मोहम्मद शामी (फोटो- ians)
जसप्रीत बुमराह फिट नसल्यामुळे सिरिजमध्ये खेळू शकणार नाही. मात्र त्याच्या जागी बदली खेळाडू म्हणून मोहम्मद शामीला संधी दिली जाऊ शकते असे वाटत होते. मात्र असे न करता नबीला बुमराहच्या जागी संधी देण्यात आली. त्यामुळे मोहम्मद शामीचे भारतीय संघात पुनरागमन होणे आता अशक्य असल्याचे म्हटले जात आहे. मात्र आपण भारताकडून खेळणार असा विश्वास शामीने व्यक्त केला आहे.
एका मुलाखतीमध्ये बोलताना मोहम्मद शामीने आपली प्रतिक्रिया दिली आहे. ‘मला विश्वास आहे की मला संधी मिळेल. मी खूप मेहनत घेत आहे. कठोर परिश्रम करत आहे. मी पुढील विश्वचषक खेळण्याची तयारी देखील करत आहे. वर्ल्डकप संघात मला खेळायचे आहे. यसाती मी अतोनात कष्ट करत आहे. मी प्रयत्न करत राहणार. संधी द्यायची की नाही हे निवड समिती ठरवेल.
IND Vs SL: श्रीलंकेला बुडवायला Team India चा दौरा सुरू! खेळाडूंचे जल्लोषात स्वागत, 7 ऑगस्टपासून…
2025 मध्ये मोहम्मद शामी आपला शेवटचा इंटरनॅशनल सामना खेळला आहे. 2023 नंतर शामी भारताकडून एकही टेस्ट खेळलेला नाहीये. तो आपला शेवटचा वनडे न्यूझीलंडविरुद्ध खेळला होता. फिटनेसच्या कारणांमुळे शामी भारतीय संघाबाहेर गेला होता. मात्र गेल्या एक वर्षांपासून देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करून देखील त्याला भारतीय संघात स्थान न देण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
IND Vs SL: श्रीलंकेचा धूर निघणार! टेस्ट सिरिजसाठी Team India ची घोषणा; Bumrah लावणार आग तर…
भारतीय क्रिकेट संघ आगामी महत्त्वाच्या कसोटी मालिकेसाठी श्रीलंकेत दाखल झाला आहे. श्रीलंका क्रिकेट बोर्डाकडून भारतीय संघाचे पारंपरिक पद्धतीने आणि जंगी स्वागत करण्यात आले. या स्वागताचे खास फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आले असून, यामध्ये भारतीय खेळाडू अत्यंत आनंदी दिसून येत आहेत.






