फोटो सौजन्य- सोशल मीडिया
MU CDOE Psychology Books ChatGPT Allegations : नोकरी करता करता शिक्षणाच्या प्रवाहात राहण्यासाठी मुंबई विद्यापीठाच्या दूरस्थ व ऑनलाइन शिक्षण केंद्र प्रचलित आहे. मात्र, आता त्याच्या कारभारवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. विद्यापीठाच्या पदव्युत्तर चौथ्या सत्राच्या मानसशास्त्र विषयाची पाठपुस्तके आणि अभ्यास निर्मितीसाठी ‘चॅट जीपीटी’ म्हणजेच कृत्रिम प्रज्ञेचा वापर झाल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने केला आहे. त्यामुळे आता सीडीओईमधील इतर बाबींवर प्रकाश टाकला आहे.
‘‘सीडीओई’ आणि परीक्षा केंद्र या दोन्ही ठिकाणी सध्या संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे कारण बीकॉमच्या तिसऱ्या वर्षाच्या प्रश्नपत्रिकांची गेल्या तीन वर्षांपासून गळती सुरू असल्याचे उघ़ड झाले आहे. त्यानंतर एमकॉमच्या दोन हजारांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांच्या निकालामध्ये चुका झाल्याचे आढळून आले आहे. सीडीओच्या परीक्षांदरम्यान विद्यार्थ्यांना त्यांच्या घरापासून ५० किलोमीटर किंवा त्याहून अधिक अंतरावरील परीक्षा केंद्रे देण्यात आले होती. त्यातच भर म्हणजे अभ्यासक्रम अर्धा संपूनही अभ्यससाहित्य आणि पाठ्यपुस्तके यांचे वाटप विद्यार्थ्यांना होत नसल्याच्या तक्रारी समोर येत आहेत.
यंदा तर पदव्युत्तर मानसशास्त्र विषयाच्या चौथ्या सत्राची पुस्तके तयार करण्यासाठी कृत्रिम प्रज्ञेचा वापर केल्याचेही समोर आले आहे, असे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे सचिव नितीन नानावरे यांनी सांगितले.






