(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
लक्ष्मी निवास फेम अभिनेता निखिल राजेशिर्के हा काही दिवसांपूर्वीच बाबा झाला. त्याने ही गोड बातमी चाहत्यांसोबत शेअर केली होती, मे महिन्यात निखिलच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचे आगमन झाले. आता नुकतंच त्याच्या मुलाचं बारसं पार पडलं. या सोहळ्याचा खास व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. निखिल राजेशिर्के याच्या मुलाचे नाव सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
अभिनेता निखिल आणि त्याची पत्नी चैत्राली मोरे हे दोघं 2024 मध्ये लग्नबंधनात अडकले. अभिनेत्याने या पूर्वी त्याच्या पत्नीच्या डोहाळेजेवणाचे फोटो सोशल मीडयावर शेअर केले होते. यानंतर निखिलने मोठ्या उत्साहात आपल्या लेकाचे स्वागत केलं. बाळाच्या जन्मानंतर जवळपास सव्वा महिन्यांनी बाळाचे बारसं केलं आहे.
निखिल राजेशिर्केने सोशल मीडियावर मुलाच्या बारशाचा सुंदर व्हिडिओ शेअर करत चाहत्यांना या खास सोहळ्याची झलक दाखवली आहे. या व्हिडिओमध्ये बाळाच्या नामकरण सोहळ्यातील अनेक सुंदर क्षण पाहायला मिळतात. विशेष म्हणजे, याच व्हिडिओत प्रथमच निखिलने आपल्या मुलाची झलकही चाहत्यांसोबत शेअर केली आहे.
व्हिडिओसोबत त्याने, “आमच्या आयुष्यातील आनंदाची पहिली भेट… निखिल आणि चैत्रालीचा ‘निश्चय’… एकदा काही ठरवलं की करूनच दाखवायचं!” असे भावनिक शब्द लिहिले आहेत. तसेच कॅप्शनमध्ये “आमचा निश्चय” असे लिहित त्याने मुलाचं नाव ‘निश्चय’ असल्याचं जाहीर केलं. बाळाच्या नावामागील सकारात्मक अर्थ आणि या गोंडस व्हिडिओमुळे चाहत्यांकडून या पोस्टवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
Aamir Khan’s third wedding: ‘तो आता ट्रिपल इंजिन चालवत आहेत’, आमिरच्या तिसऱ्या लग्नावर शेखर सुमन यांचा टोमणा, मोदींचा केला उल्लेख
निखिल राजेशिर्केने मराठी मालिकांमधून आपल्या अभिनयाची वेगळी छाप उमटवली आहे. ‘माझी तुझी रेशीमगाठ’, ‘रंग माझा वेगळा’ आणि ‘अजूनही बरसात आहे’ यांसारख्या लोकप्रिय मालिकांमधील त्याच्या भूमिकांना प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. याशिवाय तो ‘बिग बॉस मराठी’ च्या चौथ्या पर्वातही स्पर्धक म्हणून सहभागी झाला होता. जरी या रिअॅलिटी शोमधील त्याचा प्रवास अपेक्षेपेक्षा लवकर संपला, तरी त्याने आपल्या स्पष्टवक्तेपणाने आणि साध्या स्वभावाने प्रेक्षकांची मनं जिंकली.






