खळबळजनक ! पती-पत्नीमधील वाद टोकाला; पतीने गळा दाबून केली पत्नीची हत्या (संग्रहित फोटो)
पुणे : धायरीमधील रायकर मळा परिसरात हात उसने दिलेल्या पैशांवरून महिलेचा ओढणीने गळा आवळून खून केल्याची घटना घडली आहे. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी रिक्षा चालकाला अटक केली आहे. श्यामली कमलेश सरकार (वय ४०, रा. रायकरमळा, धायरी) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी नितीन चंद्रकांत पंडीत (वय ५१, रा. निसर्ग हाईट्सजवळ) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी नांदेडसिटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, श्यामली व नितीन यांची ओळख होती. नितीन हा रिक्षाचालक आहे. श्यामली ही राहण्यास धायरी येथील रायकरमळा येथे होती. ती कामानिमित्ताने पुण्याच्या मध्यभागात येत होती. यादरम्यान, श्यामली हिला धायरी येथून मध्यभागात येण्यासाठी नितीन याला सोडण्यास व नेण्यास सांगितले होते. त्यामुळे त्यांची ओळख झाली होती. दरम्यान, ओळखीनंतर श्यामली हिला काही पैशांची गरज होती. त्यामुळे तिने नितीनकडून ५० हजार रुपये हात-उसने पैसे घेतले होते.
काही दिवसांनी नितीनने ते पैसे परत मागितले. तेव्हा त्यांच्यात वादविवाद झाले होते. बुधवारी दुपारी पुन्हा परत पैशांवरून त्यांच्यात वाद झाले. वादानंतर नितीनने श्यामली हिचा ओढणीने गळा आवळून खून केला. पुढील तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) गुरूदत्त मोरे हे करत आहेत.
हे सुद्धा वाचा : महिलेला भेटायला बोलावले, नशेची गोळी दिली अन्…; पुण्यातील धक्कादायक प्रकार
लाकडी दांडक्याने मारहाण करुन एकाचा खून
जुन्या भांडणाच्या कारणातून कोडोली परिसरात एकाचा खून झाल्याची घटना उघडकीस आली आली आहे. या घटनेची सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, दिनांक २९ रोजी मध्यरात्रीच्या सुमारास जुन्या भांडणाच्या कारणातून अक्षय दिलीप माने (रा. धनगरवाडी, ता. सातारा) यांचा कोडोली, सातारा येथील पाच एकराच्या मोकळ्या प्लॉटमध्ये धनंजय यादव, प्रथमेश उर्फ पत्या रमेश चव्हाण, योगेश नंदकुमार खवळे, रोहन नामदेव जाधव आणि त्यांचा एक मित्र (सर्व रा. कोडोली, ता. सातारा) यांनी लाकडी दांडक्याने मारहाण करून खून केला आहे.