अकोला जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अकोल्यातील तेल्हारा तालुक्यातील वडगाव रोठे येथे मंगळवारी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास वसंता बरिंगे यांच्या घराच्या बांधकामस्थळी मोठी दुर्घटना घडली आहे. सेंट्रिंगचे काम करत असताना १४ ते १५ तरुणांना विजेचा जोरदार शॉक लागला. त्यातून १७ वर्षीय अल्पवयीन कामगाराचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव ओमप्रकाश केशवराव जांभळे असे आहे तो बुलढाणा जिल्ह्यातील वसाडी (ता. संग्रामपूर) येथील रहिवासी आहे. तो इतर मजुरांसोबत घराच्या स्लॅब टाकण्याच्या कामासाठी आला होता.
नववीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याची आत्महत्या; गळफास घेऊन संपवलं जीवन
नेमकं काय घडलं?
वसंता बरिंगे यांच्या घराचे काम सुरु होते. स्लॅब टाकण्याचे काम आटपून मिक्सर मशीन बाजूला घेत असताना मिक्सरच्या गाडीचा विद्युत ताराला स्पर्श झाला आणि अनर्थ घडला. जवळपास १४- १५ जणांना विजेचा जोरदार शॉक लागला. बाकीच्यांना मिक्सरपासून लांब करण्यात आलं. मात्र अल्पवयीन ओमप्रकाश जांभळे याच्याकडे लक्ष न दिल्याने त्याला विद्युत ताराच्या प्रवाहाचा जोरदार झटका बसला. त्याला उपचारासाठी नेत असतांना वाटेतच त्याचा मृत्यू झाला.
या घटनेत आठ कामगार किरकोळ जखमी झाले असून त्यांच्यावर तेल्हारा ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले. सर्व कामगार हे बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील असल्याची माहिती समोर आली आहे. सेंट्रिंगचा साचा उचलताना तो वीजवाहक तारेला लागल्याने विजेचा शॉक बसल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी तेल्हारा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, या दुर्घटनेनंतर बांधकाम ठेकेदार घटनास्थळावरून पसार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. अपुऱ्या सुरक्षात्मक उपाययोजनांमुळे वडगाव रोठे येथे ही दुर्घटना घडली असावी, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
नववीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याची आत्महत्या; गळफास घेऊन संपवलं जीवन
इयत्ता नववीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत असून, या प्रकरणी चुंचाळे पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. युवराज मंगल मगरे (१३, रा. रमाबाई आंबेडकरनगर, औद्योगिक वसाहत, अंबड) असे आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थ्यांचे नाव आहे.
मंगल मगरे हे येथे कुटुंबासमवेत राहतात. सोमवारी सायंकाळी घरातील सर्व जण पांडवलेणी येथे यात्रेसाठी गेले होते. युवराज हा त्यांच्याबरोबर यात्रेला गेला नसल्याने तो घरी एकटाच होता. घरातील सर्वजण यात्रेवरून रात्री नऊ वाजता घरी आले असता युवराजने राहत्या घरातील किचन रुममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. आत्महत्या करण्याचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.