Tech Tips: 24 तास सुरु असतो Wi-Fi Router? तुमची एक चूक अन् होऊ शकतो मोठा ब्लास्ट... असं राहा सुरक्षित
ऊन्हाळ्यात वायफाय राऊटर सतत सुरु असल्यास अनेकदा रीस्टार्ट होऊ लागतात, ज्यामुळे इंटरनेट स्पीड स्लो होते आणि वायफाय योग्य पद्धतीने काम करत नाही. तुमच्या वायफाय राऊटरसोबत देखील असं काही घडत असेल तर समजा की, वायफाय राऊटर ओवरहीटिंगचा इशारा देत आहे. अशा परिस्थितीत ब्लास्ट आणि इतर धोक्यांपासून वाचण्यासाठी राऊटर त्वरित बंद करा. (फोटो सौजन्य – Pinterest)
अनेक घरांमध्ये वायफाय राऊटर 24 तास सुरु असतो. त्यामुळे राऊटर ओवरहीटिंग होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात असते. अशा परिस्थितीत वायफाय राऊटर योग्य ठिकाणी फिट करणं गरजेचं आहे, ज्यामुळे उष्णता बाहेर जाण्यासाठी मदत होईल. यामुळे नेहमी लक्षात ठेवा की, वायफाय राऊटर कधीही बंदिस्त किंवा अरुंद जागेत फिट करू नये. तसेच वायफाय राऊटर थेट सूर्यप्रकाश येणाऱ्या ठिकाणी, टिव्ही, गेमिंग कंसोल किंवा दुसऱ्या इलेक्ट्रिक डिव्हाईसच्या आजूबाजूला लावू नका. यामुळे इंटरनेट स्पीडवर परिणाम होतो.
राऊटरचा दिर्घकाळ वापर करण्यासाठी त्याची योग्य पद्धतीने काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे. राउटरमध्ये असलेले एयर वेंट्स उष्णता बाहेर फेकतात. मात्र जर यामध्ये धूळ, माती जमा झाली असेल तर उष्ण हवा बाहेर फेकली जात नाही. यामुळे डिव्हाईस जास्त गरम होण्याची शक्यता असते. यामुळे वेळोवेळी राऊटर बंद करून वेंट्सची स्वच्छता करणं गरजेचं आहे. एयर वेंट्स स्वच्छ करण्यासाठी कॉम्प्रेस्ड एअर किंवा मऊ कापसाचा बोळा वापरू शकता. तसेच महिन्यातून किमान एकदा राउटर रीस्टार्ट किंवा रीबूट करणं देखील गरजेचं आहे.
योग्य काळजी घेतल्यानंतर देखील वायफाय राऊटर ओव्हरहिट होत असेल तर कूलिंगची व्यवस्था करावी लागणार आहे. यासाठी वायफाय राऊटरजवळ यूएसबी किंवा बॅटरीने चालणारा एक छोटा फॅन लावू शकता. सध्या, अनेक प्रीमियम आणि प्रगत राउटर मॉडेल्समध्ये आधीपासूनच कूलिंग फॅन्स बसवलेले असतात.






