फोटो सौजन्य - Social Media
आयपीएस अधिकारी बनण्याचे स्वप्न पाहणाऱ्या लाखो तरुणांनी यूपीएससी परीक्षा दिली, पण ती उत्तीर्ण होणे सोपे नाही. अनेक जण अपयशानंतर स्वप्नांशी तडजोड करतात, पण उत्तर प्रदेशच्या आशना चौधरी यांनी हार मानली नाही. अपार मेहनत, संयम आणि जिद्दीच्या जोरावर त्यांनी तिसऱ्या प्रयत्नात यूपीएससी उत्तीर्ण करून आयपीएस अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण केले.
उत्तर प्रदेशच्या हापुड़ जिल्ह्यातील पिलखुआच्या रहिवासी असलेल्या आशना चौधरी त्यांच्या बुद्धिमत्तेबरोबरच सौंदर्यासाठीही चर्चेत असतात. त्यांचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतात, आणि लोक त्यांची मेहनत व साधेपणाचे कौतुक करतात. त्यांचे वडील डॉ. अजीत सिंग हे सरकारी महाविद्यालयात प्राध्यापक आहेत, तर आई इंदू सिंग गृहिणी आहेत. आशनाने दिल्लीतील लेडी श्रीराम कॉलेज फॉर विमेनमधून इंग्लिश लिटरेचरमध्ये पदवी घेतली आणि नंतर साउथ एशियन युनिव्हर्सिटीमधून इंटरनॅशनल रिलेशन्समध्ये मास्टर्स केले.
आशनाने २०१९ मध्ये यूपीएससी परीक्षेची तयारी सुरू केली आणि २०२० मध्ये पहिल्यांदा परीक्षा दिली. मात्र, ती पहिल्या टप्प्यातच अडकली आणि प्रीलिम्सही उत्तीर्ण होऊ शकली नाही. तरीही तिने हार मानली नाही आणि २०२१ मध्ये पुन्हा प्रयत्न केला. यावेळी तिला थोडेसे यश मिळाले, पण अंतिम यशापासून काही गुणांनी दूर राहिली. दोन वेळा अपयश आल्याने अनेक जण निराश झाले असते, पण आशनाने जिद्द कायम ठेवली. तिने आपले अभ्यास पद्धत सुधारले, कमकुवत बाबींवर अधिक लक्ष दिले आणि आत्मविश्वास कायम ठेवला. अखेर २०२२ मध्ये तिने तिसऱ्यांदा यूपीएससी परीक्षा दिली आणि आपल्या मेहनतीचे फळ मिळवत ११६वी रँक मिळवली. या यशासह तिने आयपीएस अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण केले.
आयपीएस अधिकारी झाल्यानंतर आशना चौधरी सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरल्या आहेत. त्यांच्या यशाने अनेकांना प्रेरणा मिळत आहे. त्यांचे मेहनतीने भरलेले जीवनप्रवास, त्यांची जिद्द आणि चिकाटी हे युवकांसाठी एक मोठा आदर्श ठरले आहेत. विशेषतः जे विद्यार्थी पहिल्या किंवा दुसऱ्या अपयशानंतर माघार घेतात, त्यांच्यासाठी आशनाची कहाणी एक मोठा धडा आहे. मेहनत, संयम आणि आत्मविश्वास या त्रिसूत्रीच्या मदतीने कोणतीही कठीण परीक्षा यशस्वीपणे पार करता येते, हे तिने सिद्ध करून दाखवले. जर तुम्ही आशना यांच्यासारखी मेहनत, धैर्य आणि जिद्द ठेवल्यास, निश्चितच यश तुमच्या पायाशी असेल!