फोटो सौजन्य - Social Media
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) दिल्लीमध्ये भरतीला सुरुवात झाली आहे. भाषेत प्रभुत्व असणाऱ्या उमेदवारांसाठी ही एक सुवर्णसंधी आहे. IIT दिल्लीमध्ये काम करण्याची अनेक जणांची इच्छा असते. जर तुम्हालाही अशी इच्छा आहे. तर नक्कीच या भरतीचा विचार करा. इंग्रजी भाषेसाठी प्रशिक्षकाची गरज IIT दिल्लीमध्ये भासत आहे. या पदाच्या रिक्त जागांसाठी उमेदवारांची नियमकती आयोजली गेली आहे. उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. मुळात, या भरतीसाठी अधिकृत अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. उमेदवारांनी या भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी अधिसूचनेचा आढावा घेण्यात यावा. IIT दिल्लीकडून जाहीर अधिसूचनेनुसार, या भरतीसाठी अर्ज करण्यास इच्छुक उमेदवारांना २६ नोव्हेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहे.
दिलेल्या वेळेच्या आतमध्ये उमेदवारांना अर्जाचा फॉर्म नमूद पत्त्यावर पाठवायचा आहे. या भरतीसाठी उमेदवारांना काही अटी शर्ती पात्र करावे लागणार आहे. या अटी शर्ती अधिसूचनेत नमूद आहेत. अर्ज करण्यासाठी इच्छुक उमेदवारांना या अटी शर्ती पात्र करणे अनिवार्य आहे. या भरतीसाठी अर्ज कर्ता उमेदवार इंग्रजी विषयात PHD धारक असावा. तसेच उमेदवार इंग्रजी विषयांत MA First Class उत्तीर्ण हवा. एका ठराविक वयोगटातील उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज कर्ता येणार आहे.
जास्तीत जास्त ४५ आयु असलेले उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात. आरक्षित प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांना वयोमर्यादेत काही प्रमाणात सूट देण्यात येईल. OBC आरक्षित प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांना जास्तीत जास्त ३ वर्षे तर ST प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांना जास्तीत जास्त ५ वर्षांपर्यंतची सुट वयोमर्यादेत देण्यात येईल. या भरतीमध्ये इंग्रजी प्रशिक्षकाच्या ७ रिक्त जागांचा विचार केला जाणार आहे. यातील ४ पदे अनारक्षित आहेत. १ जागा OBC प्रवर्गासाठी आरक्षित आहे.
१ जागा अनुसूचित जमातीसाठी तर १ जागा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकासाठी आरक्षित आहे. आधिकारिक अधिसूचनेत म्हटले आहे, “जर आवश्यक ठरले तर संस्थेला उमेदवारांना शॉर्टलिस्ट करून साक्षात्कारासाठी बोलवण्यासाठी परीक्षा आयोजित करण्याचा अधिकार राखीव आहे. हे पद सुरुवातीला एक वर्षासाठी करारावर असेल आणि तीन अतिरिक्त वर्षांसाठी त्याचे नूतनीकरण केले जाऊ शकते. आवश्यक न्यूनतम योग्यता आणि अनुभवाची पूर्तता फक्त उमेदवाराला लेखी परीक्षा/साक्षात्कारासाठी बोलावण्याचा अधिकार देत नाही.” या भरतीस संदर्भात अधिक माहितीसाठी उमेदवारांनी जाहीर अधिसूचनेचा आढावा घेण्यात यावा.






