मित्राने केली मित्राची हत्या (संग्रहित फोटो)
नागपूर : नागपुरात दोघे कचरा वेचून उदरनिर्वाह चालवायचे आणि फुटपाथवर रात्र काढायचे. त्यांच्यासोबत एक महिलाही होती. त्या महिलेवर दोघेही हक्क सांगायचे. यातूनच वाद विकोपाला गेला. ती केवळ माझी आहे, असे म्हणत एका मित्राने दुसऱ्याची दगडाने ठेचून हत्या केली. ही थरारक घटना रविवारी रात्री तहसील ठाण्यांतर्गत घडली.
अण्णा ऊर्फ शैलेष हिरालाल सडाक (वय 40) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. वरिष्ठ पोलिस निरीक्षक शुभांगी देशमुख यांच्या नेतृत्वातील पथकाने केवळ तीन तासांत या गुन्ह्याचा छडा लावला आणि आरोपीला अटक केली. अनुराग ऊर्फ घोडा सुनील बोरकर (वय 33) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. अण्णा हा मूळचा सिहोर (मध्यप्रदेश) येथील रहिवासी आहे. सात वर्षांपासून नागपुरात फुटपाथवर राहतो. आरोपी अनुराग हा मूळचा शांतीनगरचा रहिवासी आहे. तो गुन्हेगारी प्रवृत्तीचा असल्याने कुटुंबीयांनी त्याला घराबाहेर काढले आहे.
हेदेखील वाचा : Sangli Crime : 7 लाखांची लाच घेताना महापालिका उपायुक्त ACB च्या जाळ्यात; १० लाखांची केली होती मागणी
अनेक वर्षांपासून तो फुटपाथवर राहतो. दोघेही एका निराधार महिलेच्या संपर्कात आले. ती महिलाही त्यांच्यासोबतच राहू लागली. महिलेची दोघांसोबतही जवळीक होती. महिलेला अनुरागपासून एक 3 वर्षांचा मुलगा आहे. मात्र, त्याला नाव अण्णाने दिले होते. अनुरागला अण्णाची महिलेसोबतची जवळीक आवडत नव्हती. मात्र, वारंवार इशारा देऊनही अण्णा तिच्याशी जवळीक साधायचा. घटनेच्या दिवशी म्हणजे रविवारी रात्री तिघेही एकत्र होते.
रागाच्या भरात भलामोठा दगड डोक्यावर मारला अन्…
अण्णा महिलेशी जवळीक साधाण्याचा प्रयत्न करत होता. हे पाहून आरोपी संतापला आणि रागाच्या भरात मोठा दगड अण्णाच्या डोक्यावर मारला. अण्णा रक्तबंबाळ होऊन खाली कोसळला. त्यानंतर अनुरागने त्याच्या छातीवरही दगड मारला. त्यानंतर अनुराग आणि महिला पळून गेले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठले. अण्णाला उपचारार्थ मेयो रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.
हेदेखील वाचा : Vasai Crime : १५० कोटींहून अधिक माती भराव प्रकरण, २८ आरएमसी प्लांटवर गुन्हे दाखल, महसुल विभागाची कारवाई