फोटो सौजन्य - Social Media
भारतीय रेल्वेमध्ये भरतीला सुरुवात करण्यात आली आहे. RRBने या भरतीचे आयोजन केले आहे. मुळात, या भरती संदर्भात महत्वाची माहिती आहे. तारखांमध्ये मुदतवाढ देण्यात आली आहे. अद्याप तारीख जाहीर करण्यात आली नाही आहे. उमेदवार ३ मार्च २०२५पर्यंत अर्ज शुल्काच्या रकमेची भरपाई करू शकतो. तर अर्जाच्या फॉर्ममध्ये काही चुका आढळून आल्यास त्यांना सुधारता येणार आहे. उमेदवारांना ४ मार्चपासून या त्रुटी सुधारता येणार आहेत तर सुधारणा करण्याची तारीख १३ मार्च निश्चित करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून एकूण 32,438 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.
उमेदवारांना या भरतीसाठी काही पात्रता निकष पात्र करावे लागणार आहेत. हे निकष शैक्षणिक आहेत तसेच उमेदवारांच्या वयोमर्यादेसंदर्भात आहेत. अधिसूचनेमध्ये नमूद असणाऱ्या शैक्षणिक निकषांनुसार, अर्ज कर्ता उमेदवार दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच उमेदवाराकडे ITI प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे किंवा नॅशनल अप्रेंटिसशिप सर्टिफिकेट असणे अनिवार्य आहे. तसेच अधिसूचनेमध्ये वयोमर्यादेसंदर्भात सांगण्यात आले आहे कि किमान १८ वर्षे आयु असणारे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतो. तसेच जास्तीत जास्त वय ३६ वर्षे निश्चित करण्यात आली आहे.
उमेदवारांना चार टप्य्यांना पात्र करत निवडीसाठी पात्र होता येणार आहे. यामध्ये कॉम्प्युटर बेस्ड लिखित परीक्षेचा समावेश आहे. त्यानंतर उमेदवारांना शारीरिक चाचणीसाठी उपस्थित राहावे लागणार आहे. तसेच दस्तऐवजांची पडताळणी आणि वैद्यकीय चाचणीसाठी उमेदवार अर्ज करू शकतात. उमेदवारांना अर्ज करताना काही रक्कम अर्ज शुल्क म्हणून भरावी लागणार आहे. PwBD, महिला, ट्रांसजेंडर, पूर्व सैनिक, SC/ST, अल्पसंख्यक समुदाय आणि EBC उमेदवारांना अर्ज शुल्क म्हणून २५० रुपये रक्कम भरावी लागणार आहे. तसेच नंतर ते पूर्ण रिफंड केले जातील. परंतु इतर सर्व समाजांना ५०० रुपये अर्ज शुल्क भरायचे आहे. परीक्षेस उपस्थिती दर्शवल्यानंतर त्यातील ४०० रुपये रक्कम रिफंड करण्यात येईल.
अशा प्रकारे करता येईल अर्ज: