राजधानी दिल्ली येथून एक भयंकर आत्महत्येचा प्रकार समोर आला आहे. दिल्लीतील उच्चभ्रू परिसर असलेल्या गोल मार्केट परिसरात एका हॉटेलमध्ये एका चार्टर्ड अकाऊंटंट असलेल्या तरुणाने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव धीरज कंसल (वय २५ वर्षं) असे आहे. धीरज कंसल ने अत्यंत भयानक पद्धतीने आपले आयुष्य संपवले आहे. धीरज कंसल याने आत्महत्या करण्यापूर्वी एक सुसाईड नोट लिहून ठेवली होती.
अत्यंत विचित्र अवस्थेत सापडला मृतदेह
धीरज कंसाला याने एका हॉटेलच्या खोलीत आत्महत्या केली. धीरजने स्वतःच्या शरीरात हेलियम गॅसभरून आयुष्य संपवले. दिल्ली बाराखंबा पोलिसांना त्याचा मृतदेह हॉटेलच्या खोलीत बेडवर आढळून आला. अत्यंत विचित्र अवस्थेत सापडला आहे. धीरजने स्वत:च्या शरीरात हेलिअम गॅस भरुन आयुष्य संपवले. धीरजच्या तोंडात एक पाईप होता. धीरज कंसल याने तोंडावर एक मास्क घातला होता. हा मास्क एका सिलेंडरला जोडला होता. तसेच धीरज याने आत्महत्या करण्यापूर्वी स्वत:च्या चेहऱ्याभोवती एक प्लॅस्टिकची पिशवी गुंडाळली होती. धीरजने नळीद्वारे सिलेंडरमधील हेलिअम वायू तोंडावाटे शरीरात भरला आणि आत्महत्या केली.
28 जुलैला पोलिसांना हॉटेलमधून फोन आला. धीरजने 20 ते 28 जुलै या काळासाठी एअरबीएनबी अॅपवरुन पहिल्या माळ्यावरील खोली बूक केली होती. चेकआऊट करण्याच्या दिवशी हॉटेलचे कर्मचारी धीरज कंसलच्या खोलीजवळ गेले तेव्हा आतमधून दुर्गंधी येत होती. त्यामुळे हॉटेलच्या मालकाने पोलिसांना बोलावून घेतले. पोलिसांनी अग्निशमन दलाच्या जवानांना बोलावून घेतले आणि खोलीचा दरवाजा तोडला. आतमध्ये गेल्यानंतर पोलिसांना धीरज कंसला याचा मृतदेह बेडवर पालथा पडलेल्या अवस्थेत दिसला.
सुसाईड नोट मध्ये काय?
पोलिसांनी धीरज कंसल याच्या मृतदेहाजवळ एक सुसाईड नोट मिळाली.यामध्ये म्हटले आहे की, तुम्हाला माझी फेसबुक पोस्ट मिळाली नाही तर ही सुसाईड नोट मिळेल. मी निघून जात आहे. यासाठी कोणालाही दोषी धरु नये, कृपा करुन माझ्या मृत्यूनंतर दु:खी होऊ नका. मृत्यू ही माझ्या जीवनाचा सर्वोत्तम भाग होता. आत्महत्या करणं वाईट नाही, कारण माझ्यावर कोणाचाही जबाबदारी नव्हती किंवा माझं कोणाशी घट्ट नातं नव्हतं. माझ्यामुळे कोणीही नैराश्यात जाणार नाही, असे धीरज कंसल याने या सुसाईड नोटमध्ये म्हटले आहे. धीरज एकटा पडला होता. हे एकटेपण असह्य झाल्यामुळे धीरजने आयुष्य संपवल्याचे सांगितले जाते.
२००३ साली धीरज कन्सलच्या वडिलांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर धीराजच्या आईने दुसरे लग्न केले. धीराजला कोणीही भाऊ – बहीण नव्हते. त्याने आत्महत्या करण्यासाठी जाणीवपूर्वक हेलिअम गॅसचा वापर केला.हेलियम गॅस शरीरात गेल्यानंतर श्वास घेण्यास अवघड होते. शरीरात हेलियम गॅस पसरल्यावर लगेच फुफ्फुसांवर परिणाम होतो आणि माणसाचा श्वास कोंडला जाऊन मृत्यू होतो.
‘तू दहशतवादी आहेस’ म्हणत अफगाण व्यापाऱ्याला मारहाण; नागपूरमधील घटना