provide government jobs to more than 1 lakh people Fadnavis big announcement
राज्य सरकारद्वारे तब्बल 1 लाख 8 हजार नोकर भरती केली जाणार आहे. या पार्श्वभूमीवर आतापर्यंत 57 हजार 452 अर्जदारांना नियुक्तीपत्रे देण्यात आली आहेत. तर येत्या महिन्याभरात 19 हजार 853 अर्जदारांना नियुक्ती पत्र दिली जातील, अशी घोषणा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. याशिवाय राज्यात पेपरफुटीचा कायदा देखील याच अधिवेशनात करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. ते आज विधानसभा सभागृहाला संबोधित करताना ते बोलत होते.
पारदर्शी पद्धतीने होणार परीक्षा
राज्यात ऑगस्ट 2022 पासून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकार सत्तेत तेव्हापासून सरकारने १ लाखांहून अधिक जणांना सरकारी नोकरी देण्याचे घोषित केले होते. त्यानुसार आतापर्यंत अनेक पार घेण्यात आल्या. ज्या अतिशय पारदर्शी पद्धतीने पार पडल्या. अमरावतीत येथे घडलेली घटना सोडली आणि तलाठी परीक्षेत पेपर चुकला, तो परत घेण्याचा निर्णय घेण्यात आला. या व्यतिरिक्त अतिशय पारदर्शी पद्धतीने ही परीक्षा पूर्ण झाली, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले आहे. याशिवाय गट-क च्या रिक्त पदांची भरती ही यापुढे एमपीएससीमार्फत होणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
77 हजार 305 जणांना दिलीये सरकारी नोकरी
दरम्यान, राज्य सरकारने आतापर्यंत ऑगस्ट 2022 पासून, 57 हजार 452 तरुणांना नियुक्तीपत्र दिले आहे. या व्यतिरिक्त ज्यांची सर्व प्रक्रिया पूर्ण झाली आहे, त्यांना या सव्वा महिन्यात किंवा महिन्याभरात नियुक्तीपत्र दिले जाईल, अशी संख्या 19 हजार 853 इतकी आहे. आमच्या सरकारने 75 हजार भरतीची घोषणा केली होती, त्याऐवजी आतापर्यंत 77 हजार 305 लोकांना सरकारी नोकरी दिली आहे. तसेच याबद्दलची सर्व प्रक्रिया राज्य सरकारने पूर्ण केली आहे. याबद्दलचे नियुक्ती पत्रही देण्यात आले आहे. तर काहींना दिले जात आहे. अशी माहितीही त्यांनी सभागृहाला दिली आहे.
आणखी 31 हजार 201 पदे भरली जाणार
याशिवाय येत्या काळात नव्याने 31 हजार 201 पदे भरली जातील. त्यासाठीची प्रक्रिया ही पुढील तीन महिन्यात राबविली जाणार आहे. अर्थात राज्यातील शिंदे-भाजप सरकारच्या कार्यकाळात एकूण 1 लाख 8 हजार जणांना सरकारी नोकऱ्या देण्याचे काम राज्य सरकार करणार आहे. अडीच वर्षाच्या काळात एक लाख नवीन नोकऱ्या पारदर्शी पद्धतीने देण्याचा नवा विक्रम हा महाराष्ट्र सरकारने केला आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.