एचआयव्ही बाधित मुलीवर केला अत्याचार (File Photo : Crime)
शिक्रापूर : कारेगाव (ता.शिरूर) येथील महिलेची तिच्या व्यवसायातून सुरजकुमार सिंग याच्यासोबत ओळख झाली. यानंतर सुरजकुमार याने महिलेशी ओळख वाढवून तिला लग्नाचे आमिष दाखवले. त्यानंतर आरोपी सुरजकुमार याने महिलेला विविध ठिकाणी नेत वारंवार अत्याचार केला. इतकेच नाहीतर पीडित महिलेकडे साडे पाच लाखांची मागणी करत गंडाही घातला.
आरोपी सुरजकुमार याने महिलेच्या घरी जात तसेच रांजणगाव गणपती व कारेगाव येथील हॉटेलवर घेऊन गेला. तसेच महिलेला लग्नाचे आमिषही दाखवले आणि जबरदस्तीने महिलेवर अत्याचार केला. दरम्यान, सुरजकुमार याने वेळोवेळी आर्थिक अडचण असल्याचे सांगून महिलेकडून पैसे घेत महिलेचे तब्बल पाच लाख 75 हजार रुपये घेतले. मात्र, त्यानंतर महिलेशी लग्न करण्यास नकार देत महिलेकडून घेतलेले पैसे देखील देण्यास टाळाटाळ करू लागला.
दरम्यान, आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने पीडित महिलेने रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने पोलिसांनी सुरजकुमार विजयराम सिंग (सध्या रा. कारेगाव ता. शिरूर जि. पुणे मूळ रा. रुपाव ता. नवादा जि. बिहार) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणाचा पुढील तपास रांजणगाव एमआयडीसी पोलीस करत आहेत.
अमरावतीतही अत्याचाराची घटना
दुसऱ्या एका घटनेत, अमरावतीच्या धारणी येथील कारा गावात आयोजित यात्रेतून घरी परतणाऱ्या महिलेला जीवे मारण्याची धमकी देऊन अत्याचार केल्याची घटना मंगळवारी (दि. 18) सायंकाळी सातच्या सुमारास घडली. याप्रकरणी 45 वर्षीय महिलेच्या तक्रारीवरून धारणी पोलिसांनी आरोपी शिवलाल छोटेलाल धांडे (वय 21, रा. रक्षा, धारणी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
गुन्हेगारी घटनांमध्ये होतीये सातत्याने वाढ
राज्यात गुन्हेगारी घटनांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. त्यात खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा यांसारख्या घटना तर घडत आहेत. याशिवाय, महिलांवरील अत्याचाराच्या घटनेत लक्षणीय वाढ होत असल्याचे म्हटले जात आहे. असे असताना आता कारेगावात लग्नाच्या आमिषाने महिलेवर वारंवार अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे.