Photo Credit- Social Media (बदलापूर अत्याचार प्रकरणातील शाळेच्या संचालकांसह मुख्याध्यापिकेला जामीन मंजूर)
बदलापूर : बदलापूर अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरच्या घटनेला काही दिवस उलटत नाहीत तोच या प्रकरणातमहत्त्वाची अपडेट समोर आली आहे. या प्रकरणातील सहआरोपी शाळेचे अध्यक्ष उदय कोतवाल आणि सचिव तुषार आपटे यांना न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. दोन दिवसांपूर्वीच मुंबई पोलिसांनी कोतवाल आणि आपटेला अटक केली होती. अटकेच्या अवघ्या काही तासातच या दोघांना जामीन मंजूर झाला आहे.
बदलापूर अत्याचार प्रकरणातील संबंधित शाळेचे संचालक उदय कोतवाल, तुषार आपटे यांना आज एसआयटीने कल्याण कोर्टात हजर केले. त्यानंतर न्यायालयाने दोघांनाही जामीन मंजूर केला. संबंधित शाळेचा संचालक उदय कोतवाल आणि तुषार आपटे यांना २५ हजारांच्या जातमुचकल्यावर जामीन मंजूर केला. याशिवाय शाळेच्या मुख्याध्यापिका अर्चना आठवले यांनाही जामीन मंजूर करण्यात आला.
हेही वाचा: महाविकास आघाडीत जागावाटपाचं भिजत घोंगड; नाना पटोले म्हणाले….
दरम्यान, एसआयटीने दोघांनाही कर्जतमधून अटक केली. अत्याचाराच्या प्रकारानंतर काही तासातच दोघेही फरार झाले होते. गेल्या महिना दीड महिन्यांपासून दोघेही फरारा असल्याने न्यायालयाने पोलीस आणि राज्य सरकारलाही चांगलेच फटकारले होते. त्यानंतर अवघ्या काही तासातचं कर्जतमध्ये लपून बसलेल्या या दोघांनाही पोलिसांना दोघांना अटक केली.
हे दोघेही नेरळ येथील एका गावातील फार्म हाऊसमध्ये लपून बसले होते. याच दरम्यान, या प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदेचा पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत मारला गेला. पण शाळेच्या संचालकांवर कारवाई कधी होणार, याबाबत नागरिकांकडून सातत्याने प्रश्न उपस्थित केले जात होते.
हेही वाचा: देशाच्या दरडोई उत्पन्नाबाबत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची मोठी माहिती,