परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील वर्णा गावात एका ३२ वर्षीय विवाहित महिलेचा मृतदेह सापडला. विवाहित महिलेचा सासरच्या मंडळींनी छळ करून हत्या केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. या कारणामुळे बोरी पोलीस आणि विवाहितेच्या नातेवाईकांमध्ये बाचाबाची झाली आहे. तसेच सदर विवाहितेचा मृतदेह ताब्यात घेण्यास नातेवाईकांनी नकार दिला आहे. नातेवाईकांनी नकार दिल्याने आज दुपारपासून नातेवाईक आणि त्यांचा मृतदेह हा बोरी येथील रुग्णालयात आहे.
नेमकं काय प्रकरण?
परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील निवळी येथील वंदना यांचा विवाह वर्णा येथील विष्णु अंबुरे यांच्यासोबत झाला होता. मात्र लग्नानंतर सासरच्या मंडळींनी वंदनाला त्रास द्यायला सुरुवात केली. त्यांचा मानसिक आणि शारीरिक छळ करण्यात आला. त्यातच आज दुपारी दीड वाजता वंदना यांच्या घरच्यांना कळवण्यात आलं की त्यांचा मृत्यू झाला आहे. माहिती मिळताच वंदनाच्या माहेरचे मंडळीही त्यांच्या गावी वर्णा येथे पोहोचले. त्यांनी त्यांचा मृतदेह बघितला त्यावेळी वंदना यांच्या गळ्यावर व्रण दिसून आल्याने त्यांनी वंदनाचा मृतदेह हा शवविच्छेदनासाठी बोरी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. यावेळी वंदना यांचा मृत्यू झाला नसून त्यांची हत्या झाल्याचा आरोप सासरच्या मंडळींनी केला आहे,.
वंदनाच्या माहेरच्यांनी पवित्रा घेतला आहे की जोपर्यंत त्यांच्या नवऱ्यावर आणि सासऱ्यावर खुनाचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा घेतला आहे. त्यामुळे वंदना यांचा मृतदेह हा बोरी येथील रुग्णालयातच ठेवण्यात आला होता. हत्येचा गुन्हा दाखल करण्यावरून पोलीस आणि वंदना यांच्या माहेच्या मंडळींच्या नातेवाईकांमध्ये जोरदार बाचाबाची झाली. यामुळे बोरी परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झाला आहे.
नांदेड हादरलं! एका शिक्षकाने लॉजमध्ये पंख्याला गळफास लावून संपवलं जीवन
नांदेडमध्ये एक धक्कदायक प्रकार समोर आला आहे. नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यातील एका खासगी संस्थेवर काम करणाऱ्या शिक्षकाचा एका लाऊंजमध्ये मृतदेह आढळून आला आहे. अर्धापूर तालुक्यातील पिंपळगाव महादेव पाटील जवळ असणाऱ्या हॉटेल्स स्वराज्य लॉजमध्ये शनिवारी सकाळी ही घटना घडली आहे. मृत शिक्षकाचे नाव आशिष भाऊसाहेब शिंदे असे आहे. रूम सर्व्हिससाठी लॉजच्या वेटरने खूप वेळा दार वाजवलं परंतु आतून कसलाच अवाज आलेला नाही त्यामुळे रूमचा दार उघडण्यात आलं त्यावेळी आशिष शिंदे या शिक्षकाने पंख्याला गळफास लावून घेतल्याचं समोर आलं आहे.
Washim Crime News: वाशिम हादरलं! जीवे मारण्याची धमकी देत २० वर्षीय तरुणीवर अनेकदा अत्याचार