लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर सातत्याने अत्याचार; पीडितेला मुलगी होताच... (File Photo : Crime)
महाड : बदलापूर येथील अत्याचाराच्या घटनेने राज्यभरात एकच खळबळ उडाली होती. ही घटना ताजी असतानाच आता पुन्हा एकदा महाड तालुक्यात अत्याचाराची घटना समोर आली आहे. एका नराधमाने 16 अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून वारंवार अत्याचार केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी पोलिसांत तक्रार येताच पोलिसांनी आरोपीविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून त्याला ताब्यातही घेतले आहे.
हेदेखील वाचा : लग्नाचे आमिष दाखवून बिल्डरने केला तरूणीवर लैंगिक अत्याचार; पुण्यातील धक्कादायक प्रकार
अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेने संपूर्ण महाड तालुका हादरला आहे. याप्रकरणी महाड तालुका पोलीस ठाणे येथे संबंधित आरोपी विरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाड उपविभागीय पोलीस अधिकारी शंकर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक खेडेकर या गुन्ह्याचा अधिक तपास करत आहेत.
दरम्यान, पीडित मुलगी ही अल्पवयीन असल्याचे माहिती असून देखील आरोपीने, मी तुझ्याशी लग्न करतो, असे सांगून तिच्याशी वेळोवेळी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. याप्रकरणी आरोपीविरोधात पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
पुण्यात बिल्डरने केला तरूणीवर अत्याचार
कोथरूड येथील एका बांधकाम व्यावसायिकावर तरुणीवर लग्नाच्या आमिषाने लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपावरून गुन्हा नोंद करण्यात आला आहे. स्वत:चा घटस्फोट झाल्याचे सांगून त्याने अत्याचार केल्याचे म्हटले आहे. तर या पीडितेचा बळजबरीने गर्भपातही केल्याचे तक्रारीत म्हंटले आहे.
रायगडच्या शासकीय वसतिगृहातही अत्याचार
रायगड जिल्ह्यातील एका शासकीय वसतिगृहातील खोलीत राहत असलेल्या अंदाजे 14 वर्षीय दोन अल्पवयीन मुलांनी 12 वर्षीय मुलावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी दोन मुलांविरुद्ध रायगड जिल्ह्यातील पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. काही महिन्यांपूर्वी विवाहित महिलेवर दोन पुजाऱ्यांनी नशेमध्ये धुंद असताना अतिप्रसंग करून तिची हत्या केली होती.