फोटो सौजन्य - Social Media
UPSC देशातील जरी कठीण परीक्षा असली तर मानवाला देवाने असा मेंदू दिला आहे, जो इतर प्राण्यांमध्ये सापडत नाही. मानव कठीणातली कठीण गोष्ट अगदी सोपी करून घेऊ शकतो. मानवी शक्कल लढवली गेली तर अनेक गोष्टी सोप्या होतात. अशीच काही शक्कल विभोरने लढवली. त्याची कथा अनेकांसाठी आदर्श घेण्यासारखीच आहे. त्याने हे शक्य केले आहे की कोचिंगसाठी लाखो न घालवता, मनात जिद्द आणि स्वप्न ठेऊनदेखील ध्येय साध्य करता येतात.
उत्तर भारताचा पट्ठ्या विभोर भारद्वाज मध्यम वर्गीय कुटुंबातून येतो. लहानपानपासून जनसेवेचे भावना त्याच्या मनात होती. अभ्यासातही तसा तो फार हुशार होता. दहावीला ८८% प्राप्त करत त्याने अभ्यासाला आणखीन जोर लावला आणि HSC ९१%ने प्राप्त केली. पुढचं शिक्षण त्याने दिल्ली विद्यापीठातून घेतले. BSC आणि MSC त्याने प्रथम क्ष्रेणीत पास केले.
जनसेवेचे भावना त्याला स्वस्थ बसून देत नव्हती.. महत्वाचे म्हणजे त्याने Msc करताना फिजिक्ससारखा विषय अतिशय सोप्या पद्धतीने हाताळला होता. यामुळे त्याला UPSC सारख्या कठीण [परीक्षेला उत्तीर्ण करण्याची प्रखर इच्छा झाली होती. त्याने त्यासाठी फार mehnat घेतली. तिसऱ्या प्रयत्नात त्याने ही UPSC परीक्षा उत्तीर्ण केली. महत्वाचे म्हणजे त्याने ऑनलाईन क्लासेस आणि स्वतः तयार केलेले नोट्स याच्या आधारे संपूर्ण अभ्यास केला. तंत्रज्ञानाचा पुरेपूर वापर केला आणि दिवस रात्र कष्ट करून UPSC सारखी कठीण परिकसह पात्र केली.
विभोरने त्याच्या कुटुंबासहित गावाचाही नाव मोठे केले आहे. त्याच्या या यशामुळे त्याच्या गावातील लोक फार खुश आहेत. मनामध्ये असणारा जनसेवेचा भाव त्याने सार्थकी लावला. IAS पदासाठी त्याने AI वापरून अभ्यास केल्याने, त्याच्या बुद्धिमत्तेसाठी त्याचे फार कौतुक केले जात आहे.