सौजन्य - सोशल मिडीया
उत्तर प्रदेशातील मेरठच्या सौरभ हत्याकांडानंतर आता यूपीतील औरैया येथूनही अशीच एक हत्या प्रकरण समोर आली आहे, पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. लग्नानंतर 15 दिवसातचं हत्या केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. औरैयाच्या सहार पोलीस स्टेशन हद्दीतील पलिया गावातील ही घटना आहे. औरिया पोलिसांनी या हत्येचा उलघडा केला आहे. पत्नी, तिचा प्रियकर आणि आणखी एकाला अटक केली आहे.
औरैया एसपी अभिजित आर. शंकर घटनेची माहिती देताना म्हणाले की, 19 मार्च 2025 रोजी 112 क्रमांकावर कॉल आला. औरैया जिल्ह्यातील सहार पोलीस स्टेशन परिसरात एक जखमी व्यक्ती गव्हाच्या शेतात पडून असल्याचे एकाने कॉलवरुन सांगितले होते. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन त्याला रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान दिलीपचा मृत्यू झाला. त्याचवेळी मृताच्या भावाच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, सुरुवातीला अज्ञात व्यक्तींनी हल्ला केल्याचे दिसत होते. मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव दिलीप यादव आहे असे समजले, यादव मूळचा मैनपुरीचा होता पण औरैयाच्या दिबियापूर भागात राहत होता.
सीसीटीव्ही पाहून आरोपी पकडले
“घटनेचा तपास करणाऱ्या पोलिसांनी परिसरात बसवलेले सीसीटीव्ही कॅमेरे तपासण्यास सुरुवात केली, ज्यामध्ये दिलीपला काही लोक दुचाकीवरुन घेऊन जात असल्याचं सीसीटीव्हीमध्ये समजलं. नंतर रामजी नगर याचे नाव पोलिसांना समजले. रामजी नगर याला पोलिसांनी अटक केली. अटक केल्यानंतर त्याने खून केल्याची कबुली दिली.
प्रगती-अनुरागचे अफेअर, दिलीपसोबत लग्न
एसपी अभिजित आर. शंकर म्हणाले, “दिलीप यादव यांचा 5 मार्च 2025 रोजी प्रगती यादवसोबत विवाह झाला होता. प्रगती आणि अनुराग हे एकाच गावचे रहिवासी असून, त्यांचे ४ वर्षे प्रेमप्रकरण सुरू होते. घरच्यांना त्यांच्या अफेअरची माहिती होती, पण लग्नाला परवानगी नव्हती. यानंतर प्रगतीचे दिलीप यादवसोबत जबरदस्तीने लग्न लावून देण्यात आले, त्यामुळे प्रगती खूश नव्हती. यावेळी प्रगतीने हत्येचा कट रचला आणि अनुरागला दिलीप खूप श्रीमंत असल्याचे सांगितले. नंतर प्रगतीने अनुरागला एक लाख रुपयेही दिले. अनुरागने रामजी नागर याला माहिती देऊन हत्या करण्याचा कट रचला.
हत्येप्रकरणी तिघांना अटक
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेत आणखी काही लोकांचा सहभाग असल्याचे समोर आले आहे. पोलीस त्यांचा तपास करत आहेत. तसेच दिलीप यादव हत्येप्रकरणी पोलिसांनी रामजी नागर, अनुराग उर्फ बबलू आणि प्रगती यादव या तिघांना अटक केली आहे.
पतीचे लोकेशन सांगून खून केला
प्रगतीने तिचा प्रियकर अनुराग उर्फ बबलू यादव याच्यासोबत तिचा पती दिलीपच्या हत्येचा कट आखण्यासाठी रामजी नागर उर्फ चौधरी याच्याशी 2 लाख रुपयांमध्ये बोलणी केली होती. कामापूर्वी एक लाख रुपये आगाऊ आणि त्यानंतर एक लाख रुपये देण्याचे ठरले होते. नंतर प्रगतीने पतीचे लोकेशन दिले आणि त्यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. सध्या पोलिसांनी आरोपींना अटक करुन पुढील कारवाई सुरू केली आहे.