मुंबई : राष्ट्रवादीचे नेते तथा माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या कथित १०० कोटी वसुली सीबीआय प्रकरणात (CBI) दाखल जामीन अर्जावर आज मुंबई उच्च न्यायालय (Mumbai High Court) निकाल देणार आहे. देशमुख यांना जामीन मिळणार की त्यांना जेलमध्ये मुक्काम वाढणार, याचा निकाल आज कोर्ट करणार आहे.
सीबीआय तपास करत असलेल्या भ्रष्टाचार (Corruption) आणि वसुली प्रकरणात जामीनासाठी युक्तिवाद पूर्ण झाला असून न्यायालयाने निर्णय राखून ठेवला आहे. न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांचा आजचा निकाल, अत्यंत महत्वाचा मानला जात आहे. अनिल देशमुख यांनी केलेल्या जामीन अर्जाला सीबीआयने विरोध केला असला तरी देशमुखांच्या वकिलांनीही कोर्टात सुनावणी दरम्यान युक्तिवाद दरम्यान तपास यंत्रणेकडे कुठला ठोस पुरावा नसल्याचा जोरदार दावा केला आहे.
आरोपी सचिन वाझेनी (Sachin Waze) दिलेला जबाब विश्वासहार्य नाही, अनिल देशमुख यांचा वाढते वय, त्यांना असलेले आजार, सुनावणी दरम्यान अनेक वेळा ते चक्कर येऊन पडले. हे सर्व लक्षात त्यांना जामीन देण्यात यावा अशीही विनंती कोर्टाला केली आहे. ईडीकडे दाखल गुन्ह्यात अनिल देशमुख यांना आधीच जामीन मिळाला आहे. ही जमेची बाजू आणि कोर्टात झालेला जोरदार युक्तिवाद लक्षात घेता, जर या सीबीआय प्रकरणातही जामीन मिळाला तर अनिल देशमुख आज कारागृहातून मुक्त होऊ शकणार आहेत.