आयसीसीने जाहीर केला प्लेयर ऑफ द मंथ पुरस्कार (फोटो- सोशल मिडिया)
आयसीसीने नुकतेच जून महिन्यातील प्लेयर ऑफ द मंथ पुरस्कारांची घोषणा केली आहे. यामध्ये न्यूझीलंडच्या नाथन स्मिथने बांग्लादेशच्या मोसादेक होसेन आणि शुभमन गिलला या स्पर्धेत मागे टाकले आहे. आयसीसीने जून महिन्यात नाथन स्मिथला प्लेयर ऑफ द मंथ पुरस्कराने सन्मानित केले आहे.
तसेच आयसीसीने जून महिन्यात प्लेयर ऑफ द मंथचा पुरस्कार इंग्लंडच्या डैनी व्याट हॅाज या खेळाडूला दिला आहे, तिने भारतीय क्रिकेट संघाची फिरकीपटू श्री चरणी आणि स्कॉटलंडच्या कैदरिन ब्राइसला मागे टाकले आहे. न्यूझीलंडचा नाथन स्मिथ जून महिन्याचा मानकरी ठरला आहे. स्मिथ हा इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात 2-1 मुख्य कामगिरी करणारा खेळाडू ठरला होता. त्याने या सिरिजमध्ये एकूण 16 विकेट्स घेतल्या होत्या. लॉर्डसच्या मैदानावर 70 रन्सवर 6 विकेट्स घेतल्या होत्या.
9 महिन्यांत Team India पराभवाच्या दरीत; Shubhman Gill कर्णधार होताच 4 पैकी 3 वनडे सिरिज…
जून महिना कर्णधार शुभमन गिलसाठी अत्यंत खास ठरला होता. अफगणिस्तानविरुद्ध कसोटी सामन्यात 126 रन्सची खेळी केली होती. तर वनडे सिरिजच्या पहिल्या सामन्यात 84 रन्सची खेळी केली. तर दुसऱ्या सामन्यात 154 रन्सची खेळी केली होती. चांगले प्रदर्शन करून देखील आयसीसीने नाथन स्मिथला हा पुरस्कार जाहीर केला आहे.
कालच भारताने इंग्लंडविरुद्ध मालिका गमावली आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली तसेच कर्णधार शुभमन गिलची शानदार खेळी भारताला विजय मिळवून देऊ शकली नाही. इंग्लंडने भारताला 388 रन्सचे टार्गेट दिले होते. मात्र भारतीय संघाचा 27 रन्सने पराभव झाला. तसेच इंग्लंडने भारताचा 2-1 ने पराभव केला आहे.
इंग्लंडकडून पराभवाचा फटका! ICC रँकिंगमध्ये टीम इंडियाला मोठा धक्का, अव्वल स्थान धोक्यात
9 महिन्यांत Team India पराभवाच्या दरीत
मागील वर्षी 2025 मध्ये शुभमन गिलची नियुक्ती भारतीय वनडे संघाचा कर्णधार म्हणून करण्यात आली आहे. त्याच्या नेतरुतवार भारताने आतापर्यंत 4 वनडे सिरिज खेळल्या आहेत. ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, इंग्लंड आणि अफगणिस्तानच्या संघाने भारताचा पराभव केला आहे. 37 वर्षांमध्ये जे झाले नाही ते भारतीय संघाचे शुभमन गिल कर्णधार झाल्यावर झाले आहे.






