बीट कच्चे खावे की शिजवून? 'या' व्यक्तींनी चुकूनही करू नये बीटचे सेवन, अन्यथा उद्भवतील किडनी स्टोन आणि अपचनाच्या समस्या
बीट खाण्याचे फायदे?
बीट कच्चे खावे की शिजवून?
बद्धकोष्ठता आणि किडनी स्टोनचा धोका असल्यास बीट खावे की नाही?
धावपळीच्या जीवनशैलीमुळे शरीराकडे खूप जास्त दुर्लक्ष होते. जीवनशैलीतील चुकीच्या सवयी, वाढलेला तणाव, पोषक घटकांची कमतरता, पाण्याची कमतरता इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम शरीरावर लगेच दिसून येतो. वारंवार दुर्लक्ष केल्यामुळे शरीरावर नकळतपणे खूप मोठा परिणाम होतो.रोजच्या आहारात होणारे छोटे मोठे बदल शरीरावर गंभीर परिणाम करतात. धावपळीच्या जीवनशैलीमुळे शरीरात वाढलेला थकवा, अशक्तपणा कमी करण्यासाठी बीट खाण्याचा सल्ला दिला जातो. बीट खाल्ल्यामुळे रक्तातील हिमोग्लोबिनची पातळी वाढते. लालचुटुक बीट शरीरासाठी वरदान मानले जाते. यामध्ये फायबर, फोलेट, पोटॅशियम, विटामिन सी आणि नैसर्गिक नायट्रेट्स इत्यादी अनेक घटक मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. तसेच शरीरात निर्माण झालेली रक्ताची कमतरता भरून निघते.(फोटो सौजन्य – istock)
बाजारातून बीट विकत आणल्यानंतर ते कच्चे खावे की शिजवून असे अनेक प्रश्न कायमच निर्माण होतात. काहींना बीट कच्चे खायला आवडते तर काहींना शिजवलेले बीट खायला खूप जास्त आवडते. कच्चे बीट खाल्ल्यामुळे त्यातील विटामिन सी शरीराला पूर्णपणे मिळते. पण शिजवलेले बीट सहज पचन होते. अनेकांना शिजवलेले बीट खाल्ल्यानंतर गॅस, अपचन किंवा बद्धकोष्ठतेचा त्रास होतो. त्यामुळे बीट शिजवताना त्याला हलकीशी वाफ काढून खावे. जास्त शिजवलेले बीट खाल्ल्यास त्यातील आवश्यक पोषक घटक नष्ट होऊन जातात.
इरिटेबल बॉवेल सिंड्रोम असलेल्या रुग्णांनी बीटचे सेवन अतिशय कमी प्रमाणात करावे. कारण जास्त बीट खाल्ल्यास पोट फुगणे किंवा पोटात गॅस होण्याची जास्त शक्यता असते. जुनाट बद्धकोष्टता असलेल्या व्यक्तींसाठी बीट खाणे फायदेशीर ठरू शकते. कारण यामध्ये असलेले फायबर आणि इतर आवश्यक पोषक घटक आतड्यांमधील घाण बाहेर काढून टाकतात. बीटमध्ये नैसर्गिकरित्या ऑक्सलेट्सचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे किडनी स्टोन असलेल्या व्यक्तींनी बीट खाण्याआधी डॉक्टरांचा सल्ला आवर्जून घ्यावा.
दारू बरोबर खाणाऱ्या स्नॅक्सना ‘चकना’ का म्हणतात? केंव्हापासून पडली ही ‘दारू विथ चकना’ची पद्धत?
शरीरात निर्माण झालेली रक्ताची कमतरता भरून काढण्यासाठी बीट खाण्याचा सल्ला कायमच दिला जातो. पण हा खूप मोठा गैरसमज आहे. बीटमध्ये लोह आढळून येते, पण इतर पदार्थांच्या तुलनेत अतिशय कमी लोह असते. लोहाची कमतरता किंवा अॅनिमिया झाल्यानंतर केवळ बीटवर नाहीतर डाळी, कडधान्ये, हिरव्या पालेभाज्या आणि विटामिन सी युक्त पदार्थांचे सेवन करणे सुद्धा तितकेच आवश्यक आहे. या पदार्थांमध्ये लोहाचे प्रमाण खूप जास्त असते.
Ans: दोन्ही प्रकारे बीट खाता येते. कच्च्या बीटमध्ये काही उष्णतासंवेदनशील पोषक घटक अधिक टिकून राहतात, तर शिजवल्याने ते पचण्यास काही लोकांसाठी सोपे होऊ शकते.
Ans: ज्यांना किडनी स्टोनचा इतिहास आहे, विशेषतः कॅल्शियम ऑक्सलेट स्टोन होण्याची प्रवृत्ती आहे, त्यांनी डॉक्टर किंवा आहारतज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार बीटचे सेवन मर्यादित ठेवावे. बीटमध्ये ऑक्सलेटचे प्रमाण तुलनेने जास्त असते.
Ans: काही व्यक्तींना जास्त प्रमाणात बीट खाल्ल्यास पोट फुगणे, गॅस किंवा अपचनाचा त्रास जाणवू शकतो. त्यामुळे सुरुवातीला कमी प्रमाणात सेवन करणे योग्य ठरते.






