (Subject Experts) केले जाईल.






