फोटो सौजन्य- सोशल मीडिया
CBSE Portal Issue : नुकतीच सीबीएसईच्या (CBSE) पुनर्मूल्यांकन पोर्टलवर एक मोठी समस्या समोर आली आहे. यामध्ये पेमेंट सिस्टममध्ये अचानक तक्रार आल्याचे दिसून आले आहे. काही विद्यार्थ्यांना पोर्टलवर फी अत्यंत कमी तर काही विद्यार्थ्यांना खूप जास्त रक्कम दाखवली जात होती. या घटनेनंतर सिस्टिमच्या सुरक्षिततेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
यामुळे सर्वात मोठा प्रश्न हा निर्माण झाला आहे की, या घटनेमुळे विद्यर्थ्यांच्या वैयक्तीक डेटा जसे की नाव, पत्ता, फोन नंबर लीक होऊ शकतो का? परंतु, तज्ञ आणि सायबर सुरक्षा विश्लेषकांनुसार, सध्या कोणत्याही विद्यार्थ्यांचा वैयक्तीक डेटा चोरीला गेल्याची किंवा बाहेर आल्याची पुष्टी झालेली नाही. जी समस्या समोर आली आहे, ती प्रामुख्याने पेमेंट गेटवे आणि फि डिस्प्ले सिस्टिमशी संबंधित असल्याचे सांगितले जात आहे.
सायबर तज्ञ राहूल मिश्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार, जर एखाद्या वेबसाईमध्ये सुरक्षिततेच्या त्रुटी राहिल्या तर डेटा लीकचा धोका नेहमीच बनून राहतो. परंतु, याचा अर्थ असा नाही की, प्रत्येक वेळी डेटा चोरी होतोच जर सिस्टीम वेळोवेळी अपडेट केली आणि ‘सिक्युरिटी ऑडिट’ केले तर हा धोका बऱ्याच अंशी कमी होतो.
मिळालेल्या माहितीनुसार, सरकारी आणि मोठ्या डिजिटल पोर्टल्सची सायबर सुरक्षा तपासणी सहसा दर ६ महिन्यांनी होते. यामध्ये सिस्टीममधील त्रुटी शोधून त्या सुधारल्या जातात, जेणेकरून कोणत्याही प्रकारचा सायबर हल्ला रोखता येईल.
आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, जवळपास ५० विद्यार्थ्यांच्या अकाउंटमध्ये फीची रक्कम चुकीची दाखवली गेली. कोणाला खूप कमी तर कोणाला खूप जास्त रक्कम दिसली. ज्यावरून सिस्टीममधील तांत्रिक अस्थिरता स्पष्टपणे दिसून आली आहे.
सीबीएसई आणि तांत्रिक पथके मिळून या संपूर्ण सिस्टिमची तपासणी करत आहेत. शिवाय या कामासाठी आयआयटी तज्ञांच्या पथकाचीही मदत घेतली जात आहे. तसेच सिस्टिम अधिक मजबूत करण्यासाठी आणि सुरक्षा वाढवण्यासाठी पुढील काम केले जात आहे.






