बीड: बीड येथून एक संतापजनक आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. शेतीच्या वादातून झालेल्या हाणामारीत एका महिलेचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्या महिलेचे नाव छबू देवकर असे आहे. तीन पुतण्यांनी व त्यांच्या सुनांनी मिळून कोयता आणि लोखंडी पाइपने छबू देवकर यांच्यावर हल्ला केला. ही घटना आष्टी तालुक्यातील लोणी सय्यदमीर गावात शनिवारी संध्याकाळी साडेसहा वाजता घडली. यांनतर त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आलं परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी सहा जणांना ताब्यात घेतले आहे.
नेमकं काय घडलं?
या प्रकरणी अधिकची माहिती अशी, लोणी सय्यदमीर येथील देवकर कुटुंबात शेतातील बांध व पाईपलाईनच्या वादावरून गेल्या काही दिवसांपासून तणाव सुरु होता. शनिवारी सायंकाळी घरासमोर लहान मुले चेंडू खेळ असतांना किरकोळ भांडण झाले आणि त्याचे रूपांतर भीषण हाणामारीत झाले. यात छबू देवकर यांच्यावर त्यांच्या तीन पुतण्यांनी व त्यांच्या सुनांनी मिळून हल्ला केला. या मारहाणीत त्यांचा मुलगा मिठू देवकर देखील जखमी झाला. गंभीर अवस्थेत छबू देवकर यांना अहिल्यानगर रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
आरोपी ताब्यात
अंभोरा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मंगेश साळवे यांनी घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला आहे. त्यांनी दोन पथके तयार करून आरोपींच्या शोधासाठी रविवारी पहाटे कारवाई केली आणि पुतणे रामदास, राहुल, संतोष देवकर तसेच सुना कविता, मनीषा व लता देवकर या सहा जणांना ताब्यात घेतले आहे. या घटनेनंतर गावात सध्या तणावपूर्ण शांतता असून परिस्थिती पोलिसांच्या नियंत्रणात आहे. छबू देवकर यांचा अंत्यसंस्कार पोलीस बंदोबस्तात लोणी सय्यदमीर गावात पार पडला.
घरात घुसून डोळ्यात मिरची टाकून अमानुष अत्याचार, पती आणि नातेवाईकांनाही धमकी
बीड येथून एक धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. एका महिलेवर अमानुषपणे अटायचार करण्यात आल्याची धक्कदायक घटना समोर आल्याचे समोर आले आहे. पीडित महिलेच्या घरात घुसून एका आरोपीने तिच्या डोळ्यात मिरचीची पूड टाकली आणि तिच्यावर विनयभंग करत अत्याचार केल्याचे समोर आले आहे. एवढेच नाही तर तिच्या पती आणि नातेवाईकांनाही धमकी दिल्याचे समोर आले आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.