समुपदेशनाच्या नावाखाली मुलींचे लैंगिक शोषण (फोटो सौजन्य: Freepik)
वसई : गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारी घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यात आता मुंबईत राहणाऱ्या 16 वर्षीय अल्पवयीन मुलीवर दोघांनी सामूहिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना नालासोपारा येथे घडली. याप्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली.
हेदेखील वाचा : Crime News: पोलीस उपनिरीक्षकाला ‘हनीट्रॅप’ प्रकरणातील सहभाग भोवला; आयुक्तांकडून थेट बडतर्फीची कारवाई
नालासोपाऱ्यात राहणाऱ्या अनिस शेख (वय 23) या तरुणाशी पीडित मुलीची ओळख झाली. त्याने 2 सप्टेंबर रोजी तिला नालासोपाऱ्यात बोलावून तिच्यावर अत्याचार केला. 5 सप्टेंबर रोजी तिला पुन्हा नालासोपाऱ्यात बोलावले होते. त्यानंतर सनसाईन उद्यानात आरोपी अनिस शेख आणि त्याचा मित्र जियान या दोघांनी तिच्याशी लगट केली. त्यानंतर तिला दुचाकीवर बसवून अर्नाळा येथील एका लॉजमध्ये नेले. तेथेच अनिस शेख याने पुन्हा तिच्यावर अत्याचार केला. आचोळे पोलिसांनी दोन्ही आरोपींविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान, याप्रकरणी अनिस शेख या आरोपीला अटक केली आहे. दुसऱ्या फरार आरोपीचा शोध सुरू आहे, अशी माहिती आचोळे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांनी दिली.
पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
जियान याने या सर्व प्रकाराचे मोबाईलमध्ये चित्रण केले आणि हा प्रकार कुणाला न सांगण्याची धमकी देत मारहाण देखील केली. या प्रकरणी पीडित मुलीने अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. पहिला गुन्हा आचोळे पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला असल्याने तो आचोळे पोलिसांकडे वर्ग करण्यात आला.
कांदिवलीतही मुलीचा लैंगिक छळ
कांदिवलीमध्ये एका 17 वर्षीय मुलीवर तिच्या शाळेत शिकणाऱ्या 16 वर्षीय मुलाने लैंगिक छळ केल्याची घटना समोर आली आहे. या अत्याचारानंतर तिचे अश्लील फोटो मुलाने मित्राला व्हायरल देखील केले. याप्रकरणी चारकोप पोलिसांनी 21 वर्षीय आरोपीला अटक केली आहे, तर मुलीच्या अल्पवयीन मित्राला ताब्यात घेतल्यानंतर त्याची रवानगी डोंगरी बालसुधारगृहात करण्यात आली आहे.
हेदेखील वाचा : बाधकाम व्यावसायिकाच्या मुलाचं अपहरण करत मागितली ४० कोटींची खंडणी, पोलिसांनी 12 तासातच केली अटक






