फोटो सौजन्य - Social Media
अरिहंत अकॅडमी या आघाडीच्या कोचिंग संस्थेने एनएसई अकॅडमीच्या सहयोगाने ‘फिनटेक Anylitics प्रोफेशनल्स’ (FAP) हा अभिनव सर्टिफिकेशन प्रोग्राम लाँच केला आहे. हा दोन वर्षांचा कोर्स विद्यार्थ्यांना फिनटेक उद्योगात यशस्वी होण्यासाठी आवश्यक असणाऱ्या कौशल्यांनी सुसज्ज करण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आला आहे.
एफएपी प्रोग्राममध्ये एकूण १३ उद्योग-मान्यताप्राप्त सर्टिफिकेशन्सचा समावेश आहे. यामध्ये एनएसई अकॅडमीकडून ९ आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील चार सर्टिफिकेशन्स मिळणार आहेत. हा अभ्यासक्रम विद्यमान उद्योग गरजांनुसार डिझाइन करण्यात आला आहे, ज्यामुळे विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावर स्पर्धात्मक वाव मिळतो. विशेष म्हणजे, हा प्रोग्राम अरिहंतच्या विद्यमान विद्यार्थ्यांसह बारावी उत्तीर्ण कोणत्याही शाखेतील उमेदवारांसाठी खुला आहे. अरिहंत अकॅडमीचे सह-संस्थापक व अध्यक्ष उमेश पंगम आपला आनंद व्यक्त करत म्हणाले, ”एनएसई अकॅडमीसोबतच्या सहयोगामधून विद्यार्थ्यांना अत्याधुनिक, उद्योग-संबंधित शिक्षण देण्यामधील अरिहंत अकॅडमीचे प्रयत्न दिसून येतात. एफएपी प्रोग्राम फिनटेक प्रोफेशनल्सच्या भावी पिढीला या डायनॅमिक क्षेत्रात प्रगती करण्यासाठी आवश्यक असलेली कौशल्ये आणि ज्ञानासह प्रेरित करण्यासाठी डिझाइन करण्यात आला आहे.”
एफएपी प्रोग्रामचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे प्रत्यक्ष अनुभवावर आधारित शिकवण आणि उद्योगाभिमुख प्रशिक्षण पद्धती. या प्रोग्राममध्ये विद्यार्थ्यांना केवळ सैद्धांतिक ज्ञानच नव्हे, तर व्यावहारिक कौशल्यांचेही प्रशिक्षण दिले जाते. लाइव्ह प्रोजेक्ट्स, रिअल-वर्ल्ड केस स्टडीज, इंडस्ट्री एक्स्पर्ट्ससोबत संवादात्मक सत्रे आणि इंटर्नशिप अशा विविध माध्यमांद्वारे विद्यार्थ्यांना उद्योगाचा थेट आणि सखोल अनुभव दिला जातो. हे सर्व उपक्रम विद्यार्थ्यांना वास्तविक समस्या समजून घेण्याची, त्यावर उपाय शोधण्याची आणि उद्योगाच्या गरजेनुसार निर्णय घेण्याची क्षमता विकसित करतात. या प्रशिक्षणामुळे विद्यार्थ्यांना डेटा अॅनालिस्ट, रिस्क मॅनेजर, प्रॉडक्ट मॅनेजर, फिनटेक कन्सल्टंट यांसारख्या उच्च मागणी असलेल्या आणि करिअरमध्ये स्थिरता व प्रगती देणाऱ्या भूमिका पार पाडण्यास सक्षम बनवले जाते. प्रोग्रामचा उद्देश म्हणजे विद्यार्थ्यांना केवळ नोकरी मिळवण्यासाठी तयार करणे नव्हे, तर त्यांना उद्योगात पुढे जाऊन नेतृत्व करण्यास सक्षम बनवणे हा आहे.
एनएसई अकॅडमीचे सहयोगी उपाध्यक्ष रंगनाथन एस यांनी सांगितले, ”एनएसई अकॅडमीला हा सर्वसमावेशक फिनटेक अॅनालिटिक्स प्रोफेशनल्स प्रोग्राम वितरित करण्यासाठी अरिहंत अकॅडमीसोबत सहयोग करण्याचा आनंद होत आहे. आमचे कौशल्य आणि अरिहंतच्या सर्वोत्तमतेप्रती समर्पिततेला एकत्र करत आम्हाला आत्मविश्वास आहे की हा उपक्रम उच्च कुशल प्रोफेशनल्स घडवेल, जे फिनटेक उद्योगाच्या विकासाप्रती मोठ्या प्रमाणात योगदान देतील.”