वैद्यकीय प्रवेशाच्या नावावर 3 लाखांनी फसवणूक (File Photo : Fraud)
नागपूर : कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवून तीन आरोपींनी एका महिलेकडून घराची रजिस्ट्री व इतर कागदपत्रे घेतली. त्यानंतर ती रजिस्ट्री एका कंपनीत गहाण ठेवून 18 लाख 50 हजारांचे कर्ज उचलले आणि आपसात वाटणी करून घेतली. फसवणुकीची ही घटना गिट्टीखदान पोलिस ठाण्यांतर्गत उघडकीस आली.
पोलिसांनी पौर्णिमा गजभिये (वय 47, रा. गणेशनगर) यांच्या तक्रारीवरून तिन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. वर्षा भेंडे (वय 45), सारंग भेंडे (वय 27, रा. बेसा) आणि राजेंद्र दियेवार (रा. गोपालनगर) अशी आरोपींची नावे आहेत. पौर्णिमा यांना पैशांची आवश्यकता होती. त्यांनी कर्ज मिळण्यासाठी बरेच प्रयत्न केले. मात्र, तांत्रिक अडचणीमुळे त्यांना कर्ज मिळण्यास अडचण येत होती.
हेदेखील वाचा : Pune Crime News: भीक मागण्यासाठी पुण्यातून दोन वर्षांच्या चिमुरडीचे अपहरण; तुळजापूर येथून टोळीला अटक
दरम्यान, त्या मुलासोबत ऑनलाईन सर्च करत असताना आरोपी वर्षा हिचा मोबाईल क्रमांक मिळाला. त्यांनी वर्षाशी संपर्क केला. बँकेतून कर्ज मिळण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे सांगितले. आरोपी वर्षाने त्यांना घरी बोलावून घेतले. सविस्तर चर्चा केली. कर्ज मिळवून देण्याची हमी देत घराची संपूर्ण कागदपत्रे द्यावी लागतील, असे सांगितले.
वर्षाने घेतली मुलगा सारंगची मदत
वर्षाने मुलगा सारंग याच्या मदतीने पौर्णिमाकडून घराची सर्व कागदपत्रे, स्वाक्षरी केलेले कोरे धनादेश घेतले आणि त्यांना जिल्हा कार्यालयात बोलावले. तेथे त्यांचे फोटो काढले. पौर्णिमा अशिक्षित असल्याचा फायदा घेत त्यांच्या नावावर असलेल्या भूखंडाची रजिस्ट्री आरोपी राजेंद्र याच्या नावावर करून घेतली.
मायलेकांनी लढविली शक्कल
मायलेक आरोपींनी कमी वेळात अधिक पैसा कमविण्यासाठी शक्कल लढवली. राजेंद्र दियेवार हा सुद्धा गरीब आहे. तो भाड्याच्या घरात राहतो. त्याला सुद्धा पैशांची गरज होती.
हेदेखील वाचा : दिल्लीतील CA तरुणाने अत्यंत भयानक पद्धतीने संपवले आयुष्य; चेहऱ्याभोवती एक प्लॅस्टिकची पिशवी, तोंडात हेलिअम गॅस…