काय नेमकं घडलं?
या प्रकरणातील आरोपीचे नाव रोहित ऊर्फ नवनाथ श्रीरंग नाईक (वय 24, रा. कवलापूर, मूळ रा. भोसे, ता. मिरज) असे आहे. मिरज तालुक्यातील कवलापूर येथील सिद्धेश्वर देवाची यात्रा सुरू आहे. या यात्रेत तमाशाचा कार्यक्रम सुरू होता. यात्रेनिमित्त परिसरात मोठी गर्दी जमली होती. या गर्दीतून जाताना विश्वास आणि संशयित रोहित यांचा एकमेकांना धक्का लागला. यावरून दोघांमध्ये जोरदार वादावादी झाली. एकमेकांना शिवीगाळही झाली. यावर संतापलेल्या रोहितने विश्वासला धक्का देऊन खाली पाडले आणि रस्त्यावरील दगड त्याच्या डोक्यात घातला.
विश्वास जीवाच्या आकांताने ओरडल्याने परिसरातील ग्रामस्थांनी तातडीने धाव घेतली आणि रोहितला पकडून ठेवले. विश्वासला गंभीर जखमी अवस्थेतच सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र सोमवारी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. विश्वास हा कवलापूर-कुमठे फाटा रस्त्यावरील हॉटेलमध्ये वेटर होता. दरम्यान, याप्रकरणी सूरज भूपाल सुतार याने पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सांगली ग्रामीण पोलिस ठाण्याचे पथक पुढील तपासणी करत आहेत.
सांगली हादरली! २४ तासांत तिहेरी हत्याकांड; दिवसाढवळ्या रक्तस्नानाने भीतीचे सावट
सांगली जिल्ह्यात अवघ्या २४ तासांच्या कालावधीत तीन ठिकाणी घडलेल्या निर्घृण हत्यांनी सांगली हादरून गेली आहे. पहाटेपासून सायंकाळपर्यंत उघडपणे सांडलेल्या रक्तामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, नागरिकांमध्ये तीव्र भीती आणि संतापाची भावना निर्माण झाली आहे.
Ans: सांगली जिल्ह्यातील कवलापूर येथील सिद्धेश्वर यात्रेत. Q2. वादाचे कारण काय होते? गर्दीत एकमेकांना धक्का लागल्यामुळे वाद झाला. Q3. पोलिसांनी काय कारवाई केली? आरोपीला अटक करून पुढील तपास सुरू केला आहे.
Ans: गर्दीत एकमेकांना धक्का लागल्यामुळे वाद झाला.
Ans: आरोपीला अटक करून पुढील तपास सुरू केला आहे.






