Maharashtra Breaking News Updates Today:
नवी दिल्ली : लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद यांसारख्या निवडणुका पार पडल्या आहेत. त्यानंतर आता राज्यसभेच्या रिक्त झालेल्या जागा भरल्या जाणार आहेत. महाराष्ट्रातील राज्यसभेच्या 7 जागांसाठी दाखल झालेल्या अर्जामुळे निवडणूक बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 7 जागांसाठी नेमके सातच अर्ज दाखल झाले आहेत. त्यामुळे प्रत्यक्ष मतदानाची गरज राहिलेली नाही. बिनविरोधची औपचारिक घोषणा बाकी आहे.
06 Mar 2026 06:52 PM (IST)
पुणे: महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) घेण्यात येणारी महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त मुख्य परीक्षा २०२५ पुढे ढकलण्यात आली आहे. पूर्व परीक्षेचा निकाल उशिरा जाहीर झाल्यामुळे उमेदवारांना तयारीसाठी कमी वेळ मिळत असल्याची दखल घेत आयोगाने गुरुवारी सुधारित वेळापत्रक (Career News) जाहीर केले.
06 Mar 2026 06:43 PM (IST)
गुहागर: समुद्रावर उदरनिर्वाह अवलंबून असलेल्या मच्छीमारांसाठी डिझेल हा सर्वांत महत्त्वाचा आणि खर्चिक घटक मानला जातो. डिझेलच्या वाढत्या दरामुळे यांत्रिक नौकांचे संचालन दिवसेंदिवस महाग होत असताना राज्य शासनाच्या डिझेल प्रतिपूर्ती योजनेमुळे रत्नागिरी जिल्ह्यातील मच्छीमारांना मोठा दिलासा मिळत आहे. सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात या योजनेंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यासाठी आतापर्यंत एकूण २० कोटी १८ लाख ३९ हजार ९७५ रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे.
06 Mar 2026 06:32 PM (IST)
मुंबई/अमरावती: हा अर्थसंकल्प म्हणजे केवळ आकड्यांची फेकाफेकी आणि जनतेच्या डोळ्यांत केलेली धूळफेक आहे. केंद्र सरकारप्रमाणेच राज्य सरकारनेही आता '२०४७'चे गाजर दाखवून महाराष्ट्रातील जनतेची दिशाभूल करण्याचा सपाटा लावला आहे. प्रत्यक्षात पदरात काहीच पडत नाही, पण कागदावर मात्र विकासाचा आभास निर्माण केला जात आहे, अशी टिका काँग्रेस नेत्या, माजी महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी केली.
06 Mar 2026 06:16 PM (IST)
Rahul Gandhi on War : नवी दिल्ली : सध्या इराण विरुद्ध इस्रायल अमेरिका संघर्ष सुरु आहे. (World War 3) मध्यपूर्वेतील युद्ध आता अशा वळणावर पोहोचले आहे जिथून परतणे अशक्य वाटते. इराण आणि इस्रायलमधील संघर्षाने आतापर्यंतचे सर्वात भीषण रूप धारण केले आहे. या देशांमध्ये अडकलेल्या भारतीयांना आणण्याचे प्रयत्न जोरदार सुरु आहेत. लाखो भारतीय विद्यार्थी आणि पर्यटक हे अडकले आहेत, या युद्धाचे पडसाद भारतामध्ये जाणवू लागले आहेत. याच पार्श्वभूमीवर लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
06 Mar 2026 06:05 PM (IST)
CM Devendra Fadnavis on Maharashtra Budget: आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. यामध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा केली आहे. तसेच प्रत्येक गोष्टीसाठी बजेटमध्ये घोषणा करण्यात आली आहे. तसेच अन्य योजना देखील जाहीर करण्यात आल्या आहेत. दरम्यान ठाकरे गटाचे प्रमुख नेते उद्धव ठाकरे यांनी बजेटवर टीका केली आहे.
06 Mar 2026 05:55 PM (IST)
इराण आणि अमेरिका यांच्यातील तणाव आता एका मोठ्या युद्धात बदलला आहे. 28 फेब्रुवारी रोजी अमेरिकेने सुरू केलेल्या ‘ऑपरेशन एपिक फ्युरी’ (Operation Epic Fury) या मोहिमेने आता वेग घेतला असून, अमेरिकन सैन्याने इराणच्या लष्करी पायाभूत सुविधा उद्ध्वस्त करण्यास सुरुवात केली आहे.
06 Mar 2026 05:43 PM (IST)
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात केवळ मोठे आकडे व पोकळ घोषणा आहेत. सरकारने राज्यावर कर्जाचा डोंगर करून ठेवलेला असून ४० हजार कोटी रुपयांच्या तुटीचा हा अर्थसंकल्प महाराष्ट्राला दिवाळखोरीकडे घेऊन जाणारा आहे. अर्थसंकल्पात बुलेट ट्रेन, मेट्रो, भुयारी मार्गांचाच बोलबाला आहे. गाव खेड्यातला गरीब, आदिवासी, कष्टकरी, महिला, बेरोजगार व तरुणांना अर्थसंकल्पात स्थानच नाही. एकंदरीत हा अर्थसंकल्प मोजकी शहरे आणि मोजक्या लोकांसाठीच आहे. सर्वसामान्यांना यातून काहीही मिळणार नाही, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिली आहे.
06 Mar 2026 05:15 PM (IST)
शहरातील पाणीपुरवठा अधिक सक्षम आणि शिस्तबद्ध करण्यासाठी घरगुती तसेच व्यावसायिक नळ कनेक्शनवर मीटर बसवण्याच्या प्रस्तावाला राज्य सरकारने हिरवा कंदील दाखवला आहे. महानगरपालिका प्रशासनाने पाठवलेला हा प्रस्ताव मुंबईत झालेल्या पाणीपुरवठा विभागाच्या बैठकीत अंतिम करण्यात आला असून, लवकरच ४५० कोटी रुपयांची निविदा प्रक्रिया सुरू होणार आहे.
06 Mar 2026 04:50 PM (IST)
मालवाहतूक करणाऱ्या छोट्या टग बोटीची एम-टू-एम रो-रो बोटीला धडक लागल्याने बोटीला चार ठिकाणी होल पडले. त्यामुळे गुरुवारी मुंबईच्या दिशेने मार्गक्रमण करणार असलेली ही प्रवासी बोट विजयदुर्ग बंदरातच दुरुस्तीच्या कामासाठी थांबवण्यात आली. मुंबई प्रवासासाठी सुमारे २० प्रवासी आणि ७ वाहनांची बुकिंग झाली होती. मात्र सेवा बंद राहिल्याने प्रवाशांना माघारी फिरावे लागले. १ मार्चपासून सुरू झालेल्या या सेवेवर कोकणवासीयांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असतानाच ही घटना घडल्याने काही काळासाठी सेवा विस्कळीत झाली आहे. तर संध्याकाळी उशिरा ही रो-रो बोट मुंबईकडे रवाना झाली.
06 Mar 2026 04:45 PM (IST)
अजित पवारांच्या अपघाताप्रकरणी रोहित पवार सीआयडीच्या कार्यालयात दाखल झाले.
रोहित पवारांसह फक्त सात जणांना सीआयडी कार्यालयात आतमध्ये घेतले.
रोहित पवारांचे कार्यकर्ते रविकांत वर्षे आणि CID च्या जाण्यावरून अधिकाऱ्यांमध्ये वादावादी झाली.
06 Mar 2026 04:40 PM (IST)
महाराष्ट्रातील ५२ शेतकाऱ्यांसोबत अकोल्यातील तीन शेतकरी युरोपच्या अभ्यास दौऱ्यावर गेलो होतो. परंतु नेमके परतीच्या वेळी अमेरिकेने इराणवर हल्ला केल्याने युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे अनेक भारतीय आखाती देशांमध्ये अडकले. हे शेतकरी २८ फेब्रुवारीला नेदरलँडमधील अॅमस्टरडॅम शहरातून दिल्लीकडे परतीच्या प्रवासाला निघाले असताना उड्डाणादरम्यान पायलटला युद्धा संदर्भात माहिती मिळाली. संभाव्य धोका टाळण्यासाठी पायलटने सतर्कता दाखवत विमानाचा मार्ग बदलला. वेळापत्रकानुसार दुबईतून आणण्याऐवजी पायलटने ते दुसऱ्या मार्गाने वळवले. यामुळे सर्व ५२ शेतकरी व दोन अधिकारी दिल्ली विमानतळावर एक तास उशिराने सुरक्षित देशात पोहोचू शकले.
06 Mar 2026 04:33 PM (IST)
उरण खोपटे-कोप्रोली रस्त्याचे काम रखडल्यामुळे उडणाऱ्या धुळीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी पूर्व विभागातील ग्रामस्थांनी रविवारी धसाखोशी बस स्टॉपजवळ मूक निदर्शन केले. रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करावे व धूळ कमी करण्यासाठी दररोज पाण्याची फवारणी करावी अन्यथा अधिक तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा नागरिकांनी दिला.
06 Mar 2026 04:30 PM (IST)
अहिल्यानगर शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून सूर्या फाउंडेशन आणि शिवसेना सावेडी उपनगर यांच्या वतीने कुष्ठधाम येथे एका स्तुत्य सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. शिवरायांचे स्वराज्य हे सर्वसामान्यांसाठी होते हा विचार केंद्रस्थानी ठेवून शिवसेना ओबीसी सेलचे जिल्हाप्रमुख चंद्रकांत (काका) शेळके यांच्या पुढाकाराने कुष्ठरुग्णांच्या हस्ते महाराजांची महाआरती करण्यात आली...यावेळी बोलताना शेळके यांनी सांगितले की, केवळ उत्सव साजरे करण्यापेक्षा समाजातील वंचित आणि दुर्बल घटकांना सन्मान मिळवून देणे हीच खरी शिवभक्ती आहे. महाराजांच्या कल्याणकारी विचारांचा वारसा पुढे नेण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमात कुष्ठरुग्णांचा गौरव करून त्यांना अल्पोपहाराचे वाटप करण्यात आले.
06 Mar 2026 04:29 PM (IST)
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक अत्यंत खळबळजनक विधान केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, अमेरिका इराणच्या नौदलाचे (Navy) अस्तित्व पूर्णपणे मिटवून टाकेल. सध्याच्या तणावाच्या परिस्थितीत अमेरिकेने केवळ शब्दच वापरले नाहीत, तर प्रत्यक्ष कारवाईलाही सुरुवात केली आहे. अमेरिकेच्या ‘सेंट्रल कमांड’नुसार, आतापर्यंत त्यांनी इराणच्या ३० पेक्षा जास्त युद्धनौका उद्ध्वस्त केल्या आहेत. यात सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, अमेरिकेने इराणची एक युद्धनौका भारताच्या अगदी जवळ असलेल्या श्रीलंकेच्या किनाऱ्याजवळ पाणबुडीतून टॉर्पेडो डागून बुडवली.
06 Mar 2026 04:28 PM (IST)
06 Mar 2026 04:25 PM (IST)
नवीन नागपूर-व्यापार आणि वित्तीय केंद्र होणार
नागपूर शहराच्या आर्थिक वाढीला चालना देण्यासाठी नवीन नागपूर या नावाने व्यापार आणि वित्तीय केंद्र विकसित करणार
नागपूर शहराच्या विस्तार आणि विकासाला चालना देण्यासाठी नागपूर रिंगरोडला मान्यता देणार अशा महत्वाच्या घोषणा या अर्थसंकल्पात करण्यात आल्या आहेत.
06 Mar 2026 04:25 PM (IST)
फडणवीस म्हणाले की, ‘येत्या 8 मार्च रोजी जागतिक महिला दिनानिमित्त राज्यातील सर्व लाडक्या बहिणींना मी शुभेच्छा देतो. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना अशीच सुरू राहणार आहे. या योजनेकरिता आवश्यक ती भरीव तरतूद करण्यात आलेली आहे. ‘ मुख्यमंत्र्यांनी केलेल्या घोषणेवर विरोधकांनी समोरून काही टिप्पणी केली. ज्यावर फडणवीस म्हणाले की, ‘काळजी करू नका.. तुमच्या मनातील एक-एक गोष्ट आम्हीच पूर्ण करतोय, आम्हीच करत राहणार.. फक्त कोर्टात जाऊ नका. योजनेच्या विरुद्ध कोर्टात जाऊ नका.’
06 Mar 2026 04:25 PM (IST)
राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना प्रगत तंत्रज्ञानाचं मार्गदर्शन करण्यासाठी उपाययोजना करण्यात येणार असल्याचं सांगितलं आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सक्षम करण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आल्या. 'महाविस्तार - एआय' या उपक्रमाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना त्यांच्या बोलीभाषेत पिकानुसार सल्ला, अचूक हवामान अंदाज, किड व रोग व्यवस्थापन तसेच बाजारभाव आणि बाजारपेठेची माहिती उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या उपक्रमाचा लाभ राज्यातील ३० लाखांहून अधिक शेतकऱ्यांना मिळणार आहे.
06 Mar 2026 04:20 PM (IST)
गुंतवणूक म्हणजे महाराष्ट्र अशी ओळख निर्माण केली जाणार
महाराष्ट्राला जागतिक उत्पादन केंद्र तयार करण्याचे उद्दिष्ट
मुख्यमंत्री फडणवीस यांनी सादर केला अर्थसंकल्प
, “महाराष्ट्राला जागतिक उत्पादन केंद्र बनवण्याचे उद्दिष्ट आहे. गुंतवणूक महाराष्ट्र हा व्यासपीठ आम्ही तयार करत आहोत. यामुळे लाखों रोजगार निर्माण होणार आहेत. 1 कोटींची मुख्यमंत्री मत्स्य योजना केली जाणार आहे. संयुत राष्ट्र संघाने ही वर्ष आंतराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष म्हणून घोषित केले आहे.”
06 Mar 2026 04:15 PM (IST)
ठाणे महानगरपालिकेच्या पहिल्याच महासभेत गदारोळ पाहायला मिळाला. त्यामुळे सभागृहात उपस्थित असलेल्या अनेक नगरसेवकांचे प्रश्न तिथे मांडलेच गेले नाही. नवनिर्वाचित नगरसेवक या सर्व प्रकारामुळे गोंधळून गेले होते. याच पार्श्वभूमीवर पुढील महासभेत आपल्या प्रभागातील कोणते प्रश्न सभागृहात मांडणार हे भाजपचे नगरसेवक सुनेश जोशी आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नवनिर्वाचित नगरसेविका पूनम माळी यांना विचारण्यात आले.
06 Mar 2026 04:12 PM (IST)
राज्याचा अर्थसंकल्प आजा सादर करण्यात आला. या अर्थसंकल्पात सरकारने आज कर्जमाफीची घोषणा केली मात्र या कर्जमाफीने आम्ही समाधानी नाही. असं मत रविकांत तुपकर यांनी मांडलं आहे. विधानसभा निवडणुका होऊन दीड वर्ष झाले आणि आता सरकारला जाग आली तेही शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे. शेतकऱ्यांना दोन लाखापर्यंत नको तर पाच लाखापर्यंतचे कर्ज शेतकऱ्यांचं माफ व्हायला पाहिजे, असंही तुपकर म्हणाले.
06 Mar 2026 04:10 PM (IST)
खेड तालुक्यातील लोटे एमआयडीसी परिसरातील खान कंपनीत मोठा स्फोट झाल्याची घटना घडली आहे.या स्फोटात ४ ते ५ कामगार आगीत होरपळल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.जखमी कामगारांना तातडीने लोटे येथील परशुराम हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.स्फोटाचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी रवाना झाले असून पुढील मदत व बचावकार्य सुरू आहे.
06 Mar 2026 04:03 PM (IST)
देवेंद्र फडणवीसांनी आज राज्याचा अर्थसंकल्प जाहीर केला. या दरम्यान फडणवीसांनी दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले की, अजितदादांचं भव्य स्मारक उभारणार आहे. तसंच अजितदादांच्या नावे गतिमान नागरी पुरस्कार देण्याची घोषणाही फडणवीसांनी जाहीर केली.
06 Mar 2026 03:50 PM (IST)
आजच्या भारतात अनेक मंडळी परदेशात शिकून सावरण्यासाठी जात असतात. फक्त श्रीमंत घराची मुलं नव्हे तर अगदी मध्यम वर्गातील पालकही कर्ज काढून आपल्या पाल्याला उच्च शिक्षणासाठी आणि उज्वल भवितव्यासाठी देशाच्या बाहेर पाठवतात. जर तुमचीही अशी काय इच्छा असेल तर हा लेख तुमच्यासाठी! कारण जर देशाबाहेर जाताय तर नोकरीही तिथलीच मिळणे फार आवश्यक आहे आणि फायद्याचे आहे अन्यथा बाहेरगावात शिकाल आणि नोकरीला पुन्हा भारतात याला तर हे काही पटण्यासारखे नाही.
06 Mar 2026 03:45 PM (IST)
Cm Devendra Fadnavis On Farmers: आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या अर्थसंकल्प सादर केला. यामध्ये मुख्यमंत्री फडणवीस यांनी अनेक घोषणा केल्या आहेत. त्यामध्ये शेतकऱ्यांसाठी अनेक घोषणा करण्यात आल्या आहेत. यामध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफीची घोषणा देखील करण्यात आली आहे. अर्थसंकल्प सादर करत असताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसंदर्भात मोठी घोषणा केली आहे. कर्जमाफी करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली आहे. तसेच ३० सप्टेंबर 2025 पर्यन्त पीक कर्ज थकीत असलेल्या शेतकऱ्यांना 2 लाखापर्यंतचे कर्जमाफी देण्याची घोषणा करण्यात आली आहे. फडणवीस यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना जाहीर केली आहे. यामुळे ज्यांचे 2 लाखापर्यंतचे कर्ज थकीत आहे त्यांना आता कर्जमाफी मिळणार आहे.
06 Mar 2026 03:40 PM (IST)
Maharashtra Budget 2026: महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत अर्थसकंल्पाला मंजुरी देण्यात आली. यामध्ये दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अविरत कार्यासाठी आर्थिक वर्ष २०२६-२७ चे अर्थसंकल्प समर्पित करण्यात आले. तसेच, शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी दिलासादायक घोषणा मुख्यमंत्र्यांनी केल्या आहेत. यामध्ये लाडकी बहीण योजना, ण्यश्लोक अहिल्याबाई होळकर कर्जमाफी योजना यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे यंदाचा अर्थसंकल्प डिजिटल पद्धतीने मांडण्यात येत आहे. तसेच, दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवारांचे स्मारक उभारण्यात येणार आहे.
06 Mar 2026 03:40 PM (IST)
दक्षिण भारतीय अभिनेता नागा चैतन्य त्याच्या आगामी “वृषकर्मा” चित्रपटामुळे चर्चेत आहे. गुरुवारी या चित्रपटाचा प्रमोशनल कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. पत्रकारांशी संवाद साधण्यापूर्वीच अभिनेत्याचा एक छोटासा अपघात झाला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये, पत्रकार परिषद सुरू होण्यापूर्वी नागा चैतन्य त्याच्या खुर्चीजवळ आला. तो खुर्चीवर बसला आणि नंतर ती उलटून जमिनीवर पडला. अभिनेता खुर्चीवरून पडताच अनेक लोक त्याच्या मदतीला धावले. पण तो कोणत्याही मदतीशिवाय उठला. तो हसला आणि घटनेकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर कार्यक्रम सुरू झाला.
06 Mar 2026 03:20 PM (IST)
भविष्यात AI ची काय जागा असेल? AI मुळे माणसांची काय जागा असेल? असे प्रश्न पडणे स्वाभाविक आहे. AI मुळे अनेकांच्या नोकऱ्या जातीलही आणि नव्या संधी येतीलदेखील! कारण AI हे एक तंत्रज्ञान आहे. ते स्वतः चालत नाही तर त्याला चालवावे लागते. मग नक्कीच ते चालवण्यासाठी कुणीतरी सहाय्यक लागणारच त्यामुळे पूर्णपणे घाबरण्याची काहीच आवश्यकता नाही. एक नोकरी पूर्ण युगभर टिकत नाही तर त्यात बदल होतच असतात आणि हा त्यातीलच एक सामान्य बदल आहे.
06 Mar 2026 03:10 PM (IST)
कर्मचाऱ्यांसाठी सुट्टी मागणे म्हणजे कोणत्या आव्हानाहून कमी नाही. सुट्टी अप्रूव्ह करण्यासाठी मेल करा, कारण सांगा, ते कारण खरं आहे असं पटवून या बऱ्याच गोष्टींचा सामना कर्मचाऱ्यांना करावा लागतो. अशात अलिकडेच उत्तर प्रदेशातील लखनऊमधील एका लोको पायलटचा व्हिडिओ सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. मूळव्याध शस्त्रक्रियेनंतर डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिला असतानाही कर्मचारी आपली सुट्टी वाढवण्यासाठी जेव्हा वरिष्ठांकडे गेला तेव्हा त्यांनी त्याची ही रजा नाकारली. आरोग्याच्या कारणास्तव असणारी रजा वरिष्ठांनी कोणताही विचार न करता नाकारली ज्याच्या परिणाम स्वरुपी कर्मचाऱ्याचे मोठे पाऊल उचलले. या घटनेचा व्हिडिओ आता सोशल मिडियावर चांगलाच शेअर केला जात आहे.
06 Mar 2026 03:03 PM (IST)
CM Devendra Fadnavis Live: आज राज्याचा अर्थसंकल्प सादर केला जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला आहे. या अर्थसंकल्पात अनेक घोषणा करण्यात आल्या आहेत. शेतकऱ्यांसाठी देखील मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्री फडणवीस यांनी यंदाच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी काय काय घोषणा केल्या आहेत, ते जाणून घेऊयात. यंदाचा अर्थसंकल्प शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवून मांडण्यात आल्याचे दिसून येत आहे. शेतकरी आणि ग्रामीण भागाच्या विकासासाठी अनेक घोषणा करण्यात आल्या आहेत. शेतकऱ्यांच्या सुरक्षेला प्राधान्य दिले गेले असल्याचे पाहायला मिळत आहे.
06 Mar 2026 02:50 PM (IST)
पाश्चिम आशियातील इराण आणि इस्त्राईल यांच्यात पेटलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे जागतिक बाजारपेठेत अस्थिरता निर्माण झाली असून, याचे गंभीर परिणाम कोल्हापूरच्या औद्योगिक क्षेत्रावर, विशेषतः फाऊंड्री उद्योगावर होताना दिसत आहेत. इंधन दरवाढ आणि लॉजिस्टिकमधील अडथळ्यांमुळे कोल्हापूरच्या उत्पादनांचा खर्च वाढणार असून, याचा फटका सामान्य ग्राहकांना वाहनांच्या वाढीव किमतीच्या रूपाने बसण्याची शक्यता आहे. कोल्हापूर जिल्ह्यात साधारणतः ४०० ते ५०० फाऊंड्री कार्यरत आहेत.
06 Mar 2026 02:40 PM (IST)
2026 मधील सर्वाधिक चर्चेत असलेल्या चित्रपटांपैकी एक असलेला ‘पेड्डी’ हा चित्रपट जाहीर झाल्यापासूनच प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण करत आहे. या चित्रपटात राम चरण मुख्य भूमिकेत असून दिग्दर्शन बुची बाबू सना यांनी केले आहे. त्यांच्यासोबत जान्हवी कपूर आणि जगपती बाबू महत्त्वाच्या भूमिकांमध्ये झळकणार आहेत.
06 Mar 2026 02:35 PM (IST)
मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) माध्यमातून सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी आणि शहराच्या पायाभूत सुविधांचा वेग वाढवण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. प्रशासनाने पाणीपट्टी, नालेसफाई, फेरीवाल्यांवरील कारवाई आणि भ्रष्टाचारावर नियंत्रण मिळवण्यासाठी महायुती सरकारने ठोस पावले उचलली आहेत. मुंबईकरांवरील कराचा बोजा कमी करण्याच्या उद्देशाने वार्षिक ८ टक्के पाणीपट्टी वाढ रद्द करण्याचे धोरण विचाराधीन आहे.
06 Mar 2026 02:30 PM (IST)
सह्याद्री व्याघ्र प्रकल्प व चांदोली अभयारण्य परिसरातील शिराळा तालुक्यासह लगतच्या गावांमध्ये वन्य प्राण्यांचा उपद्रव मोठ्या प्रमाणात वाढला असून शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. गवे, रानडुक्कर, माकडे, मोर तसेच बिबट्यांमुळे शेतकऱ्यांची पिके उद्धवस्त होत असून मानवी जीवितालाही धोका निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर शासनाने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी वन्य प्राणी हल्ला प्रतिबंध व शेतकरी संरक्षण जनचळवळीचे तानाजी सावंत यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
06 Mar 2026 02:25 PM (IST)
भारताच्या शिक्षण परिसंस्थेत AI चा स्वीकार वेगाने वाढवण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकत, भारती एअरटेल फाउंडेशनने जागतिक स्तरावरील ना-नफा संस्थेच्या CK-12 फाउंडेशनसोबत भागीदारी केली आहे. या भागीदारीअंतर्गत, K–12 स्तरावरील सर्व शिक्षकांसाठी 45 पेक्षा अधिक AI-सक्षम अध्यापन साधनांचे TheTeacherApp मध्ये एकत्रीकरण करण्यात आले आहे. सध्या देशभरातील 2 लाखांहून अधिक शिक्षक वापरत असलेले TheTeacherApp हे आयुष्यभर मोफत असलेले डिजिटल शिक्षण व्यासपीठ आहे.
06 Mar 2026 02:20 PM (IST)
मध्यपूर्वेतील युद्धाचा वणवा (US-Israel Iran War) आता अशा टोकाला पोहोचला आहे जिथे मुत्सद्देगिरीचे सर्व मार्ग बंद होताना दिसत आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) आणि इस्रायल इराणमध्ये ‘ग्राऊंड ऑपरेशन’ म्हणजेच जमिनीवरील लष्करी कारवाई करण्याची तयारी करत असतानाच, इराणने अत्यंत कठोर शब्दांत प्रत्युत्तर दिले आहे. इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी एनबीसी (NBC) ला दिलेल्या एका स्फोटक मुलाखतीत स्पष्ट केले की, इराण आता कोणत्याही परिस्थितीत युद्धबंदीची (Ceasefire) मागणी करणार नाही.
06 Mar 2026 02:15 PM (IST)
अमेरिका, इस्रायल आणि इराणमधील वाढत्या तणावाचा सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय आहे. अमेरिका आणि इस्रायलने अलिकडेच इराणवर केलेल्या हल्ल्यात देशाचे सर्वोच्च नेते अली खामेनेई आणि त्यांच्या कुटुंबातील अनेक सदस्यांचा मृत्यू झाला. या बातमीनंतर, अनेक देशांमधील शिया मुस्लिमांनी शोक व्यक्त केला आणि निदर्शने केली. परंतु, काहींनी त्यांच्या मृत्यूबद्दल आनंद व्यक्त केला. तसेच आता अभिनेत्री मंदाना करिमी यांनी सोशल मीडियावर आपले मत मांडले आहे, हे आता चर्चेत आले आहे.
06 Mar 2026 02:06 PM (IST)
मित्रांसह केलेला प्रवास म्हणजे केवळ ठिकाणं बदलणं नव्हे, तर नाती अधिक घट्ट होण्याचा आणि आयुष्य नव्याने जगायला शिकवणारा अनुभव असतो. हाच अनुभव मोठ्या पडद्यावर मांडणारा ‘सखे गं साजणी’ हा नवा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. मराठी चित्रपटसृष्टीत मैत्री आणि जीवनातील नात्यांची नवी कहाणी घेऊन येणारा ‘सखे गं साजणी’ हा चित्रपट ३ एप्रिल २०२६ रोजी प्रदर्शित होणार असून, नुकताच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. टीझरमधून तीन मित्रांच्या आयुष्यातील प्रवास, त्यांची मैत्री आणि भावनिक क्षणांची झलक प्रेक्षकांना पाहायला मिळते.
06 Mar 2026 01:55 PM (IST)
भारताच्या शिक्षण परिसंस्थेत AI चा स्वीकार वेगाने वाढवण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकत, भारती एअरटेल फाउंडेशनने जागतिक स्तरावरील ना-नफा संस्थेच्या CK-12 फाउंडेशनसोबत भागीदारी केली आहे. या भागीदारीअंतर्गत, K–12 स्तरावरील सर्व शिक्षकांसाठी 45 पेक्षा अधिक AI-सक्षम अध्यापन साधनांचे TheTeacherApp मध्ये एकत्रीकरण करण्यात आले आहे. सध्या देशभरातील 2 लाखांहून अधिक शिक्षक वापरत असलेले TheTeacherApp हे आयुष्यभर मोफत असलेले डिजिटल शिक्षण व्यासपीठ आहे.
06 Mar 2026 01:44 PM (IST)
सह्याद्री व्याघ्र प्रकल्प व चांदोली अभयारण्य परिसरातील शिराळा तालुक्यासह लगतच्या गावांमध्ये वन्य प्राण्यांचा उपद्रव मोठ्या प्रमाणात वाढला असून शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. गवे, रानडुक्कर, माकडे, मोर तसेच बिबट्यांमुळे शेतकऱ्यांची पिके उद्धवस्त होत असून मानवी जीवितालाही धोका निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर शासनाने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी वन्य प्राणी हल्ला प्रतिबंध व शेतकरी संरक्षण जनचळवळीचे तानाजी सावंत यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनात म्हटले आहे की, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प व चांदोली अभयारण्याच्या परिसरातील अनेक गावांमध्ये वन्य प्राण्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. गवे, रानडुक्कर व माकडांच्या कळपांमुळे शेतकऱ्यांची भात, ज्वारी, भुईमूग, मका, ऊस तसेच इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. शेतकरी वर्षभर कष्ट करून उभे केलेले पीक एका रात्रीत नष्ट होत असल्याने अनेक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत.
06 Mar 2026 01:30 PM (IST)
भारत आणि श्रीलंकेत होणाऱ्या २०२६ च्या टी२० विश्वचषकासाठी आयसीसीने प्लेअर ऑफ द टूर्नामेंटसाठी नामांकन जाहीर केले आहे. या विजेतेपदासाठी एकूण आठ खेळाडू दावेदार आहेत. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, अंतिम फेरीत पोहोचलेल्या भारत आणि न्यूझीलंडमधील फक्त तीन खेळाडूंचा या यादीत समावेश करण्यात आला आहे. प्लेअर ऑफ द टूर्नामेंटच्या नामांकनांमध्ये न्यूझीलंडचे दोन आणि भारताचा एक खेळाडू आहे. पहिल्या सेमीफायनलमध्ये न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेचा नऊ विकेट्सने पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला.
06 Mar 2026 01:20 PM (IST)
जगभरात ब्रेस्ट कॅन्सरचे (स्तनाचा कर्करोग) रुग्ण सात्तत्याने वाढत आहेत आणि त्याचा परिणाम भारतातही वेगाने दिसून येत आहे. एका जागतिक अभ्यासानुसार, १९९० पासून भारतात स्तनाच्या कर्करोगाच्या मृत्यूंमध्ये अंदाजे ७४ टक्क्यांनी वाढ झाली आहे. बदलती जीवनशैली, उशिरा निदान आणि आरोग्यसेवेची मर्यादित उपलब्धता ही याची प्रमुख कारणे असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. अहवालानुसार, २०२३ मध्ये जगभरात स्तनाच्या कर्करोगाचे अंदाजे २३ लाख नवीन रुग्ण नोंदवले जातील, असा अंदाज आहे की २०५० पर्यंत हो संख्या ३५ लाखपिक्षा जास्त होऊ शकते. त्याचप्रमाणे, स्तनाच्या कर्करोगामुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या देखील वाढण्याची अपेक्षा आहे.
06 Mar 2026 01:10 PM (IST)
मध्यपूर्वेतील युद्ध आता अशा वळणावर पोहोचले आहे जिथून परतणे अशक्य वाटते. इराण आणि इस्रायलमधील संघर्षाने (US-Israel Iran War) आतापर्यंतचे सर्वात भीषण रूप धारण केले आहे. इस्रायली संरक्षण दलाने (IDF) दिलेल्या माहितीनुसार, इराणने आता त्यांच्यावर ‘क्लस्टर बॉम्ब’ (Cluster Bombs) सज्ज असलेल्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचा मारा सुरू केला आहे. या प्रगत शस्त्रास्त्रांमुळे तेल अवीवसह इस्रायलच्या अनेक शहरांमध्ये हाहाकार माजला असून, या तंत्रज्ञानामुळे जागतिक महासत्तांमधील ‘शस्त्र युद्धा’चे नवीन पैलू समोर येत आहेत.
06 Mar 2026 11:53 AM (IST)
आसाममध्ये भारतीय हवाई दलाचे सुखोई-३०एमकेआय लढाऊ विमान कोसळल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातात दोन वैमानिकांचा मृत्यू झाल्याचेही सांगितले जात आहे. भारतीय हवाई दलाने या अपघातात स्क्वाड्रन लीडर अनुज आणि फ्लाइट लेफ्टनंट पूर्वेश दुरागकर यांचा मृत्यू झाल्याची पुष्टी केली आहे. हे विमान नियमित प्रशिक्षण मोहिमेवर होते आणि जोरहाट येथून उड्डाण घेतल्यानंतर आसामच्या कार्बी आंगलोंग भागात कोसळले. अपघातानंतर परिसरात शोध आणि बचाव कार्य सुरू करण्यात आले आहे, तर हवाई दलाने घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.
06 Mar 2026 11:43 AM (IST)
मध्यपूर्वेतील युद्धाने ( US-Israel Iran War) आता सर्वात भीषण वळण घेतले आहे. अमेरिकन सैन्याने शुक्रवारी सकाळी इराणच्या नौदलाला सर्वात मोठा धक्का दिला आहे. इराणचे सर्वात प्रगत आणि फिरते ड्रोन लाँचिंग स्टेशन मानले जाणारे ‘आयआरआयएस शाहिद बघेरी’ (IRIS Shahid Bagheri) हे जहाज अमेरिकेने उद्ध्वस्त केले आहे. अमेरिकेच्या या कारवाईमुळे इराणच्या ड्रोन हल्ल्यांची क्षमता निम्मी झाल्याचे मानले जात असून, या हल्ल्याचा एक ब्लॅक-अँड-व्हाइट व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये हे अवाढव्य जहाज ज्वाळांमध्ये वेढलेले दिसत आहे.
06 Mar 2026 11:33 AM (IST)
२०२३ मध्ये आलेल्या “द केरळ स्टोरी” या चित्रपटाच्या यशानंतर, निर्माते विपुल अमृतलाल शाह यांनी आता “द केरळ स्टोरी २” हा सिक्वेल प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे, जो २७ फेब्रुवारी रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. मागील चित्रपटाचे दिग्दर्शन सुदीप्तो सेन यांनी केले होते, परंतु यावेळी त्याचे दिग्दर्शन कामाख्या नारायण सिंह यांनी केले आहे. हा नवीन चित्रपट त्याच्या आधीच्या चित्रपटासारखा बॉक्स ऑफिसवर चांगला कामगिरी करत नसला तरी, त्याने फक्त एका आठवड्यात त्याच्या बजेटच्या जवळपास ८० टक्के रक्कम वसूल केलेली दिसून येत आहे.
06 Mar 2026 11:23 AM (IST)
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या व्यापार धोरणांना कायदेशीर धक्का बसला आहे, ज्याचे पडसाद जागतिक बाजारपेठेत उमटले आहेत. अमेरिकेच्या व्यापार इतिहासात कदाचित पहिल्यांदाच, इतकी मोठी उलथापालथ पाहायला मिळत आहे, सरकारला स्वतःच्या धोरणांमुळे अब्जावधी डॉलर्स परतफेड करण्याची शक्यता आहे. हा मुद्दा केवळ राजकीय पराभव नाही तर त्याचा थेट परिणाम अमेरिकेशी आणि जागतिक अर्थव्यवस्थेशी व्यापार करणाऱ्या कंपन्यांवर होईल. न्यूयॉर्कमधील संघीय न्यायाधीश रिचर्ड ईटन यांनी अलीकडेच एक महत्त्वपूर्ण निर्णय दिला.
06 Mar 2026 11:13 AM (IST)
बिग बॉस १७ मधील माजी स्पर्धक अनुराग डोभाल हा एक प्रसिद्ध युट्यूबर आहे जो त्याच्या चाहत्यांमध्ये द यूके०७ रायडर म्हणून ओळखला जातो. अनुराग सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे.सध्या तो एका व्हिडिओमुळे चर्चेत आला आहे, ज्यामध्ये त्याने त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल अनेक खळबळजनक खुलासे केले आहेत आणि त्याच्या पालकांवर आणि भावावर गंभीर आरोप केले आहेत. अनुराग डोभालचा आरोप असलेला व्हिडिओ प्रसिद्ध झाल्यानंतर, त्याचा भाऊ कलाम डोभालने अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. त्याने युट्यूबरने त्याच्या पत्नीवर केलेल्या कथित हल्ल्याबद्दलचे काळे सत्य देखील उघड केले आहे.
06 Mar 2026 11:03 AM (IST)
मध्यपूर्वेतील इराण आणि अमेरिका (Israel Iran war) यांच्यातील युद्धाने संपूर्ण जगाची तेल पुरवठा साखळी विस्कळीत झाली असतानाच, भारतासाठी एक अत्यंत दिलासादायक बातमी समोर आली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प(Donald Trump) यांच्या प्रशासनाने भारताला रशियाकडून कच्चे तेल खरेदी करण्यासाठी ३० दिवसांची तात्पुरती मुभा दिली आहे. जागतिक बाजारपेठेत इंधनाचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि भारताची वाढती निकड लक्षात घेऊन अमेरिकेने आपल्या कठोर निर्बंधांमधून ही विशेष सवलत जाहीर केली आहे.
06 Mar 2026 10:35 AM (IST)
इंग्लंडच्या २२ वर्षीय जेकब बेथेलने भारताविरुद्धच्या टी२० विश्वचषक उपांत्य सामन्यात खेळलेला एक डाव दीर्घकाळ लक्षात राहील. भारत विरुद्ध इंग्लंड ‘महामुकाबले’ सामन्यात जेकब बेथेलने २५४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना एक तुफानी शतक झळकावले. एकेकाळी, या २२ वर्षीय खेळाडूने १.४ अब्ज भारतीयांच्या हृदयाचे ठोके वाढवले होते, परंतु तो इंग्लंडला अंतिम रेषा ओलांडण्यास मदत करू शकला नाही आणि सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने हा सामना ७ धावांनी जिंकला आणि सलग दुसऱ्यांदा अंतिम फेरीत प्रवेश केला.






