काय घडलं नेमकं?
अकोल्याच्या खदान पोलीस स्टेशन हद्दीतील कौलखेड रिजनल वर्कशॉप परिसरातील साईनाथ कॉलनीत एका मनोरुग्ण महिला राहत असे. तिने आपल्या ९ वर्षाच्या मुलाला लाकडी दिवाणामध्ये कोंबून ठेवले होते. जवळपास २० दिवसांनी ही महिला घराबाहेर दिसत नसल्याने शेजारच्यांनी संशय आला. याप्रकरणाची बातमी पोलिसांना देण्यात आली.
एकतर्फी प्रेमातून तरूणीला त्रास; पाठलाग करत धमक्याही दिल्या, तरुणीने शहर सोडल्यानंतर…
माहिती मिळताच खदान पोलीस, नंदादीप फाउंडेशनचे कर्मचारी निशांत सायरे व विनोद मापारी आणि स्थानिक नागरिकांनी घराची पाहणी केली. तेव्हा घर आतून बंद होता. महिला अत्यंत मानसिक अस्वस्थ स्थितीत राहत असल्याचे त्यांना आढळले. घरातील परिस्थिती पाहून पोलिसही थक्क झाले होते. घरात दुर्गंधी, अस्ताव्यस्त तिची अवस्था आणि महिलेकडून चाकूसह कॉलनीत भीतीदायक वर्तन होत असल्याची तक्रारही नागरिकांनी केली. घराच्या पाहणीत मुलगा दिवसामध्ये कोंबलेला आढळून आला. पोलिसांनी तत्काळ रेस्क्यू ऑपरेशन राबवत मुलाची सुखरूप सुटका केली.
सक्षम ताटेनंतर आणखी एक भयंकर हत्याकांड; भररस्त्यात चाकूने भोसकून तरुणाची हत्या
गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. किरकोळ कारणावरून खून, खुनाचा प्रयत्न यांसारखे गुन्हे घडताना दिसत आहे. त्यातच आता नांदेडमध्ये प्रेमप्रकरणातून सक्षम ताटे या तरुणाची हत्या करण्यात आल्याची घटना ताजी असतानाच अकोल्यात देखील अशीच घटना घडली आहे. अकोल्यातल्या शेगावमध्ये प्रेम प्रकरणातून भयंकर हत्याकांड घडले. एका तरुणाची भररस्त्यात चाकूने भोसकून निर्घृण हत्या करण्यात आली.
गौरव बायस्कार असे हत्या करण्यात आलेल्या तरुणाचं नाव आहे. चार जणांनी रस्त्यात गौरवला गाठून जागीच संपवले. या घटनेमुळे अकोल्यात खळबळ उडाली आहे. अकोला जिल्ह्यातील शेगाव अकोट रस्त्यावर गौरव बायस्कार या तरुणाची हत्या करण्यात आली. प्रेम प्रकरणातून गौरववर चौघांनी जीवघेणा हल्ला केला. भरस्त्यावर त्याच्यावर चाकूने सपासप वार करण्यात आले. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या गौरवने जागीच प्राण सोडले. याप्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.
दरम्यान, लोहारा गावातील मोरे कुटुंबातील एक अल्पवयीन मुलगा, त्याचे वडील आणि इतर दोनजण या चौघांनी एकत्रित गौरवची हत्या केली. अकोला जिल्ह्यातील अकोट-शेगाव रस्त्यावरील अंदुरा फाट्यावर भरदिवसा हे हत्याकांड घडल्याने एकच खळबळ उडाली. या प्रकरणात उरळ पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतले आहे.
Ans: अकोल्याच्या कौलखेड रिजनल वर्कशॉप परिसरातील साईनाथ कॉलनीत.
Ans: लाकडी दिवाणात बंदिस्त अवस्थेत, पोलिसांनी रेस्क्यू करून सुटका केली.
Ans: महिला अनेक दिवस घराबाहेर न दिसल्याने शेजाऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली.






