कर्नल आणि विंग कमांडरला किती मिळतो पगार (फोटो सौजन्य - Insrtagram)
पाकिस्तानात 7 मे रोजी भारताने एक वादळ आणले आणि जे त्यांच्या जन्मभर लक्षात राहील. ‘ऑपरेशन सिंदूर’अंतर्गत भारतीय सैन्याने ९ दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर मोठा हवाई हल्ला केला. या ऑपरेशनची सर्वात खास गोष्ट म्हणजे देशातील मुलींनीही यात पुढाकार घेतला. यापैकी दोन नावे वेगाने चर्चेत येत आहेत ती म्हणजे लेफ्टनंट कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग.
आता सर्वांना जाणून घ्यायचे आहे की कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग कोण आहेत? त्यांना किती पगार मिळतो आणि कर्नल वा विंग कमांडर करिअर नक्की काय असते. याबाबत आपण या लेखातून माहिती घेऊया.
कर्नल सोफिया कुरेशी कोण आहेत?
कर्नल सोफिया यांचा जन्म १९८१ मध्ये गुजरातमधील वडोदरा येथे झाला. तिने बायोकेमिस्ट्रीमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आणि त्यानंतर ऑफिसर्स ट्रेनिंग अकादमी (OTA) मध्ये प्रशिक्षण घेतल्यानंतर १९९९ मध्ये भारतीय सैन्यात लेफ्टनंट म्हणून रुजू झाली. सैन्यातील त्यांच्या सेवेदरम्यान, त्यांनी केवळ युद्ध क्षेत्रातच नव्हे तर ईशान्य भारतातील पूर मदत कार्यासारख्या मानवतावादी मोहिमांमध्येही उत्कृष्ट योगदान दिले आहे.
टेरिटोरियल आर्मीमध्ये अधिकारी पदासाठी भरती; ‘या’ तारखेपासून अर्ज प्रक्रिया सुरू
कर्नल सोफियाला किती पगार मिळतो?
अहवालांनुसार, कर्नल रँकच्या अधिकाऱ्याचा मूळ पगार दरमहा सुमारे १,२१,२०० ते २,१२,४०० रुपये असतो. पण एवढेच नाही तर त्यांना सरकारकडून अनेक भत्तेदेखील मिळतात. कोणते विशेष भत्ते असतात जाणून घ्या –
विश्वासाचे काम
व्योमिका सिंग १८ डिसेंबर २००४ रोजी २१ व्या शॉर्ट सर्व्हिस कमिशन (महिला) फ्लाइंग पायलट कोर्स अंतर्गत हवाई दलात सामील झाल्या. त्यावेळी कदाचित कोणीही कल्पना केली नसेल की ही महिला अधिकारी एके दिवशी भारतीय हवाई दलाची शान बनेल. त्यांनी आतापर्यंत २५०० तासांहून अधिक उड्डाण पूर्ण केले आहे.
उंच पर्वत असोत, घनदाट जंगल असोत किंवा उष्ण वाळवंट असोत – व्योमिकाने प्रत्येक आव्हानावर मात केली आहे. त्यांनी ‘चेतक’ आणि ‘चित्ता’ सारखी हलकी हेलिकॉप्टर उडवली आहेत, जी कठीण भागात मदत आणि बचाव कार्यासाठी वापरली जातात. २०१७ मध्ये, त्यांना विंग कमांडर पदावर बढती देण्यात आली, जी हवाई दलातील एक महत्त्वाची आणि जबाबदार पद आहे. या दर्जाचे अधिकारी सहसा स्क्वॉड्रन किंवा ऑपरेशनल युनिट्सचे नेतृत्व करतात.
FSL मध्ये वरिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक पदासाठी भरती जाहीर; लवकर करा अर्ज
विंग कमांडर व्योमिकाला किती पगार मिळतो?
भारतीय हवाई दलात विंग कमांडर पदावर तैनात असलेल्या अधिकाऱ्याला दरमहा अंदाजे ९०,००० ते १,२०,००० रुपये पगार मिळतो आणि खालील सुविधा उपलब्ध आहेत