फोटो सौजन्य: Gemini
सदर कोयता गँगने यापूवीर्हो अनेकांवर हल्ले केले आहेत. यामुळे या गॅंगने जामखेड पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे केले आहे. पंचायत समितीमध्ये माझी तक्रार करता काय असे म्हणुन दमदाटी करुन लाथाबुक्यांनी मारहाण केली होती. याची तक्रार दोन दिवसांपूर्वी जामखेड पोलीस स्टेशनला दाखल करण्यात आली होती याचा राग मनात धरून नऊ ते दहा जणांनी तलवार, कोयता, रॉड, काठीने सरपंच पतीसह चौघांना जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने मारहाण करुन जखमी केले आहे. तसेच सोबतच्या चार लोकांना मारहाण करुन जखमी करत चारचाकी गाडीचे नुकसान केले व शिविगाळ, दमदाटी केली तशी फिर्याद जामखेड पोलीस स्टेशनला दाखल करण्यात आली आहे. सरपंच पतीसह चार व्यक्तीवर झालेल्या हल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
खाकी वर्दीतील लाचखोर! ‘घरी बोलावून लाच स्वीकारली अन्….’, महिला पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात
फिर्यादी मिलिंद श्रीधर जीवडे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार आरोपी योगेश बापुराव इथापे, घनश्याम सोनबा कसाब, ऋषीकेश शिवाजी साळुंके, मयुर घनश्याम कसाब सर्व रा. झिक्की ता. जामखेड, अतुल जनार्धन कसाव रा. चौंडी ता. जामखेड व इतर ४ ते ५ जण अशा नऊ ते दहा आरोपींनी गैरकायद्याची मंडळी जमवुन त्यांचे हातातील तलवार, गोयता, रॉड, काठीने मला जीवे ठारमारण्याचे उद्देशाने मारहाण करुन जखमी केले.
घटनेदरम्यान घनश्याम सोनबा कसाब यांनी हातातील कोयत्याने मुकुंद जिवडे यांच्या डोक्यावर वार करून त्यांना गंभीर जखमी केले. त्याचप्रमाणे ऋषीकेश शिवाजी साळुंके यांनी लोखंडी रॉडने सागर जिवडे यांच्या डाव्या हातावर, पायावर आणि पाठीवर मारहाण केली. मयुर घनश्याम कसाब यांनी हातातील काठीने दत्तात्रय साळुंके यांच्यावर हल्ला केला, तर अतुल जनार्धन कुबास यांनी लोखंडी रॉडने फिर्यादी आणि मुकुंद जिवडे यांना मारहाण केली.
Chandrapur News: प्रचार करताना उमदेवारांची दमछाक, १२७५ उमेदवार नगरसेवक पदासाठी निवडणूकीच्या रिंगणात
पाठीमागून मोटारसायकलवर आलेल्या प्रविण रामभाऊ साळुंके यांनाही मयुर कसाब यांनी काठीने मारहाण केली. याशिवाय इतर चार ते पाच अनोळखी आरोपींनी लाकडी काठ्यांनी सर्वांवर हल्ला केला. हल्ल्यात गंभीर जखमी झाल्याने आम्ही रोडवरून पळू लागलो, तेव्हा आरोपी आम्हाला शिविगाळ करत, “नादी लागलात तर एकेकाचा मुडदा पाडू,” अशी धमकी देत असल्याचे फिर्यादीने तक्रारीत नमूद केले आहे.






