समृद्धी महामार्गावर विचित्र अपघात; जखमींना बाहेर काढताना आणखी एक अपघात
नागपूर : भरधाव स्कूल व्हॅनच्या चालकाने रस्त्याने पायी जात असलेल्या दोघांना जबर धडक दिली आणि फरार झाला. यात दोघेही गंभीर जखमी झाले. रुग्णालयात उपचारादरम्यान सासऱ्याचा मृत्यू झाला, तर जावयावर उपचार सुरू आहेत. ‘हिट अँड रन’ ही घटना कोराडी ठाण्यांतर्गत बोखारा परिसरात घडली.
जयराम असाडू पवार (वय 55) असे मृताचे नाव आहे. पोलिसांनी जखमी संतोष शंकर राठोड (वय 35) च्या तक्रारीवरून आरोपी वाहन चालकाविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जयराम आणि त्यांचा जावई संतोष हे दोघेही मूळचे छिंदवाडाच्या अमरवाडा येथील रहिवासी आहेत. दोघेही मजुरीचे काम करण्यासाठी नागपुरात आले होते. बोखारा परिसरातील एका बांधकामावर त्यांना काम मिळाले होते आणि तेथेच राहत होते.
हेदेखील वाचा : Pune Crime: आधी दांडक्याने बेदम मारहाण अन् नंतर पिस्तुलातून…; पुण्याच्या ‘या’ भागात नेमके घडले तरी काय?
मंगळवारी सायंकाळी सात वाजताच्या सुमारास दोघेही बोखारा रेल्वे क्रॉसिंगजवळून पायदळ गृहपयोगी सामान खरेदी करण्यासाठी जात होते. हंस बिअर बारजवळ स्कूल व्हॅन (एमएच-31/ईएम-0089) ने त्यांना मागून जबर धडक दिली. यानंतर वाहनचालक फरार झाला. यात जयराम आणि संतोष हे दोघेही गंभीर जखमी झाले.
स्थानिक नागरिक मदतीला
स्थानिक नागरिक मदतीला धावले. घटनेची माहिती मिळताच कोराडी पोलिस घटनास्थळी पोहोचले. दोघांनाही उपचारार्थ जवळच्या रुग्णालयात घेऊन गेले. मात्र, प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना मेडिकल रुग्णालयात रेफर करण्यात आले.
पसरणी घाटात भीषण अपघात
दुसऱ्या एका घटनेत, पाचगणी रस्त्यावर पसरणी घाटात गुरुवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास चारचाकी फोर्ड एन्डेव्हर गाडीचा अपघात झाला. यामध्ये ही कार सुमारे दोनशे फूट खोल दरीत कोसळली. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला, तर दोघे गंभीर जखमी झाले. हे सर्वजण लोणी काळभोर (पुणे) येथील असल्याची माहिती समोर आली आहे.
हेदेखील वाचा : Satish Wagh Case: सतीश वाघ हत्या प्रकरणात पोलिसांनी दाखल केले आरोपपत्र; समोर आली ‘ही’ धक्कादायक माहिती