 
        
        फोटो सौजन्य - Social Media
आजच्या काळात शिक्षण फार महत्वाचं झालं आहे. पण शिकल्यानांतर कौशल्य असणेही फार महत्वाचे असते. जर तुम्ही काही कारणाने जास्त शिकू शकला नाहीत तर तुमच्याकडे लाखोंचा पगार घेण्यासाठीही अद्याप अनेक पर्याय आहेत. तुम्ही या क्षेत्रांमध्ये ज्ञान तसेच कौशल्य विकसित करून या क्षेत्रामध्ये करिअर घडवू शकता. हे क्षेत्र तुम्हाला भरभराटीचे आयुष्य देईल तसेच चिक्कार पैसा कमवाल.
डिजिटल मार्केटिंग स्पेशलिस्ट
ऑनलाइन बिझनेस आणि स्टार्टअप्स वाढत असल्याने डिजिटल मार्केटिंग एक्सपर्ट्सची मागणी झपाट्याने वाढली आहे. SEO, सोशल मीडिया मार्केटिंग आणि जाहिरात मोहिमांमध्ये प्राविण्य असलेले लोक कंपन्यांना हवेच असतात. यासाठी केवळ डिजिटल मार्केटिंग कोर्सचं सर्टिफिकेट, थोडा अनुभव आणि क्रिएटिव्ह राइटिंगची कला पुरेशी असते. अनुभवानुसार महिन्याला ₹60,000 ते ₹1 लाखांपर्यंत पगार मिळू शकतो.
बूटकॅम्प ग्रॅज्युएट सॉफ्टवेअर इंजिनिअर
प्रोग्रामिंग शिकण्यासाठी मोठी पदवी लागते असं नाही. आज अनेक कोडिंग बूटकॅम्प्स काही आठवड्यांच्या ट्रेनिंगमध्ये विद्यार्थ्यांना सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट शिकवतात. तुम्ही जर Python, Java किंवा HTML सारख्या भाषांमध्ये प्रोजेक्ट्स तयार करू शकत असाल, तर सहज ₹50,000 ते ₹1.5 लाखांचा पगार मिळवू शकता.
डेटा अॅनालिस्ट
डेटा म्हणजे आजचं सोनं! कंपन्यांना मार्केट ट्रेंड्स समजण्यासाठी डेटा अॅनालिस्टची गरज असते. जर तुम्हाला Excel, SQL किंवा Tableau या टूल्सचं ज्ञान असेल आणि डेटा अॅनालिटिक्सचा सर्टिफिकेट कोर्स केला असेल, तर ही नोकरी तुमच्यासाठी उत्तम पर्याय आहे.
रिअल इस्टेट एजंट
या क्षेत्रात पदवीपेक्षा तुमचं सेलिंग स्किल आणि नेटवर्किंग पॉवर महत्त्वाची असते. जर तुम्ही लोकांशी सहज संवाद साधू शकत असाल, क्लायंटच्या गरजा समजू शकत असाल, तर तुम्ही रिअल इस्टेटमध्ये महिन्याला लाखोंची कमाई करू शकता. थोडक्यात सांगायचं तर, डिग्रीपेक्षा मेहनत, स्किल्स आणि आत्मविश्वास तुम्हाला मोठ्या पगारापर्यंत पोहोचवू शकतात!






