फोटो सौजन्य- सोशल मीडिया
Political Spokesperson Eligibility: टीव्ही डिबेट्स (वादविवाद),प्रेस कॉन्फरन्स (पत्रकार परिषद) आणि मीडिया ब्रीफिंगमध्ये राजकीय पक्षांची बाजू मांडणारे प्रवक्ते आज राजकारणाचा एक महत्त्वाचा चेहरा बनला आहेत. काँग्रेस, भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस किंवा इतर मोठ्या राजकीय पक्षांचे प्रवक्ते अनेकदा राष्ट्रीय मुद्यावर पक्षाची भूमिका जनतेसमोर मांडत असतात. अशा परिस्थितीत एखाद्या राजकीय पक्षाचा प्रवक्ता बनण्यासाठी कोणती पदवी आवश्यक असते. असा प्रश्न अनेक तरुणांच्या मनात निर्माण होतो.
तसे पाहता भारतीय संविधानानुसार, राजकीय प्रवक्ता बनण्यासाठी कोणतीही शैक्षणिक पात्रता निर्धारित केलेली नाही. म्हणजेच प्रवक्ता बनण्यासाठी कोणत्याही पदवीची आवश्यकता नाही . असे असले तरी काही विषयांचे शिक्षण आणि अनुभव या भूमिकेसाठी खूप उपयुक्त ठरतात.
अहवालानुसार, मास कम्युनिकेशन (Journalism and Mass Communication), राज्यशास्त्र (Political Science), जनसंपर्क (Public Relations), कायदा (Law/कायद्याचे शिक्षण), पत्रकारिता, लोकप्रशासन आणि आंतरराष्ट्रीय संबंध यांसारख्या विषयांचा अभ्यास करणाऱ्या उमेदवारांना या क्षेत्रात मोठी मदत मिळू शकते. या विषयांच्या अभ्यासामुळे राजकीय व्यवस्था, मीडिया व्यवस्थापन, जनसंपर्क आणि धोरणात्मक मुद्द्यांची अधिक चांगली समज विकसित होते; जी प्रवक्त्याची भूमिका पार पाडताना अत्यंत उपयुक्त ठरते.
राजकीय प्रवक्ता बनण्यासाठी शैक्षणिक पात्रता पुरेशी नसते तर या पदांसाठी यशस्वी होण्यासाठी अनेक महत्त्वाच्या कौशल्याची आवश्यकता असते. देश विदेशातील घडामोडी, सरकारी धोरणे, विरोधांकांच्या आरोपाचे स्वरूप आणि आपल्या पक्षाची विचारसरणी याबद्दल सखोल माहिती प्रवक्याला असणे आवश्यक आहे.
तसेच त्याच्याकडे मजबूत तर्कक्षमता, संयम आणि तत्परतेने उत्तर देण्याची योग्यता असली पाहिजे. त्यांनी एखाद्या पक्षामध्ये प्रदीर्घ काळ काम करणे, संघटनात्मक कार्यात भाग घेणे आणि पक्षांच्या विरष्ठ नेतृत्वाचा विश्वास संपादन करणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते.






