संग्रहित फोटो
पुणे : सोशल मिडीयाच्या माध्यमातून दहशत माजवल्याप्रकरणी कोथरूडमधील कुख्यात गँगस्टर निलेश घायवळ याच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. निलेश घायवळच्या रिल्स मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या खात्यांवरून व वेगवेगळ्या स्वरूपात व्हायरल होत असत. याप्रकरणात पोलिसांनी ही कारवाई केली आहे. संबंधित खाते धारकांकडे पोलिस आता चौकशी देखील करणार आहेत. दरम्यान, घायवळ याच्यावर आतापर्यंत सात गुन्हे दाखल झाले आहेत.
याप्रकरणी पोलिस शिपाई प्रशांत साखरे यांनी कोथरूड पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानूसार, नीलेश बन्सीलाल गायवळ (वय ४९, रा. संत ज्ञानेश्वर काॅलनी, कोथरूड), तसेच सोशल मिडीयावर गायवळच्या संदंर्भाने खाते चालविणाऱ्या एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दहशत माजविणारे रील्स व्हायरल करणे, तसेच गुन्हेगारी टोळीचे उद्दात्तीकरण केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवल्याचे परिमंडळ तीनचे पोलिस उपायुक्त संभाजी कदम यांनी सांगितले.
सचिन याच्यावर पुणे पोलिसांची कारवाई
गोळीबारप्ररणात मोक्का कारवाई झालेल्या गँगस्टर निलेश घायवळ सध्या चर्चेत आहे. दुसऱ्याच्या नावे मिसकार्ड वापरल्याप्रकरणी नुकतीच कारवाई केली होती. दरम्यान, निलेश घायवळच्या मुलगा परदेशात उच्च शिक्षण घेत आहे. त्यावरही पोलिसांनी नजर फिरवली असून, त्याच्या शिक्षणासाठी लागणारा पैसा, कॉलेज फी कोणत्या खात्यावरून किंवा कशा स्वरूपात देण्यात आली, याची माहिती आता संबंधित विद्यापीठाला विचारण्यात आली आहे. त्यासंदंर्भाने पुणे पोलिसांनी पत्र व्यवहार केला आहे. पोलिसांनी त्याला ब्लू कॉर्नर नोटीस बजावली आहे. घायवळला ताब्यात घेण्यासाठी इंटरपोलशी संपर्क साधला आहे. दुसरीकडे घायवळचा भाऊ सचिन याच्यावर पुणे पोलिसांनी कारवाई केली.
तत्कालीन पोलिस कर्मचाऱ्यांना नोटीस
घायवळने बनावट कागदपत्रांद्वारे अहिल्यानगर येथून पारपत्र मिळवले . त्याने ‘ घायवळ’ ऐवजी ‘गायवळ’ असे नाव त्याने पारपत्र मिळवताना वापरले आहे. त्यामुळे अहिल्यानगरमधील अहमदपूर विभागातील तत्कालीन पोलिस निरीक्षक, पोलीस कर्मचाऱ्यांची भूमिका संशयास्पद वाटल्याने त्यांना नोटीस बजावली आहे. या प्रकरणात त्यांची चौकशी करण्यात येणार आहे. नंतर पुढील कारवाई होईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.