शेतकरी कर्जमाफीवरून कृषिमंत्र्यांचं मोठं विधान; 'एकही शेतकरी वंचित राहणार नाही...'
मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अलीकडेच झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत सहकारी मंत्र्यांना कर्जमाफीची प्रक्रिया जलदगतीने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार, आवश्यक प्रशासकीय आणि तांत्रिक प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून, लवकरच अंमलबजावणीला सुरुवात होण्याची शक्यता आहे.
Farmers News: 15 दिवसांपासून पावसाचा पत्ता नाही; शेवगावच्या शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ
दरम्यान, कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनीही कर्जमाफीबाबत एका वृत्तवाहीनीला महत्त्वाची माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की, सरकारकडून कर्जमाफीची प्राथमिक लाभार्थी यादी जाहीर करण्याची तयारी पूर्ण झाली असून ती लवकरच प्रसिद्ध केली जाईल. आयकर विभागाकडून आवश्यक डेटा प्राप्त झाल्यामुळे यापूर्वी असलेल्या तांत्रिक अडचणी दूर झाल्या आहेत. त्यामुळे आता कर्जमाफीची प्रक्रिया कोणत्याही अडथळ्याशिवाय पुढे जाईल, असा दावा त्यांनी केला.
कृषीमंत्र्यांच्या माहितीनुसार, सरकारचे उद्दिष्ट 30 जुलैपूर्वी पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा करण्याचे आहे. यामुळे पात्र शेतकऱ्यांना थेट आर्थिक दिलासा मिळणार असून आगामी खरीप हंगामासाठीही त्यांना मदत होणार आहे.
याचवेळी, राज्य सरकारने बोगस बियाण्यांच्या विरोधातही मोठी कारवाई सुरू केली आहे. आतापर्यंत बोगस बियाण्यांबाबत 11,584 तक्रारी प्राप्त झाल्या असून 81 कंपन्यांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचे कृषीमंत्र्यांनी स्पष्ट केले.
तथापि, कर्जमाफीच्या अंमलबजावणीबाबत सरकारकडून अधिकृत शासन निर्णय (GR) आणि अंतिम पात्र लाभार्थी यादी प्रसिद्ध होणे अद्याप बाकी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी केवळ अधिकृत सरकारी घोषणा आणि संबंधित विभागाकडून प्रसिद्ध होणाऱ्या माहितीलाच अधिकृत मानावे.
सरासरी पेरणी क्षेत्र: 47.12 लाख हेक्टर
19 जुलै पर्यंत पेरणी झालेले क्षेत्र: 41.64 लाख हेक्टर
2. बियाणे
आवश्यक बियाणे: 13.125 लाख क्विंटल
एकूण बियाणे उपलब्धता: 18.57 लाख क्विंटल
3. तक्रारी आणि कारवाई
उगवण क्षमते बाबत तक्रारी: 11,584
मुख्यतः अकोला, अमरावती, बुलढाणा व यवतमाळ जिल्ह्यात
तालुकास्तरीय तक्रार निवारण समितीने तपासलेली प्रकरणे: 8,192
सोयाबीन पिकाची तपासणीसाठी घेतले नमुने: 7,422
बियाणे तपासणी प्रयोगशाळेद्वारे अमान्य घोषित नमुने: 763
कंपन्यांविरोधात दाखल FIR: 81


