crime (फोटो सौजन्य : social media)
पुण्यातून एका १८ वर्षीय तरुणीची हत्या करण्यात आली होती. ही घटना पिंपरी चिंचवड शहरातील वाल्हेकरवाडी परिसरात रविवारी रात्री घडली. हत्या धारधार शास्त्राने वार करून करण्यात आली. या हत्येची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. या घटनेचा गांभीर्याने तपास करत पोलिसांनी २४ तासात खून करणाऱ्या आरोपींना अटक केली आहे. आता पोलीस तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे.
अभ्यासाच्या तणावाखाली बीडच्या वैद्यकीय विद्यार्थ्याची आत्महत्या, ऑनलाईन सुरी मागवली मग स्वतःचा गळा….
मृत मुलीचं नाव कोमल जाधव आहे. ही पिंपरी चिंचवड येथील शहरालगत असलेल्या वाल्हेकरवाडीमधील कृष्णाईनगर परिसरात आपल्या कुटुंबासोबत राहत होती. घटनेच्या वेळी मयत कोमल आपल्या घरात होती. यावेळी बाईकवरून आलेल्या दोन आरोपींनी तिला घराबाहेर बोलवून घेतलं. कोमल घराच्या खाली असता आरोपींनी तिच्यावर निर्दयीपणे वार केले. या हल्ल्यात तिचा मृत्यू झाला. यानंतर शहर पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले होते. पोलिसांनी अज्ञात मारेकऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरु केला.
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, पोलिसांनी उत्तर प्रदेशाचा रहिवासी असलेल्या ४५ वर्षीय मुख्य आरोपी उदयभान यादव आणि त्याच्या संख्या भाच्याला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींच्या तपासात धक्कादायकी माहिती समोर आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मयत तरुणी आणि आरोपी हे दोघे शेजारी राहत होते. दोघांमध्ये संबंध आणि आर्थिक व्यवहार देखील झाले होते. याच संबंधातून निर्माण झालेल्या वादामुळे आरोपींना कट रचून कोमलची हत्या केल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
Karjat News: धार्मिक तणावाच्या पार्श्वभूमीवर नेरळ मध्ये पोलिसांकडून शक्ती प्रदर्शन