संग्रहित फोटो
पुणे : इन्स्टाग्रामवरून महिलेशी मैत्री करून तिला भेटण्यास बोलावले आणि नशेची गोळी देऊन तिचे अश्लील फोटो काढून ते व्हायरल करण्याची धमकी देत पैशांची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात अनुराग शर्मा (वय २३) या तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत ३४ वर्षीय महिलेने तक्रार दाखल केली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदार यांची अनुराग याच्याशी इन्स्टाग्रामवरून ओळख झाली होती. ओळखीनंतर त्यांच्यात मैत्री निर्माण झाली. अनुरागने महिलेचा विश्वास संपादन करून महिलेच्या इन्स्टाग्रामचा आयडी व पासवर्ड घेतला. तसेच, तिचे फोटो सेव्ह करून घेतले आणि महिलेला लग्न करण्याची मागणी घातली. मात्र, महिलेने लग्नाला नकार दिला. तेव्हा त्याने पैसे पाठव नाही तर सेव्ह केलेले फोटो व्हायरल करेल अशी धमकी दिली. नंतर त्याने महिलेचे व तिच्या पतीचे फेक खाते उघडले. या खात्यावरून नातेवाईकांना फ्रेंड रिकव्हेस्ट पाठविल्या.
महिलेने याबाबत विचारणा केली असता तिला भेटण्यासाठी तगादा लावला. महिला भेटण्यास आल्यानंतर तिला नशेची गोळी देऊन तिचे अश्लील फोटो काढले. पुन्हा ते फोटो व्हायरल करण्याची तसेच पतीला पाठविण्याची धमकी देत महिलेकडे खंडणी स्वरूपात पैशांची मागणी केली, असल्याचे तक्रारीत म्हंटले आहे. पुढील तपास विमानतळ पोलीस करत आहेत.
हे सुद्धा वाचा : महिला अधिकाऱ्याला मानसिक त्रास; भाजपच्या ‘त्या’ पदाधिकाऱ्यावर कारवाई कधी होणार?
महिलेचा पाठलाग करून विनयभंग
हडपसर परिसरात एका विवाहित महिलेचा सातत्याने पाठलाग करून तसेच तिला रस्त्यात अडवून तिचा विनयभंग केल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी हडपसर पोलिसांत पाडुरंग महादेव रामपुरे (वय ३२) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत २७ वर्षीय महिलेने तक्रार दाखल केली आहे. महिलेला वेगवेगळ्या मोबाईलवरून मॅसेज व फोन करत होता. महिलेने मोबाईल नंबर ब्लॉक केला असता त्याने महिलेचा पाठलाग सुरू केला. तिला रस्त्यात अडवून तिला मला बोलायला आवडते असे म्हणत तिचा विनयभंग केला.