नववीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याची आत्महत्या; गळफास घेऊन संपवलं जीवन (फोटो सौजन्य- PINTEREST)
सिडको : इयत्ता नववीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत असून, या प्रकरणी चुंचाळे पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. युवराज मंगल मगरे (१३, रा. रमाबाई आंबेडकरनगर, औद्योगिक वसाहत, अंबड) असे आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थ्यांचे नाव आहे.
मंगल मगरे हे येथे कुटुंबासमवेत राहतात. सोमवारी सायंकाळी घरातील सर्व जण पांडवलेणी येथे यात्रेसाठी गेले होते. युवराज हा त्यांच्याबरोबर यात्रेला गेला नसल्याने तो घरी एकटाच होता. घरातील सर्वजण यात्रेवरून रात्री नऊ वाजता घरी आले असता युवराजने राहत्या घरातील किचन रुममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. आत्महत्या करण्याचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
हेदेखील वाचा : Pune Crime News: चुलतीला ‘I Love You’म्हणाल्याचा रागातून हत्या; हॉकी स्टिक आणि लाथा बुक्क्यांनी केली मारहाण
युवराज हा अंबड येथील मनपा शाळेत इयत्ता नववीमध्ये शिकत होता. त्याच्या पश्चात आई, वडील, तीन बहिणी असा परिवार आहे. तो घरात एकुलता एक होता. त्याच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. पुढील तपास चुंचाळे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे. युवराजवर नाशिक पंचवटी अमरधाममध्ये शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
पुण्यात तरुणीची आत्महत्या
दुसऱ्या एका घटनेत, ससून रुग्णालयाच्या बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयात दुसऱ्या वर्षात शिक्षण घेणाऱ्या एका २३ वर्षीय तरुणीने गळफास लावून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार काही दिवसांपूर्वीच उघडकीस आला आहे. मंगळवारी रात्री वसतिगृहातील एका खोलीत तिने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. ज्योती कृष्णकुमार मीना (वय २३, रा. राजस्थान) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. याप्रकरणी बंडगार्डन पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
हेदेखील वाचा : Chhatrapati Sambhajinaga news: आमदाराच्या पुतण्याची आत्महत्या, माफ करा! सगळ्यांना त्रास दिल्याबद्दल, तुमच्या…