काय घडलं नेमकं?
या प्रकरणात हत्या झालेल्या तरुणाचे नाव सुशांत गवते (१९ वर्ष) असे आहे. ही घटना २६ एप्रिल रोजी शुक्रवारी साडेसात ते साडेआठ वाजेच्या दरम्यान घडली. शाहदेव आश्राजी गवते हे आपल्या नातेवाईकासह मोटारसायकलवरून जात असतांना, त्यांना नारायणगडच्या दक्षिण बाजूला असलेल्या हॅलिपॅडच्या मोकळ्या जागेत ओरडण्याचा आणि शिवीगाळ करण्याचा आवाज आला. त्यांनी मोटारसायकलच्या लाईटच्या उडेजात पाहिले असता, तीन लोकांनी सुमितला घट्ट पकडून ठेवले होते आणि चौथा आरोपी त्याला चाकूने भोकसत होता. तो जवळ येईपर्यंत आरोपींनी सुमितवर जीवघेणा हल्ला केला होता. सुमित रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर कोसळल्यानंतर आरोपींनी तिथून पळ काढण्याचा प्रयत्न केला, मात्र नागरिकांनी पाठलाग करून एका आरोपीला जागीच पकडले.
हत्येमागचं कारण काय?
आरोपीचे नाव रुस्तुम गोवर्धन गवते असे आहे. काही आक्षेपार्ह फोटो सुमितने दाखविल्याचा संशय आरोपींना होता. याच कारणावरून त्यांच्यामध्ये मागील काही दिवसांपासून वारंवार वाद होत होते. या वादाचा वचपा काढण्यासाठी रितेश सतीश बहिर, रुस्तम गोवर्धन गवते, ज्ञानेश्वर दत्ता लाटे आणि सूरज मच्छिंद्र नागरगोजे यांनी जाणीवपूर्वक कट रचला.
फिर्यादीनुसार, रुस्तुम, ज्ञानेश्वर आणि सूरज यांनी सुमितचे हातपाय पकडून ठेवले होते, तर रितेश बहिर याने त्याच्या हातातील धारदार चाकूने सुमितच्या पोटात वार केले. जास्त रक्तस्त्राव झाल्यामुळे आणि मदतीसाठी वाहन न मिळाल्याने सुमितचा घटनास्थळीच मृत्यू झाला.याप्रकरणी शहादेव गवते यांच्या फिर्यादीवरून शिरूर पोलीस ठाण्यात चारही आरोपींविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीने हत्येची कबुली दिली असून होमगार्डनेच अशा प्रकारे क्रूर हत्या केल्यामुळे पोलिसांच्या प्रतिमेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. सध्या पोलीस फरार आरोपींचा शोध घेत असून, या घटनेमुळे बेलुरा गावात तणावपूर्ण शांतता पसरली आहे.
मानसिक छळाला कंटाळून पोलिसाची आत्महत्या; पत्नीसह प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल
Ans: बीड जिल्ह्यातील बेलुरा गावात.
Ans: पत्नीच्या आक्षेपार्ह फोटोवरून झालेला वाद.
Ans: एक आरोपी ताब्यात असून इतरांचा शोध सुरू आहे.






