फोटो सौजन्य - Social Media
१२ वी कॉमर्स नंतर बऱ्याचदा विद्यार्थ्यांना प्रश्न पडतो की ‘आता पुढे काय?’ पण खरं पाहिलं तर कॉमर्स क्षेत्र हे केवळ आकड्यांपुरतं मर्यादित नसून, त्यात करिअरच्या असंख्य संधी उपलब्ध आहेत. योग्य दिशा आणि अभ्यासाच्या माध्यमातून यशस्वी भवितव्य घडवता येतं.
सर्वात सामान्य पण महत्त्वाचा पर्याय म्हणजे बी.कॉम पदवी. यात अकौंटिंग, इकॉनॉमिक्स, बिझनेस स्टडीज, टॅक्सेशन अशा विषयांचा अभ्यास होतो. बी.कॉम नंतर एम.कॉम, एमबीए, किंवा सीए, सीएससारखे प्रोफेशनल कोर्स करता येतात. हा सर्वाधिक प्रतिष्ठेचा अभ्यासक्रम मानला जातो. ICAI मार्फत घेण्यात येणाऱ्या या परीक्षेमध्ये उत्तीर्ण होण्यासाठी कठोर मेहनत लागते. पण एकदा का सीए झालं की, पगार आणि नोकरीच्या संधी खूप वाढतात.
कंपनी कायदे, सेक्रेटेरियल प्रॅक्टिसेस आणि कॉर्पोरेट गव्हर्नन्स यांचा अभ्यास यात होतो. ICSI ही संस्था हा अभ्यासक्रम घेते. सीएस बनल्यानंतर तुम्ही कंपन्यांमध्ये वरिष्ठ पदांवर काम करू शकता. CMA म्हणजे आर्थिक नियोजन, कंट्रोलिंग आणि अकौंटिंग यामध्ये तज्ज्ञता मिळवणं. हे ICMAI संस्था घेते. उत्पादन कंपन्यांमध्ये CMA साठी चांगल्या संधी असतात. ज्यांना व्यवस्थापन क्षेत्रात करिअर करायचं आहे, त्यांनी BBA किंवा BBM सारखा अभ्यासक्रम निवडावा. नंतर MBA करून मल्टीनॅशनल कंपन्यांमध्ये नोकरी करता येते. कॉमर्ससोबत लॉ केल्यास तुम्ही कॉर्पोरेट लॉ, टॅक्स लॉ यामध्ये स्पेशलाइजेशन करू शकता. ही एक चांगली आणि भरभराट करणारी फील्ड आहे.
जोखीम व्यवस्थापन आणि आकडेमोडीचा खोल अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही एक स्पेशलाइज्ड फील्ड आहे. विमा कंपन्या आणि फायनान्शियल सल्लागार कंपन्यांमध्ये याची मोठी मागणी आहे. कॉमर्स आणि टेक्नॉलॉजी यांचा संगम असलेल्या या क्षेत्रात करिअर करायचं असल्यास, अल्पकालीन अभ्यासक्रम करून नोकरी मिळवता येते. १२ वी नंतर कॉमर्स क्षेत्रात करिअरच्या अनेक वाटा खुल्या आहेत. आपली आवड, कौशल्य आणि भविष्यातील उद्दिष्ट लक्षात घेऊन योग्य निर्णय घेतल्यास उज्वल करिअर निश्चितच घडू शकतं.