बीड मधून एक धक्कदायक आणि संतापजनक घटना समोर येत आहे. बीड जिल्ह्यातील माजलगाव येथे लग्नाचे अमिश दाखवत तरुणीवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोट दुखू लागल्याने सदरील तरुणीची तपासणी केल्यानंतर पीडिता ५ महिन्याची गर्भवती असल्याचे समोर आले आहे. ही घटना मे महिन्यात उघडकीस आली. आता याप्रकरणी माजलगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सांगलीच्या कुपवाडमध्ये नवविवाहित गर्भवतीची आत्महत्या; धक्कादायक कारणही आलं समोर…
नेमकं काय प्रकरण?
आरोपीचे नाव सुनील अलजेंडे आहे. पीडित तरुणी ही सुमारे 20 वर्षांची असून, तिची ओळख सुनील अलझेंडे या तरुणाशी झाली होती. दोघांची मैत्री वाढू लागली आणि त्याने लग्नाचे आमिष दाखवून तिचा विश्वास संपादन केला. त्यानंतर त्याने वेळोवेळी तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले. सुरवातीला त्याने तरुणीला लग्नाचे आश्वासन दिले म्हणून तरुणीने त्याला विरोध केला नाही. मात्र नंतर त्याने लग्न करण्यास नकार दिला.
मे महिन्यात तरुणीला सतत पोटदुखीचा त्रास जाणवू लागला. त्यामुळे तिच्या आई- वडिलांनी तिला माजलगाव येथील खासगी रुग्णालयात तपासणीसाठी नेले. यावेळी डॉक्टरांनी केलेल्या तपासणीत ती सुमारे पाच महिन्यांची गर्भवती असल्याचे स्पष्ट झाले. हे ऐकून कुटुंबीयांवर आभाळ कोसळलं.या प्रकरणाची माहिती पोलिसांना देण्यात आली. त्यानुसार माजलगाव शहर पोलीस ठाण्यात सुनील अलझेंडे विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीने लग्नाचे आमिष दाखवून पीडितेवर अनेकदा जबरदस्ती केली, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.
कोयत्याचा धाक दाखवून जबरी चोरी करणाऱ्यांवर पोलिसांची धडक कारवाई; गुन्हा दाखल करत…