जालना शहरातील क्रीडा प्रबोधिनीतून एक अत्यंत संतापजनक घटना समोर आली आहे. या प्रबोधिनीत क्रीडा शिक्षण घेणाऱ्या चार अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग करण्यात आल्याचं समोर आलं आहे. विनयभंग केल्याचा आरोप क्रीडा शिक्षक तथा व्यवस्थापक प्रमोद खरात याच्यावर ठेवण्यात आले आहे. या प्रकरणामध्ये पोलीस आणि शिक्षण विभागाने चौकशी केली या चौकशीनंतर अखेर प्रमोद खरातला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
ऑनलाईन गेमसाठी पैसे न दिल्याने सावत्र आईची केली हत्या; नैसर्गिक मृत्यूचा रचला होता बनाव, मात्र..
नेमकं काय प्रकरण?
जालना शहरात क्रीडा प्रबोधिनी आहे. इथे ग्रामीण भागातून आलेल्या अल्पवयीन मुली क्रीडा शिक्षण घेतात. याच ठिकाणी प्रमोद खरात हा क्रीडा शिक्षक आणि व्यवस्थापक म्हणून कार्यरत होता. तो क्रीडा शिक्षणाच्या नावाखाली येथील अल्पवीन मुलींचे लैंगिक शोषण करत असल्याची गोपनीय माहिती पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांना मिळाली होती.
या गोपनीय माहितीनंतर, शिक्षण विभागाने या प्रकरणाची शनिवारी चौकशी केली. त्यानंतर सहायक पोलीस निरीक्षक आरती जाधव यांनी स्वतः पीडित मुलींची चौकशी केली. तेव्हा या सखोल चौकशीनंतर, गट शिक्षण अधिकाऱ्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून क्रीडा शिक्षक आणि प्रबोधिनी व्यवस्थापक प्रमोद खरात याच्या विरोधात विनयभंग आणि पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपी प्रमोद खरातला बेड्या ठोकल्या.
या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक आरती जाधव या करत असल्याची माहिती जालन्याचे उपविभागीय पोलिस अधिकारी अनंत कुलकर्णी यांनी दिली आहे. आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी पालक करत आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.
अल्पवयीन मुलीचा रस्त्यात गाठून विनयभंग
पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. अल्पवयीन मुलीला इस्टाग्रामवर वारंवार मॅसेज करून तसेच तिचा पाठलाग करून तिच्या भावाला मारहाण केली. त्याला हत्याराचा धाक दाखवून जिवे मारण्याची धमकी देत मुलीचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी सोहेल उमर शेख याच्यासह त्याच्या दोन मित्रांवर कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पिडीत मुलीच्या भावाला जेव्हा आरोपी धमकी देत होते, तेव्हा आजुबाजुला जमलेले लोक पाहात असताना लोकांसमोर हवेत हत्यार फिरवुन कोणी आमच्या जवळ आले तर एक एकाला मारून टाकून असे म्हणत दहशत देखील माजवली असल्याचे तक्रारीत म्हंटले आहे. मागील चार वर्षापासून आरोपी हे पिडीत मुलीला त्रास देत असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. भावाला मारहाण तसेच धमकावल्यानंतर पिडीत कुटूंबियांनी पोलिसांकडे धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.
मुलगा अन् दोन नातीच्या मृत्यूच्या धक्क्याने अखेर आजोबांनीही सोडले प्राण; बारामतीतील घटना