Maharashtra Breaking News Updates Today:
मुंबई/नवी दिल्ली देशातील बहुतांश राज्यांमध्ये प्रादेशिक पक्षांना शह देत सत्ता स्थापन करणाऱ्या भाजपला आगामी काळात रोखण्यासाठी विरोधी गोटात अत्यंत मोठ्या घडामोडी सुरू झाल्या आहेत. शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा थेट मूळ काँग्रेस पक्षात विलीन करण्याच्या चर्चेने सध्या देशाच्या आणि राज्याच्या राजकारणात प्रचंड जोर धरला आहे. शरद पवार गट आणि काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये या विलीनीकरणाबाबत अतिशय गांभीर्याने विचारमंथन सुरू असल्याची खात्रीशीर माहिती समोर येत आहे.
12 Jun 2026 05:50 PM (IST)
पाटस : अन्न व औषध प्रशासन विभागाचे धडाकेबाज अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या एका धडक कारवाईनं दौंड तालुक्यात खळबळ उडाली आहे. भेसळयुक्त गूळ निर्मितीवर अंकुश ठेवण्यासाठी केलेल्या कारवाईनंतर तालुक्यातील तब्बल ४०० गुऱ्हाळघरे गेल्या २ दिवसांपासून बंद आहेत. हजारो टन ऊस गाळपाअभावी वाळत पडला असून शेतकरी, गुऱ्हाळ मालक आणि कामगारांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. दौंड तालुक्यात ऊस गाळप हंगाम जोरात सुरू असतानाच एफडीएची कारवाई झाली. परिणामी गाळप ठप्प झाले आहे. गुऱ्हाळांवर आणलेला ऊस आता वाळत पडला आहे. वेळेत गाळप न झाल्यास शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होण्याची भीती आहे. गुऱ्हाळावर अवलंबून असलेले हजारो मजूर कामाशिवाय बसले आहेत. तर भेसळीचा गूळ बंद झाल्यामुळेच हा व्यवसाय अडचणीत आला का, असा प्रश्न संपूर्ण तालुक्यात चर्चिला जातोय.
12 Jun 2026 05:40 PM (IST)
क्रिकेटच्या मैदानावर पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्तान भिडणार आहेत. महिला टी-20 विश्वचषक 2026 मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हायव्होटेज सामना १४ जून रोजी इंग्लंडमधील एड्जबॅस्टन बर्मिंगहॅम येथे खेळवला जाणार आहे. पुन्हा एकदा, दोन कट्टर प्रतिस्पर्धी आमनेसामने येणार आहेत. नोव्हेंबर २०२५ मध्ये पहिल्यांदा एकदिवसीय विश्वचषक जिंकल्यानंतर, भारतीय महिला संघ आता आपल्या पहिल्या टी-२० विजेतेपदासाठी मैदानात उतरेल. तर पाकिस्तानही भारताला आव्हान देण्याचा प्रयत्न करेल. आयसीसी महिला टी-२० विश्वचषक २०२६ शुक्रवार, १२ जूनपासून इंग्लंडमध्ये सुरू होत आहे. या विश्वचषकात एकूण १२ संघ सहभागी होत आहेत, त्यापैकी काही संघ विजेतेपदाचे दावेदार आहेत. यापैकी एक संघ म्हणजे हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ, जो एकदिवसीय विश्वचषक जिंकल्यानंतर मोठ्या उत्साहात आहे. भारतीय संघाचा पहिला सामना पाकिस्तानविरुद्ध आहे. हा सामना तुम्ही कधी, केव्हा अन् कुठे पाहू शकता, जाणून घ्या.
12 Jun 2026 05:31 PM (IST)
Career In Translation: जर तुम्हाला वेगवेगळ्या भाषा शिकण्याची आवड असेल आणि विविध भाषांच्या माध्यमातून ज्ञान व संस्कृती जोडण्याची तुमची इच्छा असेल, तर ‘भाषांतर’ (Translation) हे क्षेत्र तुमच्यासाठी एक सर्वोत्तम करिअर पर्याय ठरू शकते. आजच्या जागतिकीकरणाच्या युगात ट्रान्सलेशन हे केवळ एका भाषेतून दुसऱ्या भाषेत शब्दांचा अनुवाद करण्यापुरते मर्यादित राहिलेले नाही, तर ते भावना, विचार आणि संस्कृतीचे प्रभावी दळणवळण करण्याचे एक मोठे माध्यम बनले आहे. डिजिटल मीडियाचा विस्तार आणि जागतिक बाजारपेठांमुळे सध्या व्यावसायिक भाषांतरकारांची मागणी अभूतपूर्व वाढली आहे.
12 Jun 2026 05:10 PM (IST)
आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या पार्श्वभूमीवर अकासा एअरची इन-फ्लाइट भोजन सेवा ‘कॅफे अकासा’ने प्रवाशांसाठी विशेष हेल्दी मील सादर केले आहे. योग दिन विशेष भोजनाच्या चौथ्या आवृत्तीच्या माध्यमातून आरोग्य, संतुलन आणि सजग जीवनशैलीचा संदेश अधिक प्रभावीपणे पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. पौष्टिक घटकांनी समृद्ध आणि चविष्ट पदार्थांचा समावेश असलेले हे विशेष भोजन विमानप्रवासादरम्यानही निरोगी आहाराचा अनुभव देणार आहे.
12 Jun 2026 05:00 PM (IST)
“एसटी ही केवळ वाहतूक व्यवस्था नसून लाखो गोरगरीब, विद्यार्थी, शेतकरी, ज्येष्ठ नागरिक आणि सर्वसामान्य जनतेची जीवनवाहिनी आहे. कर्मचाऱ्यांच्या न्याय्य मागण्यांबाबत सरकार सकारात्मक असून बहुतेक मागण्या पूर्ण करण्यात आल्या आहेत. मात्र आंदोलनाच्या मार्गाने प्रवाशांना वेठीस धरू नका,” असे भावनिक आवाहन परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केले.
12 Jun 2026 04:56 PM (IST)
‘काला हिरण -द बॅटल फॉर लेगसी’ या चित्रपटाचा फर्स्ट लूक प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट अभिनेता सलमान खानच्या १९९८ मधील काळवीट शिकारीच्या प्रकरणावर आणि गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या वादावर आधारित असल्याचे दिसते. वाद टाळण्यासाठी, निर्मात्यांनी चतुराईने सलमान खानपासून प्रेरित पात्राचे नाव अयान खान आणि गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई पासून प्रेरित पात्राचे नाव लायन बिश्नोई ठेवले. सलमान खानने अलीकडेच या चित्रपटाच्या निर्मात्यांविरुद्ध खटला दाखल केला आहे. या सगळ्यात, निर्मात्यांनी शुक्रवारी हा फर्स्ट लूक प्रदर्शित केला, ज्यामुळे मोठी चर्चा सुरू आहे. वाचा सविस्तर...
12 Jun 2026 04:46 PM (IST)
देशभरातील कर्करोगग्रस्त रुग्णांना काही काळापासून जीवनरक्षक औषधांच्या तुटवड्याचा सामना करावा लागत आहे. ही परिस्थिती, विशेषतः सरकारी रुग्णालयांमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांसाठी, चिंतेचा विषय बनली होती. आता, या समस्येचे निराकरण करण्यासाठी सरकारने एक मोठे पाऊल उचलले आहे. खरे तर, सरकारने कर्करोगावर उपचार करणाऱ्या दोन महत्त्वाच्या औषधांच्या, सिस्प्लॅटिन आणि कार्बोप्लॅटिनच्या, कमाल किंमत मर्यादेत ५० टक्क्यांनी वाढ केली आहे. यामुळे औषध कंपन्यांना उत्पादन वाढविण्यात आणि बाजारात या औषधांची उपलब्धता सुधारण्यास मदत होईल, अशी आशा आहे. वाचा सविस्तर...
12 Jun 2026 04:35 PM (IST)
मुंबई विद्यापीठाच्या संशोधन क्षेत्रासाठी अत्यंत अभिमानास्पद ठरणारी कामगिरी नोंदवत विद्यापीठाच्या रसायनशास्त्र विभागातील ज्येष्ठ संशोधक प्रा. नवीनचंद्र गोपाळ शिंपी यांचा ‘सायरँक ग्लोबल’ या प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय कारवारीत जमातीवर मारला आटक्के शास्त्रज्ञांमध्ये ‘सायरँक ग्लोबल’ ही जागतिक स्तरावरील संशोधकांचे मूल्यमापन करणारी मान्यताप्राप्त आणि स्वतंत्र संस्था असून ती संशोधन लेखांना मिळालेली उद्धरणे (सायटेशन), वैज्ञानिक प्रभाव आणि संशोधनातील योगदान यांच्या आधारे दरवर्षी जागतिक क्रमवारी जाहीर करते. जगभरातील सुमारे २ कोटी सक्रिय संशोधकांमधून ही निवड केली जाते.
12 Jun 2026 04:27 PM (IST)
भारतीय टी-20 क्रिकेट संघाचा कर्णधार श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) याने मुंबईतील वरळी भागात ७.१४ कोटी रुपये एकूण भाडेमूल्य असलेल्या एका आलिशान अपार्टमेंटचे तीन वर्षांसाठी भाडेतत्त्वावर करार केला आहे. वरळी हा मुंबईतील सर्वात प्रतिष्ठित आणि पसंतीच्या निवासी परिसरांपैकी एक मानला जातो; हा परिसर समुद्रकिनाऱ्यालगतच्या भव्य प्रकल्पांसाठी, प्रभावी ‘स्कायलाईन’साठी आणि उत्तम दळणवळण सुविधांसाठी प्रसिद्ध आहे. दक्षिण-मध्य मुंबईत वसलेला हा परिसर उच्च दर्जाची जीवनशैली, व्यावसायिक महत्त्व आणि दीर्घकालीन गुंतवणुकीचे ठिकाण म्हणून ओळखला जातो. वाचा सविस्तर...
12 Jun 2026 04:16 PM (IST)
महाराष्ट्र शासनाचा महिला व बाल विकास विभाग, गरजू, अनाथ आणि निराश्रित मुलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आणि त्यांच्या विकासाला चालना देण्यासाठी ‘क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बाल सांगोपन योजना’ राबवण्याचा निर्णय आहे. या योजनेचा मुख्य उद्देश या मुलांना संरक्षण, निवारा आणि एक चांगले भविष्य प्रदान करणे हा आहे. वाचा सविस्तर...
12 Jun 2026 04:05 PM (IST)
गेल्या तीन दिवसांत ओमानच्या किनाऱ्याजवळ तीन व्यापारी जहाजावंर अमेरिकेने केलेल्या हल्ल्यात ३ भारतीय नाविकांचा मृत्यू झाला. यामुळे भारत आणि अमेरिकेत राजनैतिक हालचालींना वेग आला आहे. या दरम्यान इराणने देखील या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे. इराणने भारतीय नाविकांच्या मृत्यूची माहिती समोर आल्यानंतर अमेरिकेवर गंभीर आरोप करत आक्रमक भूमिका घेतली आहे. आंतरराष्ट्रीय राजकारणात यावरून गरमागरमीचे वातावरण असतानाच आता देशभरातूनही या घटनेबाबत तीव्र पडसाद उमटताना दिसत आहेत. अश्यातच, काँग्रेस नेते आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी याघटनेवरून तीव्र नाराजी व्यक्त करत मोदी सरकारला खडेबोल सुनावले आहेत. वाचा सविस्तर...
12 Jun 2026 04:00 PM (IST)
सध्या मध्यपूर्वेतील संघर्ष तीव्र पेटला आहे. अमेरिका-इराणने दोन दिवस एकमेकांवर हल्ले-प्रतिहल्ले केले. यावेळीच ट्रम्प यांनी इराणशी चर्चा अंतिम टप्प्यात असून येत्या आठवड्याच्या अखेरीस युरोपमध्ये डील साइन होईल असा दावा केला. दरम्यान या दाव्याची पुष्टी इराणच्या सरकारची माध्यमांनी केली आहे.
12 Jun 2026 03:55 PM (IST)
ओमानच्या किनारपट्टीजवळ अमेरिकेने व्यापारी जहाजावर केलेल्या हल्ल्यात तीन भारतीयांचा मृत्यू झाला आहे. याच पार्श्वभूमीवर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने तातडीने अमेरिकेशी राजनैतिक संर्पक साधत हल्ल्यांबाबत स्पष्टीकरण मागितले होते. आता भारताने २४ तासांत दुसऱ्यांदा अमेरिकेचे कार्यवाहक राजदूत जेसन मीक्स यांना पुन्हा हल्ल्यांबाबत प्रश्न विचारला आहे. भारत सरकारने अमेरिकन नौदलाच्या कारवायांचा तीव्र निषेध नोंदवला आहे. तसेच होर्मुझमधील व्यापारी जहाजांवरील हल्ले तातडीने थांबवण्याची मागणीही केली आहे.
12 Jun 2026 03:50 PM (IST)
गेल्या तीन दिवसांत ओमानच्या किनाऱ्याजवळ भारतीय नाविक असलेल्या तीन जहाजांवर अमेरिकेने कारवाई केली आहे. यामध्ये तीन भारतीय नाविकांचा मृत्यू झाला आहे. यावरुन राहुल गांधीन पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला. त्यांनी म्हटले की, आंतरराष्ट्रीय सागरीक्षे६ात तीन दिवसांत तीन जहाजांवर हल्ले झाले. ज्यामध्ये तीन भारतीयांचा बळी गेला. परंतु आपल्या पंतप्रधानांनी याबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. एखादी परकीय शक्ती जेव्हा भारतीयांचा जीव घेते तेव्हा तरी पंतप्रधानांनी त्याविरोधात आवाज उठवायला हवा. पण त्यांनी एकही शब्द बोलण्याचे धाडस केले नाही.
अन्तर्राष्ट्रीय जल में तीन दिन में तीन जहाज़ों पर अमेरिकी हमलों में तीन भारतीयों की मृत्यु हो गई। और हमारे Compromised PM? एक शब्द तक नहीं।
जब कोई विदेशी ताकत किसी भारतीय की हत्या करे, तो प्रधानमंत्री को बोलना पड़ता है। लेकिन मजाल है जो ये एक शब्द बोल जाएं।
अगले हफ्ते G7 में,…
— Rahul Gandhi (@RahulGandhi) June 12, 2026
12 Jun 2026 03:45 PM (IST)
भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेला १३ जूनपासून सुरुवात होणार आहे. पहिला सामना धर्मशाळा येथील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन (HPCA) स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. सामन्याची सुरुवात १. ३० वाजता होईल. एकमेव कसोटी मालिकेत अफगाणिस्तानवर वर्चस्व गाजवल्यानंतर आता भारतीय संघाची नजर वनडे मालिकेतील विजयी सुरुवातीवर आहे. शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ मैदानात उतरणार असून रोहित शर्मा पुन्हा एकदा भारतीय संघाच्या जर्सीमध्ये दिसणार आहे, परंतु दुखापतीमुळे विराट कोहली या मालिकेतून बाहेर पडला आहे. दुसरीकडे, अफगाणिस्तानचा संघही भारताला कडवी झुंज देण्याच्या निर्धाराने मैदानात उतरणार आहे. या सामन्यात कसा असेल खेळपट्टीचा अंदाज अन् संभाव्य प्लेइंग ११, जाणून घेऊयात.
12 Jun 2026 03:40 PM (IST)
धाराशिव / शीतलकुमार शिंदे : राज्य शासनाने प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजना, शबरी आवास योजना तसेच इतर शासकीय घरकुल योजनांतील लाभार्थ्यांना घरबांधणीसाठी प्रत्येकी पाच ब्रास मोफत वाळू उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला असला, तरी धाराशिव जिल्ह्यात या योजनेची प्रभावी अंमलबजावणी झालेली नसल्याचे समोर आले आहे. शासन निर्णय लागू झाल्यापासून आजपर्यंत मोठ्या संख्येने लाभार्थ्यांना मोफत वाळूचा लाभ मिळालेला नसल्याने घरकुल बांधकामांचा खर्च वाढला असून हजारो कुटुंबांचे लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान होत आहे. वाचा सविस्तर
12 Jun 2026 03:35 PM (IST)
देशभरातील कर्करोगग्रस्त रुग्णांना काही काळापासून जीवनरक्षक औषधांच्या तुटवड्याचा सामना करावा लागत आहे. ही परिस्थिती, विशेषतः सरकारी रुग्णालयांमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांसाठी, चिंतेचा विषय बनली होती. आता, या समस्येचे निराकरण करण्यासाठी सरकारने एक मोठे पाऊल उचलले आहे. खरे तर, सरकारने कर्करोगावर उपचार करणाऱ्या दोन महत्त्वाच्या औषधांच्या, सिस्प्लॅटिन आणि कार्बोप्लॅटिनच्या, कमाल किंमत मर्यादेत ५० टक्क्यांनी वाढ केली आहे. यामुळे औषध कंपन्यांना उत्पादन वाढविण्यात आणि बाजारात या औषधांची उपलब्धता सुधारण्यास मदत होईल, अशी आशा आहे. वाचा सविस्तर
12 Jun 2026 03:30 PM (IST)
कणकवली : कणकवली शहरातील डीसपी गार्डन या गृहनिर्माण प्रकल्पातील ग्राहकांना पूर्वकल्पना न देता आणि ग्राहकांना विश्वासात न घेता स्मार्ट वीज मीटर बसविण्याचा प्रकार गुरुवारी दुपारी उघडकीस आला आहे. या गृहनिर्माण प्रकल्पातील ३० मीटर अदानी कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी ग्राहकांना विश्वासात न घेता अचानक परस्पर बदलले. दरम्यान, ही बाब ग्राहकांनी युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री, शहराध्यक्ष अण्णा कोदे , नगरसेविका मेघा गांगण यांच्या कानी घातला. त्यानंतर संबंधित कंपनीच्या अधिकाऱ्यांना जाब विचारला असता संबंधित कंपनीचे अधिकारी आणि स्थानिक नागरिक यांच्यात जोरदार बाचाबाची झाली. वाचा सविस्तर
12 Jun 2026 03:20 PM (IST)
EV Sales Report India May 2026 : भारतीय ऑटोमोबाईल क्षेत्रात सध्या एक फार मोठा आणि सकारात्मक बदल पाहायला मिळत आहे. एकेकाळी लोक ज्या इलेक्ट्रिक गाड्यांकडे (EVs) केवळ एक ‘पर्याय’ म्हणून पाहत होते, त्याच गाड्या आता भारतीय ग्राहकांची पहिली पसंती बनू लागल्या आहेत. मे २०२६ चे नुकतेच समोर आलेले विक्रीचे आकडे (EV Sales Report) या गोष्टीची साक्ष देतात. गेल्या महिन्यात देशातील इलेक्ट्रिक कार बाजारपेठेत अक्षरशः त्सुनामी आली आहे. टाटा मोटर्स, महिंद्रा आणि किया सारख्या दिग्गज वाहन कंपन्यांनी केवळ आपली विक्री वाढवली नाही, तर संपूर्ण ईव्ही सेगमेंटला एका नव्या उंचीवर नेऊन ठेवले आहे. बाजारातील जाणकारांच्या मते, कंपन्यांनी लाँच केलेले नवनवीन मॉडेल्स, परवडणाऱ्या किमती आणि देशभरात वेगाने सुधारत असलेले चार्जिंग नेटवर्क यांमुळे ग्राहक आता पेट्रोल-डिझेलच्या गाड्या सोडून इलेक्ट्रिक कारकडे मोठ्या प्रमाणावर वळत आहेत. वाचा सविस्तर
12 Jun 2026 03:15 PM (IST)
Chandrashekar Bavankule News: “मला वाटत नाही की शरद पवार आणि सुप्रिया सुळे असा निर्णय घेतील. त्यांनी असा निर्णय घेतलाच, तर त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत. काँग्रेसचा – इतिहास शरद पवार आणि सुप्रिया सुळेंना चांगलाच माहिती आहे.” अशा शब्दांत भाजप नेत चंद्रशेखर बावनकुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला टोला लगावला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे काँग्रेसमध्ये विलीनीकरण केले जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. भाजपला रोखण्यासाठी धर्मनिरपेक्ष पक्ष काँग्रेसमध्ये विलीन केले जाणार असल्याचे बोलले जात आहे. त्यावरू बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. वाचा सविस्तर
12 Jun 2026 03:10 PM (IST)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीं सलग १२ वर्षे पंतप्रधानपदाचा कार्यकाळ पूर्ण केल्याच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (शुक्रवार, १२ जून) पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी विविध विषयांवर भाष्य केले. यावेळी शेतकरी कर्जमाफ़ीबद्दल बोलताना त्यांनी एक नवीन खुलासा केला असून शेतकरी कर्जमाफीत एक अट टाकली असून ती का टाकली? याबाबत त्यांनी भाष्य केले. “शेती समोरील आव्हान कमी नसून निसर्गाचं सर्वात मोठं आव्हान शेतीसमोर आहे. यासाठी क्लायमेट प्रूव्ह शेती करावी लागेल. आम्ही जी कर्जमाफी केली आहे त्या कर्जमाफीच्या कुठल्याही अटी आणि शर्ती आम्ही टाकलेल्या नाहीत,” असेही ते म्हणाले. वाचा सविस्तर
12 Jun 2026 03:05 PM (IST)
छत्रपती संभाजीनगर, (शहर प्रतिनिधी): संभाजीनगर जिल्ह्यातील वाढत्या रस्ते अपघातांनी चिंतेचे स्वरूप धारण केले असून, गेल्या १७ महिन्यांत १,२४४ अपघातांमध्ये तब्बल ७६७ नागरिकांना जीव गमवावा लागला आहे. या अपघातांमध्ये दुचाकीस्वारांचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे समोर आले आहे. अपघातांचा वाढता आलेख रोखण्यासाठी ग्रामीण पोलिसांनी वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात विशेष मोहीम हाती घेतली आहे. ८ जून रोजी जिल्हाभरात झालेल्या कारवाईत १,१४९ वाहनचालकांवर गुन्हे दाखल करून १३ लाख ८४ हजार ९०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. वाचा सविस्तर
12 Jun 2026 03:00 PM (IST)
मुंबई: फिटनेस आणि आरोग्य क्षेत्रातील प्लॅटफॉर्म ‘FITTR’ ने शुक्रवारी जाहीर केले की, भारतीय क्रिकेटपटू रोहित शर्मा या कंपनीत गुंतवणूकदार आणि इक्विटी भागीदार (equity partner) बनले आहेत. यापूर्वी ते कंपनीचे पहिले ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून जोडले गेले होते. मात्र, कंपनीने गुंतवणुकीची रक्कम जाहीर केलेली नाही. FITTR च्या मते, ही भागीदारी शाश्वत आरोग्य सवयी, सातत्य आणि सजग जीवनशैलीला प्रोत्साहन देण्याच्या सामायिक उद्दिष्टावर आधारित आहे. याचा उद्देश फिटनेस आणि प्रतिबंधात्मक आरोग्य सेवा मोठ्या लोकसंख्येसाठी उपलब्ध करून देणे हा आहे. वाचा सविस्तर
12 Jun 2026 02:43 PM (IST)
आजपासून महिला टी-20 विश्वचषक 2026 स्पर्धेचा थरार रंगणार आहे. या स्पर्धेचे आयोजन इंग्लंड आणि वेल्स करणार आहेत. या वर्षीचा टी२० विश्वचषक खूप खास आहे. महिला क्रिकेटच्या इतिहासात प्रथमच टी-२० विश्वचषकात १२ संघ सहभागी होत आहेत. सर्व १२ संघांना प्रत्येकी सहा संघांच्या दोन गटांमध्ये विभागण्यात आले आहे. प्रत्येक गटातील टॉप-२ संघ बाद फेरीसाठी पात्र ठरतील. त्यानंतर हे संघ उपांत्य फेरी पार करून अंतिम सामन्यात पोहोचतील, जो ५ जुलै रोजी खेळला जाईल. वाचा सविस्तर
12 Jun 2026 01:56 PM (IST)
केरळमध्ये विषाणूजन्य आणि जिवाणूजन्य संसर्गाची प्रकरणे वारंवार आढळतात. मात्र, यावेळी एकाच वेळी दोन संसर्गांचा प्रादुर्भाव झाला आहे. सर्वात चिंताजनक बाब म्हणजे केरळमधील तोच जिल्हा उच्च जोखमीवर आहे. खरे तर, राज्यात पुन्हा एकदा निपाह विषाणूचा प्रादुर्भाव झाला आहे आणि यावर्षी शिगेलामुळे आणखी एका मुलाचा बळी गेला आहे. पण तुम्हाला माहित आहे का, निपाह की शिगेला, यापैकी कोणता संसर्ग जास्त बळी घेतो?
12 Jun 2026 01:49 PM (IST)
उत्तर आयर्लंडची राजधानी बेलफास्टमध्ये एका भीषण चाकू हल्ल्याच्या घटनेमुळे मोठ्या प्रमाणावर हिंसाचार आणि निदर्शने सुरू झाली आहेत. या हल्ल्यात एक व्यक्ती गंभीर जखमी झाला असून त्याच्या डोळ्याला, पाठीला आणि चेहऱ्याला गंभीर दुखापत झाली आहे. पोलिसांनी एका ३० वर्षीय सुदानी नागरिकावर हत्येचा प्रयत्न केल्याचा आरोप ठेवल्यानंतर आणि या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर तणाव लक्षणीयरीत्या वाढला. निदर्शने झपाट्याने वाढली, ज्यामुळे मंगळवारी रात्री बेलफास्टसह अनेक भागांमध्ये जाळपोळ आणि तोडफोड झाली. आंदोलकांनी अनेक ठिकाणी स्थलांतराविरुद्ध घोषणाबाजी केली.
12 Jun 2026 01:43 PM (IST)
अमेरिकेच्या राजकारणात सध्या प्रचंड तणावाचे वातावरण असून, एका गूढ घटनेने सुरक्षा यंत्रणांच्या रात्रीची झोप उडवली आहे. अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन डीसी मधील सर्वात प्रसिद्ध आणि सुरक्षित मानल्या जाणाऱ्या ‘नॅशनल मॉल’ (National Mall) च्या विस्तीर्ण मैदानावर एकाएकी ‘८६४७’ (8647) हा आकडा मोठ्या अक्षरात उमटल्याचे समोर आले आहे. ही घटना सामान्य नसून, याकडे थेट अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या सुरक्षेला असलेला मोठा धोका म्हणून पाहिले जात आहे.
12 Jun 2026 01:40 PM (IST)
आंतरराष्ट्रीय स्तरावरून आणि थायलंडच्या राजवाड्यातून एक अत्यंत दुःखद बातमी समोर आली आहे. थायलंडच्या ‘स्लीपिंग प्रिन्सेस’ (Sleeping Princess) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राजकुमारी बज्रकितियाभा नरेन्दिर देब्यवती (Princess Bajrakitiyabha) यांचे वयाच्या अवघ्या ४७ व्या वर्षी निधन झाले आहे. गेल्या तीन वर्षांहून अधिक काळ मृत्यूशी झुंज देणाऱ्या राजकुमारीने गुरुवारी संध्याकाळी ७:४८ वाजता अंतिम श्वास घेतला.
12 Jun 2026 01:36 PM (IST)
रशियन तेल खरेदीवरुन पुन्हा भारताला घेरण्याचा प्रयत्न करण्यात आला असताना युरोपीय देशांना परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर (S. Jaishankar) यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. फिनलँडमध्ये कुल्तारंता टॉक्स चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी रशियाकडून तेल खरेदीबाबात भारताल सतत प्रश्न विचारण्यात येत होते. यावर जयशंकर यांनी थेट भारताची भूमिका स्पष्ट केली.
12 Jun 2026 01:34 PM (IST)
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या प्रवासी सेवांमध्ये अधिक पारदर्शकता, सुलभता आणि डिजिटल व्यवहारांना चालना देण्यासाठी १ ऑगस्ट २०२६ पासून महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिक प्रवाशांसाठी NCMC (National Common Mobility Card) स्मार्ट कार्ड बंधनकारक करण्यात येणार आहे, अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली.
12 Jun 2026 01:02 PM (IST)
नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदावर राहण्याचा विक्रम करून पंडित जवाहलाल नेहरुंच्या पंतप्रधानपदापेक्षा जास्त काळ ते पदावर आहेत असा ढोल पिटला जात आहे परंतु नरेंद्र मोदी यांचे १२ वर्षातील कर्तृत्व व देशासाठी योगदान काय हे शोधावे लागेल. गेल्या १२ वर्षात नरेंद्र मोदी देशाला चुकीच्या दिशेने घेऊन गेले, त्याची मोठी किंमत पुढील अनेक वर्ष देशाला मोजावी लागणार आहे. १२ वर्षांच्या मोदी सरकारच्या कामाचे मुल्यमापन करायचे झाले तर मोदी सरकारमध्ये ‘राम’ही नाही व दाखवावे असे एकही ‘काम’ नाही, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे.
12 Jun 2026 12:48 PM (IST)
शिक्रापूर (ता. शिरूर) आणि परिसरातील वेगवेगळ्या महिला तसेच युवतींना मोबाईलवर वारंवार मेसेज करून मानसिक त्रास देणाऱ्या एका विकृत तरुणाला शिक्रापूर पोलिसांच्या शोध पथकाने अत्यंत शिताफीने जेरबंद केले आहे. विशाल राजेंद्र गव्हाणे (वय अंदाजे २४, रा. बेलवडी, ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर) असे अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. गेल्या काही दिवसांपासून शिक्रापूर आणि आसपासच्या परिसरामध्ये अनेक तरुणी व महिलांना एका विशिष्ट मोबाईल नंबरवरून वेगवेगळ्या प्रकारचे अश्लील आणि मनात लज्जा उत्पन्न होईल असे मेसेज येत होते. या त्रासाला कंटाळून अखेर एका धाडसी तरुणीने शिक्रापूर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात रीतसर फिर्याद दाखल केली होती. महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न असल्याने पोलिसांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत तात्काळ गुन्हा दाखल केला. पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार बापू हाडगळे यांनी या गुन्ह्याचा तपास सुरू केला. सायबर सेलच्या मदतीने आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी काही पीडित महिला व कतरुणींकडे विश्वासात घेऊन विचारपूस केली. यादरम्यान पोलिसांना विशाल गव्हाणे या युवकावर संशय आला. पोलिसांनी सापळा रचून विशालला ताब्यात घेतले आणि त्याची सखोल चौकशी सुरू केली.
12 Jun 2026 12:36 PM (IST)
शासकीय विभागात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून कणकवलीत एका उच्चशिक्षित बेरोजगार तरुणीची लाखो रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या गोपनीय विभागात नोकरी लावतो, असे खोटे सांगून संशयित आरोपीने या तरुणीकडून २ लाख २४ हजार ६५० रुपये उकळले. पैसे देऊनही नोकरी न मिळाल्याने आणि दिलेले पैसे परत देण्यास नकार दिल्याने अखेर या प्रकरणी तोंडवली येथील श्रीकृष्ण शामसुंदर कुडतरकर याच्याविरुद्ध कणकवली पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
12 Jun 2026 12:24 PM (IST)
पाण्याअभावी जळालेल्या उसाच्या पंचनाम्याची मागणी घेऊन आलेल्या शेतकऱ्याशी झालेल्या संवादामुळे राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे नव्या वादात सापडले आहेत. भरणेवाडी येथे घडलेल्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून, त्यामध्ये शेतकऱ्याची तक्रार ऐकून घेण्याऐवजी त्याला भेट नाकारल्याचा आरोप केला जात आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये संबंधित शेतकरी पाण्याअभावी जळालेल्या उसाच्या नुकसानीबाबत पंचनामा करण्याची मागणी करताना दिसतो. यावेळी शेतकरी आपली व्यथा मांडत असताना कृषिमंत्री दत्तात्रय भरणे “माझ्याकडे काही नाही तुमचं… मी साधा माणूस आहे… गरीब माणूस आहे… तुम्ही मोठी माणसं आहात…” असे म्हणत शेतकऱ्याच्या बोलण्याची नक्कल करत असल्याचे दिसून येत आहे. यानंतर “तुम्ही मोठ्या माणसांचे ऐकून आंदोलन करता, ज्यांनी सांगितलं त्यांच्याकडे जा,” असेही ते म्हणाल्याचे व्हिडिओमध्ये ऐकू येते.
12 Jun 2026 12:12 PM (IST)
शिक्षकांना देण्यात आलेल्या जनगणनेच्या कामांमुळे पुढे ढकलावे लागलेल्या शिक्षक प्रशिक्षणाचे नवे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार इयत्ता दुसरी, तिसरी, चौथी आणि सहावी या वर्गांना शिकवणाऱ्या शिक्षकांसाठी प्रशिक्षण आयोजित करण्यात आले असून, १० जुलैपर्यंत तालुका स्तरापर्यंतचे पूर्ण करण्यात येणार आहे. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या (एससीईआरटी) सहसंचालक डॉ. कमलादेवी आवटे यांनी प्रशिक्षण वेळापत्रकासह सूचनांचे परिपत्रक प्रसिद्ध केले.
12 Jun 2026 12:00 PM (IST)
जागतिक राजकारणात आणि विशेषतः मध्य-पूर्व आशियात (Middle East) सध्या कमालीचा तणाव निर्माण झाला आहे. जगातील सर्वाधिक खनिज तेलाची वाहतूक ज्या सागरी मार्गावरून होते, त्या ‘होर्मुझच्या सामुद्रधुनी’ची (Strait of Hormuz) सुरक्षा आता जागतिक चिंतेचा विषय बनली आहे. इराणसोबत सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर, हा सागरी मार्ग सुरक्षित आणि खुला ठेवण्यासाठी अमेरिकेने आता थेट लष्करी बळाचा वापर करण्याची तयारी सुरू केली आहे. यासाठी अमेरिका एका बहुराष्ट्रीय संयुक्त लष्करी व्यवस्थेवर (Multitask Military Force) काम करत आहे. विशेष म्हणजे, या जागतिक लष्करी मोहिमेत भारतानेही आपले सैन्य पाठवावे, यासाठी अमेरिका आणि तिच्या पाश्चात्त्य मित्र राष्ट्रांकडून नवी दिल्लीवर प्रचंड दबाव आणला जात आहे. मात्र, भारताने नेहमीप्रमाणेच आपली स्वतंत्र आणि तटस्थ भूमिका कायम ठेवत या मोहिमेत सैन्य पाठवण्यास स्पष्ट नकार दिला आहे.
12 Jun 2026 11:55 AM (IST)
गेल्या काही दिवसांपासून शेअर मार्केटमध्ये विविध घडामोडी घडत आहेत. त्यातच शुक्रवारी भारतीय शेअर बाजाराची सुरुवात दमदार झाली. सुरुवातीच्या व्यवहारात, बीएसई सेन्सेक्स 1100 हून अधिक अंकांनी वधारून ७४९०० च्या जवळ पोहोचला, तर एनएसई निफ्टीमध्येही जवळपास २०० अंकांची वाढ होऊन तो तेजीत होता. बाजारातील ही तेजी सुधारलेल्या जागतिक संकेत आणि गिफ्ट निफ्टीच्या दमदार कामगिरीमुळे आल्याचे दिसून येत आहे. बाजारातील ही गिफ्ट निफ्टी जवळपास २०० अंकांनी वधारल्याने देशांतर्गत बाजाराला आधार मिळाला. शुक्रवारी म्हणजेच आठवड्याच्या शेवटच्या दिवशी सुरुवातीच्या व्यवहारात बँकिंग आणि ऑटो क्षेत्रातील शेअर्समध्ये लक्षणीय तेजी दिसून आली. आयसीआयसीआय बँक, महिंद्रा अँड महिंद्रा, कोटक महिंद्रा बँक, जेएसडब्ल्यू स्टील आणि रिलायन्स इंडस्ट्रीज यांसारखे प्रमुख शेअर्स तेजीत व्यवहार करत होते. गुरुवारी बाजारात लक्षणीय चढ-उतार दिसून आले. त्यानंतर आता कमालीची तेजी दिसून आली.
12 Jun 2026 11:45 AM (IST)
NEET परीक्षेला दीर्घकाळापासून विरोध करणाऱ्या तामिळनाडूने हा मुद्दा पुन्हा एकदा राष्ट्रीय स्तरावर आणला आहे. नवी दिल्ली येथे झालेल्या नीती आयोगाच्या ११ व्या नियामक परिषदेच्या बैठकीत, तामिळनाडूचे मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांनी सध्याच्या वैद्यकीय महाविद्यालय प्रवेश पद्धतीत बदल करण्याची मागणी केली. त्यांनी सुचवले की एमबीबीएस, बीडीएस आणि आयुष अभ्यासक्रमांमधील राज्य कोट्याच्या जागांवरील प्रवेश नीटऐवजी इयत्ता १२वीच्या गुणांवर आधारित असावा.
मुख्यमंत्री विजय यांनी सांगितले की, पदवीपूर्व वैद्यकीय आणि दंतवैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या राष्ट्रीय पात्रता सह प्रवेश परीक्षेला (NEET) तामिळनाडू सरकारचा पाठिंबा नाही. त्यांच्या मते, या परीक्षेच्या अंमलबजावणीमुळे ग्रामीण आणि सामाजिक-आर्थिकदृष्ट्या दुर्बळ घटकांतील विद्यार्थ्यांवर प्रतिकूल परिणाम झाला आहे. त्यांनी केंद्र सरकारला केवळ इयत्ता १२वीच्या गुणांच्या आधारावर राज्य कोट्याच्या जागांवर प्रवेश देण्याची परवानगी देण्याचे आवाहन केले.
12 Jun 2026 11:35 AM (IST)
आखाती देशांमध्ये आणि मध्य पूर्वेमध्ये गेल्या १०० दिवसांपेक्षा अधिक काळापासून सुरू असलेल्या लष्करी तणावाने आता अत्यंत धोकादायक वळण घेतले आहे. आंतरराष्ट्रीय समुद्रकिनाऱ्यावर व्यापारी जहाजांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असतानाच, एका धक्कादायक आंतरराष्ट्रीय घडामोडीत अमेरिकन नौदलाने ओमानच्या किनाऱ्याजवळ भारतीय कर्मचारी असलेल्या तीन वेगवेगळ्या व्यापारी जहाजांवर थेट लष्करी हल्ले केले आहेत. या क्षेपणास्त्र हल्ल्यांमध्ये ३ भारतीय खलाशांना आपला जीव गमवावा लागल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या गंभीर घटनेनंतर भारताने आक्रमक पाऊल उचलत अमेरिकेकडे आपला तीव्र निषेध नोंदवला असून, “हे हल्ले आता पूर्णपणे थांबलेच पाहिजेत,” असा कडक आणि थेट संदेश वॉशिंग्टनला दिला आहे.
12 Jun 2026 11:25 AM (IST)
ज्येष्ठ अभिनेते दिनयार तिरंदाज यांचे निधन झाले आहे. गुरुवारी सोशल मीडियावर ही बातमी पसरताच त्यांचे चाहते शोकसागरात बुडाले. या दिग्गज अभिनेत्याच्या निधनाची बातमी एका पारसी झोरोस्ट्रियन फेसबुक पेजवरून शेअर करण्यात आली. गुरुवारी, पारसी झोरोस्ट्रियन वर्ल्डवाइड फेसबुक पेजवर पोस्ट करण्यात आले की, “कै. रुस्तम तिराद यांचे बंधू श्री. दिनयार तिरंदाज यांचे निधन झाले आहे. त्यांचा अंत्यविधी आज दुपारी ३:४५ वाजता मुंबईतील वाडिया बंगलो येथे होईल.” या पोस्टवर चाहत्यांनीही अभिनेत्याच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.
12 Jun 2026 11:20 AM (IST)
जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती, इलॉन मस्क यांच्या मालकीची स्पेसएक्स (SpaceX) आज सूचीबद्ध होणार आहे. गुंतवणूकदारांनी कंपनीच्या ७५ अब्ज डॉलर्सच्या मेगा आयपीओचे स्वागत केले आहे. केवळ रिटेल भागासाठीच ७० अब्ज डॉलर्सच्या बोली लागल्या आहेत. स्पेसएक्सच्या सूचीकरणापूर्वीच, गुरुवारी मस्क यांच्या निव्वळ संपत्तीत २७४ अब्ज डॉलर्सची वाढ झाली, ज्यामुळे त्यांनी गौतम अदानी आणि मुकेश अंबानी यांची एकत्रित निव्वळ संपत्ती ओलांडली. यासह, ते ९७१ अब्ज डॉलर्ससह जगातील पहिले ट्रिलियनपती बनण्याच्या उंबरठ्यावर आहेत.
12 Jun 2026 11:10 AM (IST)
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म टेलिग्रामने अॅपल वॉचसाठी एक संपूर्ण नेटिव्ह ॲप लाँच केले आहे. हे ॲप अॅपलच्या वियरेबल डिव्हाईसवर मेसेजिंग फीचर्सचा एक संपूर्ण सेट ऑफर करतो. या रिलीझमुळे अनेक वर्षांनंतर या प्लॅटफॉर्मचे वॉचओएसवर पुनरागमन झाले आहे, कारण कंपनीने आपले अधिकृत स्मार्टवॉच ॲप्लिकेशन बऱ्याच काळापूर्वी बंद केले होते. या नव्या ॲपमुळे यूजर्स आता थेट त्यांच्या मनगटावरून कन्वर्सेशन्स अॅक्सेस करू शकणार आहेत, मेसेज पाठवू शकणार आहेत आणि रिसिव्ह देखील करू शकणार आहेत.
12 Jun 2026 11:05 AM (IST)
पश्चिम बंगालमधील दारूण पराभवानंतर तृणमूल काँग्रेस राष्ट्रीय काँग्रेसमध्ये विलीनीकरण करणार असल्याची बातमी समोर आली होती. ही बातमी ताजी असतानाच आता महाराष्ट्रातील असाच एक मोठा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार असल्याची माहिती आहे. देशातील बहुतांश राज्यांमध्ये प्रादेशिक पक्षांना शह देत सत्ता स्थापन करणाऱ्या भाजपला आगामी काळात रोखण्यासाठी विरोधी गोटात अत्यंत मोठ्या घडामोडी सुरू झाल्या आहेत. शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा थेट मूळ काँग्रेस पक्षात विलीन करण्याच्या चर्चेने सध्या देशाच्या आणि राज्याच्या राजकारणात प्रचंड जोर धरला आहे. शरद पवार गट आणि काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये या विलीनीकरणाबाबत अतिशय गांभीर्याने विचारमंथन सुरू असल्याची खात्रीशीर माहिती समोर येत आहे.
12 Jun 2026 10:57 AM (IST)
अक्षय कुमारला त्याच्या निवृत्तीच्या योजनांबद्दल विचारण्यात आले. अभिनेत्याने कोणताही संकोच न बाळगता मनमोकळेपणाने सांगितले, “कधीकधी मला निवृत्त व्हावेसे वाटते. पहाटे ४ वाजता जाग आल्यावर हा विचार मनात येतो. पण पाच सेकंदांनंतर मला आठवते की मला शूटिंगवर जायचे आहे, जिथे ३०० लोक माझी वाट पाहत आहेत. मग मी स्वतःला सांगतो की निवृत्तीचा विचार दुसऱ्या दिवशी करेन.” असे करत ३६ वर्षे झाली आहेत.
12 Jun 2026 10:47 AM (IST)
भोपाळ : मध्य प्रदेश विधानसभा निवडणूक अधिकारी किंवा निवडणूक आयोगाने आपली उमेदवारी रद्द करण्याच्या निर्णयावर कोणतीही सुनावणी घेतली नाही. त्यामुळे काँग्रेसच्या राज्यसभा उमेदवार मीनाक्षी नटराजन गुरुवारी पहाटे सर्वोच्च न्यायालयाच्या सुट्टीकालीन खंडपीठासमोर हजर झाल्या. आपल्या याचिकेत नटराजन यांनी ११ जून रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत असल्याचे कारण देत निकाल जाहीर करण्यावर स्थगिती देण्याची विनंती केली.
12 Jun 2026 10:37 AM (IST)
कंपनी टेक्नोने भारतात एक नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. मिड रेंज सेगमेंटमध्ये लाँच करण्यात आलेल्या या नव्या स्मार्टफोनचे नाव Pova 8 असे आहे. कंपनीने सादर केलेला नवा स्मार्टफोन गेल्यावर्षी लाँच करण्यात आलेल्या Pova 7 चा सक्सेसर आहे. नव्या Pova 8 स्मार्टफोनमध्ये अनेक दमदार फीचर्स मिळणार आहेत.
12 Jun 2026 10:27 AM (IST)
भारतात 12 जून रोजी 24 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 14,563 रुपये, 22 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 13,349 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 10,922 रुपये आहे. भारतात 12 जून रोजी 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,33,490 रुपये, 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,45,630 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,09,220 रुपये आहे. भारतात 12 जून रोजी चांदीचा भाव प्रति ग्रॅम 249.90 रुपये आणि प्रति किलोग्रॅम 2,49,900 रुपये आहे.
12 Jun 2026 10:17 AM (IST)
शहरातील गुन्हेगारीने पुन्हा एकदा डोके वर काढल्याचे धक्कादायक चित्र समोर आले. रेल्वे मालधक्का ठेक्याच्या वादातून हमाल पंचायतचे नेते बाळासाहेब बंडगर यांना ठार मारण्यासाठी आलेल्या संशयितांनी ते हाती न लागल्याने त्यांच्या अवघ्या १४ वर्षीय नातवावर गोळी झाडून त्याचा निर्घृण खून केला. या थरारक घटनेमुळे सांगली शहर हादरून गेले असून कायदा-सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
12 Jun 2026 10:07 AM (IST)
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत हे ज्या शताब्दी एक्सप्रेसने जात होते, त्या गाडीवर दगडफेक करण्यात आली. शताब्दी एक्सप्रेसच्या एक्झिक्युटिव्ह क्लास ई-१ बोगीतून ते प्रवास करत होते. ही ट्रेन माखनपूर-फिरोजाबाद दरम्यान जात होती. त्यादरम्यानच डब्यावर अचानक दगडफेक झाली. दगड थेट आरएसएस प्रमुख प्रवास करत असलेल्या डब्यावर आदळला, ज्यामुळे खिडकीची काच फुटली.
12 Jun 2026 09:57 AM (IST)
गेल्या काही दिवसांपासून पश्चिम बंगालमध्ये अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत. अनेक नेतेमंडळी माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची साथ सोडून तृणमूल काँग्रेसमधून बाहेर पडत आहेत. त्यातच आता तृणमूल काँग्रेसचे राज्यसभा सदस्य प्रकाश चिक बराइक यांनी गुरुवारी पक्ष तसेच राज्यसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. पश्चिम बंगालच्या जनतेने भाजपला दिलेल्या जनादेशाच्या पार्श्वभूमीवर आपण हा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.






