Nalasopara Crime: करोडपती होण्याचे स्वप्न भंगले! व्हेल माशाच्या उलटीची विक्री करणाऱ्या दोन व्यक्तींना अटक
शनिवारी तुळींज पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहा. पोलीस निरीक्षक सुनिल पवार यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की, ९० फूट रोड, प्रगतीनगर परिसरात शासनाने प्रतिबंधित केलेली व्हेल माशाची उलटी विक्रीसाठी आणली जाणार आहे. या माहितीची खातरजमा केल्यानंतर तुळींजचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय जाधव यांनी कायदेशीर कारवाईचे आदेश दिले.
धक्कादायक! नोकरीचे आमीष नंतर महिलांसोबत लैंगिक संबंध अन् अश्लील व्हिडिओ रेकॉर्ड; 3 आरोपींना अटक
त्याअनुषंगाने गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने ९० फूट रोड, प्रगतीनगर येथे सापळा रचून कादर गफार करगना (वय ५२) याला ताब्यात घेतले. झडतीदरम्यान त्याच्याकडे काळसर-पिवळसर, मेणासारखी दिसणारी १ किलो ८५८ ग्रॅम वजनाची व्हेल माशाची उलटी आढळून आली. या मुद्देमालाची अंदाजे किंमत १ कोटी ८५ लाख ८० हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.
शासनाने प्रतिबंधित केलेली व्हेल माशाची उलटी विक्रीसाठी बाळगल्याप्रकरणी आरोपीविरोधात तुळींज पोलीस ठाण्यात वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ अंतर्गत कलम २, ३९, ४४, ४८(अ), ४९(ब), ५१ आणि ५७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तपासादरम्यान जप्त केलेली व्हेल माशाची उलटी किशोर महादेव तपसाळे (वय ३९) याने दिल्याचे निष्पन्न झाल्याने त्यालाही या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे.
ही कारवाई पोलीस उपायुक्त पौर्णिमा चौगुले श्रींगी, सहाय्यक पोलीस आयुक्त उमेश माने पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय जाधव, पोलीस निरीक्षक (गुन्हे) बाळासाहेब बनकर, पोलीस निरीक्षक (प्रशासन) आनंद पेंडणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहा. पोलीस निरीक्षक सुनिल पवार यांच्यासह अशपाक जमादार, पांडुरंग केंद्रे, दिगांबर परजने, श्रीधर कांबळे, इस्माईल शाह छपरीबन, राहुल कदम, अक्षय झांजुर्ने, शशिकांत पोटे, प्रसाद पालवे, प्रकाश दवने, अनिल सोनवणे आणि ज्योतीराज झंजे यांनी या कारवाईत सहभाग घेतला.






