फोटो सौजन्य - Social Media
गुप्तचर विभाग (Intelligence Bureau) तर्फे Junior Intelligence Officer Grade II या पदांसाठी मोठ्या प्रमाणावर भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. या भरतीत एकूण 394 रिक्त पदे असून, ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा उमेदवारांना 23 ऑगस्ट 2025 ते 14 सप्टेंबर 2025 या कालावधीत उपलब्ध राहणार आहे.
या भरतीसाठी अर्ज करणार्या उमेदवारांना काही शैक्षणिक अटी पात्र करणे गरजेचे आहे. या पदांसाठी उमेदवारांकडे संबंधित शाखेतील डिप्लोमा इन इंजिनिअरिंग ही शैक्षणिक पात्रता असणे आवश्यक आहे. तसेच जाहीर करण्यात आलेल्या अधिकृत अधिसुचनेनुसार, अर्जदाराचे वय किमान 18 वर्षे निश्चित करण्यात आले आहे. तर जास्तीत जास्त 27 वर्षे आयु असणारे उमेदवार या भरतीसाठी पात्र आहेत. मात्र शासकीय नियमांनुसार आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सूट दिली जाणार आहे. अर्ज प्रक्रियेसाठी सामान्य, OBC आणि EWS प्रवर्गातील उमेदवारांना ₹650/- फी, तर SC, ST आणि PWD प्रवर्गातील उमेदवारांना ₹550/- फी भरावी लागणार आहे.
अशी असेल निवड प्रकिया:
या पदांसाठी निवड प्रक्रिया तीन टप्प्यांत होईल. पहिला टप्पा म्हणजे लेखी परीक्षा (100 गुण) ज्यात तर्कशास्त्र व संबंधित विषयांवर आधारित प्रश्न विचारले जातील. दुसरा टप्पा कौशल्य चाचणी (30 गुण) तर तिसरा टप्पा मुलाखत (20 गुण) असा असेल. या तीन टप्प्यांनंतर कागदपत्रांची पडताळणी आणि वैद्यकीय तपासणी करून अंतिम निवड केली जाईल. लेखी परीक्षेसाठी उमेदवारांना एकूण 2 तासांचा कालावधी मिळणार असून चुकीच्या उत्तरांसाठी ¼ नकारात्मक गुणांकन लागू असेल.
इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी सर्वप्रथम सूचना PDF नीट वाचून घ्यावी आणि त्यानंतर “Apply Online” लिंकवर क्लिक करून अर्ज सादर करावा. अर्ज प्रक्रियेदरम्यान आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे, अर्ज फी ऑनलाईन पद्धतीने भरणे आणि शेवटी अर्जाची प्रिंट काढून ठेवणे आवश्यक आहे. ही भरती तरुणांसाठी गुप्तचर विभागात करिअर घडवण्याची सुवर्णसंधी ठरणार असून, इच्छुकांनी दिलेल्या वेळेत अर्ज करून या संधीचा लाभ घ्यावा.