ऑनलाईन गेमसाठी पैसे न दिल्याने एका तरुणाने आपल्या सावत्र आईची निर्घृणपणे हत्या केल्याचे उघड झाले आहे. तसेच हा गुन्हा लपवण्यासाठी आपल्या वडील आणि चुलत्याच्या मदतीने आईचा फरशीवर घसरून मृत्यू झाल्याचा बनाव रचला होता. मात्र, पोलिसांनी हा बनाव हणून पाडला आहे. वसई गुन्हे शाखा २ च्या मदतीने २४ तासात या गुन्हयाची उकल करून चौघांना बेड्या ठोकल्या आहेत.
नेमकं काय आहे प्रकरण?
इम्रान खुसरु याला व्ही. आर. पी. ओ. हा ऑनलाईन गेम खेळायचा शोक होता. त्याला टेलिग्रामवरून या गेमचा मॅसेज आला होता. तो गेम खेळण्यासाठी त्याला एक लाख ८० हजार रुपयांची गरज होती. तो पैसे मागण्यासाठी आपल्या सावत्र आईकडे गेला होता तेव्हा त्याला तिने पैसे द्यायला नकार दिला. त्यामुळे त्याने तिची रंगाच्या भरात निर्घृणपणे हत्या केली. त्यानंतर हा गुन्हा लपवण्यासाठी बाप अमीर खुसरु, चुलता सलीम खुसरु यांच्या मदतीने त्याची आई फरशीवर पडून जखमी झाल्याने त्यातच तिचा मृत्यू झाल्याचा बनाव केला. त्यासाठी त्याने डॉक्टरकडून मृत्यूप्रमाणपत्र घेऊन तिचा मृतदेह मुस्लिम दफनभूमीत पुरून अंत्यविधी उरकला होता.
आई पेशाने वकील
वसई गुन्हेशाखा – 2 च्या टीमने २४ तासात चारही आरोपींना बेड्या टोकल्या आहेत. इम्रान खुसरु, बाप अमिर खुसरु, चुलता सलीम खुसरु, तसेच डॉ. आर. आर. गर्ग असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. तर मृत्यू झालेल्या महिलेचं नाव आर्शिया खुसरू (वय 61) असे आहे. आर्शिया ही पेशाने वकील होती. आणि हायकोर्टात प्रॅक्टिस करीत असल्याची माहिती उघड झाली आहे. ही घटना वसई पश्चिम डिमार्ट जवळील पेरियार अपार्टमेंटमध्ये 26 जुलै रोजी सकाळी सव्वा दहावाजता घडली आहे.
ऑनलाईन गेम साठी पाहिजे होते पैसे
आरोपी मुलगा इम्रान हा व्ही. आर. पी. ओ. हा ऑनलाईन गेम खेळायचा. त्याला या गेमचा मॅसेज टेलिग्राम वरून आला होता. तो गेम खेळण्यासाठी त्याला एक लाख ८० हजार रुपयांची गरज होती. ते पैसे मागण्यासाठी गेला असता त्याला त्याच्या आईने देण्यास नकार दिले आहेत. म्हणून त्याने रागाच्या भरात ही हत्या केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले असून, पोलीस याचा तपास करीत आहेत.